डॉ. बंदिता सिन्हा,
Male Infertility Resons, Symptoms And Treatment : आजच्या वेगवान, घाईगर्दीच्या काळात वंध्यत्व ही बऱ्याच लोकांमध्ये आढळून येणारी समस्या बनली आहे. एखादी प्रजननक्षम स्त्री एखाद्या पुरुषासोबत एक वर्षभर असुरक्षित किंवा वारंवार संभोग करून देखील गर्भवती राहू शकत नसेल तर या समस्येला त्या पुरुषाचे वंध्यत्व असे म्हटले जाते.
या समस्येची कारणे पुरुष व स्त्रिया दोघांमध्येही असतात त्यामुळे वंध्यत्वाची तपासणी दोघांचीही झाली पाहिजे आणि दोघांवरही उपचार केले गेले पाहिजेत. पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या उत्पन्न होण्यामागे अनेक कारणे असतात. यापैकी काही स्थितींमध्ये बदल घडवून आणला जाऊ शकतो तर काही स्थिती बदलवल्या जाऊ शकत नाहीत.
वंध्यत्वाच्या समस्येमध्ये पुरुषाची तपासणी केली जात असताना, वंध्यत्वाला कारणीभूत ठरणारे घटक ओळखणे, ज्या घटकांचा प्रभाव बदलता येऊ शकतो त्यांच्यावर उपचार करणे या गोष्टींवर भर असतो. एखादा पुरुष सहायक पुनरुत्पादक तंत्र वापरले जाण्यासाठी पात्र आहे की नाही हे ओळखण्यात देखील यामुळे मदत मिळते, त्याचबरोबरीने ज्या घटकांचा प्रभाव पलटवला जाऊ शकत नाही किंवा ज्यांच्यावर उपचार केले जाऊ शकत नाहीत अशा घटकांच्या संदर्भात सल्ला देण्यात देखील हे महत्त्वाचे ठरते.
काय आहेत कारणे?
वय, औषधे, आधीच्या काळात झालेल्या काही शस्त्रक्रिया,
आनुवंशिक समस्या,
शारीरिक विकार
पर्यावरणातील विषारी द्रव्यांच्या संपर्कात येणे यासारख्या घटकांच्या प्रभावामुळे प्रजननक्षमतेवर प्रभाव पडू शकतो.
क्वचित प्रसंगी, पुरुषांच्या वंध्यत्वामागे काही गंभीर कारणे असू शकतात.
पुरुषांच्या वंध्यत्वामागे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात.
एंडोक्रिनल, इडिओपॅथिक, जेनेटिक, कॉन्जीनिटल युरोजेनिटल स्थिती असे त्यांचे वर्गीकरण करता येते.
काही युरोजेनिटल विकार असतात,
रोगप्रतिकार क्षमतेशी संबंधित काही कारणे असतात,
लैंगिक कार्यांमध्ये बिघाड झालेला असू शकतो.
काही औषधे देखील याला कारणीभूत ठरू शकतात.
काही हार्मोनल कमतरता असू शकतात. खासकरून गोनाडोट्रोपिन हार्मोन-रिलीझिंग हार्मोनची कमतरता जर जन्मजात असेल तर ते वंध्यत्वाचे कारण ठरू शकते.
सिस्टिक फायब्रोसिसचे म्युटेशन किंवा कालमन सिंड्रोम, यंग सिंड्रोम आणि क्लाईनफेल्टर सिंड्रोम यासारख्या इतर जन्मजात विकारांमुळे वंध्यत्व होऊ शकते.
वंध्य जोडप्यांमधील पुरुषाची संपूर्ण तपासणी करवून घेण्यामागचे हे अजून एक कारण आहे, काही लक्षणीय, महत्त्वपूर्ण वैद्यकीय स्थिती असतील तर त्या ओळखून त्यावर उपचार करण्यासाठी हे खूप गरजेचे असते.
काही अज्ञात असलेले घटक असू शकतात त्यांना इडिओपॅथिक मेल इन्फर्टिलिटी असे म्हणतात. वंध्यत्वाच्या १०% ते २०% केसेसमध्ये हे कारण असते.
काय तपासणी असते?
वीर्य तपासणी हा पुरुषांमधील वंध्यत्वाची तपासणी करण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग असतो. प्रजननक्षमतेसाठी महत्त्वाचे घटक म्हणजे वीर्याचे आरोग्य, शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंची गुणवत्ता समजून घेण्यात या तपासणीमुळे मदत होते.
उपाय काय?
जीवनशैलीमध्ये निरोगी बदल घडवून आणणे,
धूम्रपान बंद करणे,
अल्कहोलचे सेवन कमी करणे किंवा थांबवणे,
पोषक आहार घेणे असे उपाय डॉक्टर पुरुषांना सुचवतात.
आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि नट्स यासारख्या अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असले पाहिजे.
वजन कमी करणे देखील महत्त्वाचे आहे
त्यामुळे शुक्राणूंवर विषारी ऑक्सिडेटिव्ह फ्री रॅडिकल्सचा प्रभाव वाढतो आणि ते शुक्राणूंची गुणवत्ता सुधारू शकतात.
व्यायाम आणि वजन कमी करणे खूप महत्वाचे आहे.
अतिशय निरोगी जीवनशैली, सकारात्मक दृष्टीकोन, नियमित व्यायाम आणि योग्य उपचार यांचा मिलाप घडून आल्यास पुरुषांच्या वंध्यत्वाशी संबंधित बहुतेक कारणांवर उपचार केले जाऊ शकतात.
सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानाद्वारे इतर समस्यांवर उपचार केले जाऊ शकतात.
(लेखिका नवी मुंबई येथिल कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल इथे कन्सल्टन्ट, गायनॅकॉलॉजी आणि फर्टिलिटी तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.