Vipassana sakal
आरोग्य

भगवान बुद्धांची ध्यानपद्धती विपश्यना

बुद्ध जयंतीच्या निमित्ताने जगभरात लाखो साधक ‘विपश्यना ध्यान’ करून भगवान बुद्धांना वंदन करतात.

सकाळ वृत्तसेवा

- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ

बुद्ध जयंतीच्या निमित्ताने जगभरात लाखो साधक ‘विपश्यना ध्यान’ करून भगवान बुद्धांना वंदन करतात. मानव जातीत बहुतांश व्यक्तींनी हीच ध्यानसाधना करून पूर्णावस्था प्राप्त करून घेतली आहे. भगवान बुद्ध याच साधनेनं निर्वाण अवस्थेत गेले. ही पद्धती वैज्ञानिक असल्याने लोकप्रिय झाली. विपश्यना म्हणजे विशेष रीतीने पाहणं, अनुभवणं. हे ध्यान कसं करायचं ते पाहूया.

‘अनापानसति’ : ही विपश्यनेची पहिली पातळी आहे. अनापान म्हणजे श्वासोच्छ्‌वास आणि सति म्हणजे जाणीव, स्मरण. श्वासोच्छ्‌वासाकडे जाणीवपूर्वक, अवधानपूर्वक लक्ष देणं म्हणजे अनापानसति. श्वासोच्छ्‌वासाकडे सावधचित्ताने अविरत पाहत राहणं, जाणीवपूर्वक अनुभव घेणं एवढंच साधकानं करायचं असतं.

श्वासोच्छ्‌वासाची क्रिया तीन प्रकारे पाहता येते

पहिला प्रकार - श्वास नाकपुडीद्वारे छातीमध्ये, फुफ्फुसामध्ये प्रवेश करतो. उच्छ्‌वास नाकपुडीद्वारे शरीराबाहेर सोडला जातो. या श्वासोच्छ्‌वासाचं अवधान राखायचं. श्वास अंतर्यामी किती खोलवर जातो, उच्छ्‌वास शरीराबाहेर किती लांबवर जातो, हे पाहायचं. श्वासाच्या तुलनेत उच्छ्‌वासाचं तपमान थोडं जास्त असतं, हे जाणवतं. श्वासोच्छ्‌वासाचा मंद नाद ऐकायला येतो. श्वासोच्छ्‌वासाचा स्पर्श नाकपुडीपाशी जाणवतो. श्वासोच्छ्‌वासाच्या गतीवर नियंत्रण आणायचं नाही.

दुसरा प्रकार - श्वासोच्छ्‌वास करताना पोट वर-खाली होतं, ते मनानं पाहणं, त्याची जाणीव ठेवणं. पोट वर-खाली होण्याच्या प्रक्रियेचं फक्त अवलोकन करायचं. नियंत्रण करायचं नाही.

तिसरा प्रकार - श्वासोच्छ्‌वास करताना छातीच्या हालचालींकडे लक्ष द्यायचं. छाती वरखाली होते, सूक्ष्मरीत्या रुंदावते इकडे लक्ष ठेवायचं.

‘अनापानसति’च्या सुरुवातीला पाठीचा कणा सरळ ठेवून, डोळे मिटून श्वासोच्छ्‌वासाकडे लक्ष द्यायचं. मन अंतर्मुख ठेवायचं. श्वासोच्छ्‌वास मोजायचे नाहीत, जप वगैरे करायचा नाही. श्वासोच्छ्‌वासाच्या प्रक्रियेची जाणीव सतत जागृत ठेवणं, एवढंच करायचं.

श्वासाकडे पाहताना शरीरांतर्गत अवयवांच्या संवेदना जाणवतील. कपड्यांचा, वाऱ्याचा, उन्हाचा स्पर्श. खाज सुटल्याची, घामाची जाणीव. हातपाय अवघडणं, त्यांना मुंग्या येणं. त्वचेवरील रोमांच, हुळहुळ याची जाणीव....अशा वेगवेगळ्या संवेदना जाणवतात. या संवेदनाकडे केवळ पाहायचं, अनुभवांचं भान राखायचं. त्यांची मनात नोंद घ्यायची; शारीरिक, मानसिक प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही.

आता या शारीरिक संवेदनांकडे एका क्रमानं पाहत जायचं आहे. उजव्या पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात करून हळूहळू क्रमशः एकेका अवयवावरून अंतर्दृष्टी फिरवत जाणीव डोक्यापर्यंत न्यायची. नंतर मंद गतीनं क्रमशः डोक्यापासून उजव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत न्यायची. संवेदनेची फक्त नोंद घ्यायची. तटस्थपणे पाहण्याची प्रक्रिया चालू ठेवायची. यातूनच ध्यान साधतं, मनस्थैर्य जाणवतं.

श्वास व संवेदना यांच्या जोडीनं मनात विचारही डोकावतात. विचार मुद्दामहून आणायचे नाहीत; पण सहजपणे आले, तर त्यांना घालवूनही द्यायचं नाही. विचारांकडे साक्षीभावानं, तटस्थतेनं केवळ पाहत राहायचं. श्वास, संवेदना, विचार यापैकी कशावरही लक्ष केंद्रित होऊ शकतं.

श्वासाकडे पाहण्याला ‘अनापानसति’ म्हणतात. संवेदना, विचारांकडे पाहण्याला ‘विपश्यना’ म्हणतात. अनापानसती जमलं, की विपश्यना जमणं सोपं होतं. मन अत्यंत स्थिर, प्रसन्न होतं. या ध्यानामुळे साधक शांत होतो. त्याला आंतरिक प्रगाढ शांतीचा अनुभव येतो. ही अनुभूती आल्यामुळे विपश्यनेच्या दीर्घकालीन साधनेसाठी प्रेरणा मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT