Mango Peel Benefits : उन्हाळा लागला की बाजारात कच्ची कैरी आणि पिकलेले आंबे यांनी बाजार अगदी सजलेलं असतं. आंब्याच्या सीजनमधे सर्वाधिक आंबे खरेदी होतात. हे फळ प्रत्येकाला आवडणारं आहे. मात्र अनेकजण पिकलेले आंबे खाऊन त्यांची साल उपयोगाची नाही म्हणून फेकून देतात. आंब्याच्या सालीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
आंब्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे आंब्याची साल चेहऱ्याला लावल्याने त्वचा उजळ होते. त्वचेवर आंब्याच्या सालीचा नियमित वापर केल्यास काळे डाग कमी होण्यास मदत होते. याशिवाय, उजळ त्वचेसाठी स्किन टोनिंगसाठीही आंब्याची साल फायद्याची आहे. तसेच आंब्याच्या सालीमधे आर्द्रता असल्याने ती त्वचेवर मॉश्चरायझर म्हणूनही काम करते. आंब्याची साल त्वचेला हायड्रेट करण्यात मदत करू शकते आणि त्वचेचा कोरडेपणा घालवण्यातही ती फायदेदायी ठरते.
आंब्यांच्या सालीचे त्वचेसाठी फायदे
अँटी एजिंग : आंब्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचेला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात. तसेच कमी वयात चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या रिमूव्ह करतात आणि त्वचा तरुण आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
अँटी अॅक्नी : आंब्याच्या सालीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे ते मुरुमांवर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरते. हे मुरुमांशी संबंधित जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यास देखील मदत करते. (Health)
एक्सफोलिएटिंग : आंब्याच्या सालीमध्ये असलेले एन्झाईम्स त्वचेला हळूवारपणे एक्सफोलिएट करण्यात, त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यात आणि त्वचा नितळ आणि मऊ बनविण्यात मदत करू शकतात.
डिस्क्लेमर - येथे दिली गेलेली माहिती घरघुती उपाय आणि सामान्य माहितीवर आधारलेली आहे. उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला एकदा नक्की घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.