coconut sakal
आरोग्य

Summer Drink: साधं नारळपाणी पिऊन कंटाळलात मग हे स्पेशल हेल्दी ड्रिंक नक्की ट्राय करा

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तरीसुद्धा नारळ पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरते.

Aishwarya Musale

उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे हायड्रेशन. सतत घाम येणे आणि पाणी कमी होणे यामुळे डीहाइड्रेशन होते आणि त्यावर उपचार न केल्यास अतिसार देखील होऊ शकतो. व्यस्त जीवनात हेल्थ केयरमध्ये अतिरिक्त गोष्टी करायला वेळ मिळत नाही.

पण काही सोप्या मार्गांनी तुम्ही उन्हाळ्यातही तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घेऊ शकता. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी नारळाचे पाणी एक उत्तम स्त्रोत मानले जाते.

पण नुसते नारळ पाणी पिऊन चालणार नाही. येथे आम्ही तुम्हाला नारळाच्या पाण्यात काही आरोग्यदायी गोष्टी मिसळून पेय कसे बनवायचे ते सांगणार आहोत. यासोबतच याचे फायदेही सांगणार आहोत.

नारळ पाण्याचे फायदे

नारळाच्या पाण्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट असतात. डेंग्यू, मलेरिया किंवा इतर आजारांमध्ये शरीराची प्रतिकारशक्ती झपाट्याने कमी होऊ लागते.

अशा परिस्थितीत नारळाचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो कारण ते प्लेटलेट्स वेगाने वाढवते. नारळाच्या पाण्याने पोटाचे आरोग्य चांगले राहते. पोटामध्ये जळजळ, व्रण, आतड्यांवरील सूज आणि पोटाशी संबंधित इतर समस्या आपल्यापासून दूर राहतात.

coconut

नारळाच्या पाण्याचे असे बनवा स्पेशल समर ड्रिंक

नारळाच्या पाण्यात त्याची मलाई, चिया सीड्स, रुहअफजा, लिंबाचा रस आणि बर्फ मिसळावा लागेल. स्पेशल कोकोनट समर ड्रिंकसाठी, आपल्याला मलईवाला नारळ घ्यावे लागेल. सर्व प्रथम, नारळ पाणी आणि मलई वेगळ्या भांड्यात काढा.

आता त्यांना ब्लेंडरमध्ये टाका आणि बर्फ देखील मिक्स करा. आता एका भांड्यात काढून त्यात चिया सीड्स टाका. दरम्यान, रुहअफजा घाला आणि तुमची ड्रिंक तयार आहे. तुम्हाला हवे असल्यास नारळात टाकून तुम्ही या पेयाचा आनंद घेऊ शकता.

coconut

कोकोनट समर ड्रिंकचे फायदे

या ड्रिंकमुळे तुम्ही हायड्रेटेड राहू शकाल आणि पोषक तत्वे देखील मिळवू शकाल. आठवड्यातून किमान तीन वेळा ते प्यायल्याने त्वचेलाही फायदा होईल. पोटासाठी हा रामबाण औषधापेक्षा कमी नाही. उन्हाळ्यात हे प्यायल्याने पोट शांत राहते. यासोबतच तुमचे पोटही सहज साफ होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT