Benefits of Nature’s Sound For Health: आज काल बिझी लाईफस्टाईलमध्ये आपल्या फिजीकल आणि मेंटल हेल्थची काळजी घेणे गरजेचे आहे. एक्सपर्टनुसार नेहमी फिजिकल अॅक्टिव्हिटी आणि मेडिटेशनचा सल्ला देतात. पण आता एका संशोधनामधून समोर आले आहे की नैसर्गिक आवाज लोकांच्या मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या अभ्यासानुसार बीबीसी सीरिज फॉरेस्ट 404 चा (BBC series Forest 404) एक भाग म्हणून ७५०० पेक्षा जास्त लोकांचा डेटा एकत्र केला गेला होता.बीबीसी सीरिज फॉरेस्ट 404 चाही एक पॉडकास्ट आहे जी निसर्गाशिवाय जगाचे चित्रण करते. अभ्यासात असे आढळून आले की, बर्डसॉन्गच्या (Birdsong) आवाजामुळे सहभागींचा तणाव आणि मानसिक थकवा दूर झाला.
एक्सेटर युनिव्हर्सिटीचे (University of Exeter) प्रमुख संशोधक अॅलेक्स स्माली (Alex Smalley)म्हणतात, "लॉकडाऊनमुळे लोकांना त्यांच्या सभोवतालचे नैसर्गिक आवाज पुन्हा शोधण्यात मदत झाली आहे. आमचे निष्कर्ष असे दर्शवतात की, या अनुभवांची जाणीव मानसिक आरोग्य आणि संवर्धन (Conservation) या दोन्हींसाठी फायदेशीर ठरू शकते."
अॅलेक्स स्मॅली (Alex Smalley) पुढे म्हणतात की, "आम्ही भविष्यात निसर्गाकडून आरोग्याच्या फायद्यांचा उपयोग करू इच्छित असल्यास, आम्हाला हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, आज प्रत्येकाला नैसर्गिक जगासह सकारात्मक अनुभवांना प्रोत्साहन देण्याची संधी आहे. ते पुढे म्हणाले की "लाटा किंवा पावसासारखे लँडस्केप आवाज ऐकल्याने वैद्यकीय परिणामांची नोंद झाली आहे."
फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, गुरुग्राम येथील मानसिक आरोग्य आणि वर्तणूक विज्ञान प्रमुख, डॉ. कामना छिब्ब रहेल्थशॉट्ससोबत बोलतांना निसर्गाचा आवाज एखाद्याच्या मानसिक आरोग्यासाठी कसा फायदा करू शकतो हे सांगितले
कामना छिब्बर यांच्या मते, ''एखाद्याच्या मानसिक आरोग्यावर निसर्गाचा सकारात्मक प्रभाव पडतो. हे केवळ निसर्गाच्या सान्निध्याबद्दलच नाही तर ते नैसर्गिक वातावरणाच्या गुणवत्तेबद्दल देखील आहे आणि कोणत्याही व्यक्तीला जेव्हा ते निसर्गासोबत वेळ घालवतात तेव्हा त्यांना निसर्गाचा आवाज ऐकू येतो, अगदी झाडाच्या पानांची सळसळ असो पक्ष्यांचा किलबिलाट असो किंवा प्राण्यांचा आवाज, ते आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि एकूणच आपल्या कल्याणासाठी उपयुक्त ठरता जेव्हा तुम्ही निसर्गाच्या मध्यभागी असता तेव्हा ते तुम्हाला आनंद आणि आनंदाच्या भावनांकडे घेऊन जाते, विशेषत: ज्यांना घराबाहेर राहायला आवडते त्यांच्यासाठी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.