पांढऱ्या कांद्याचे फायदे Esakal
आरोग्य

White Onion खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

लाल कांदयाचं सेवन हे देखील आरोग्यासाठी Health फायदेशीर आहे. मात्र त्याचप्रमाणे आहारामध्ये पांढऱ्या कांद्याचा समावेश केल्यास तुम्हाला आरोग्याचे अनेक फायदे मिळू शकतात

Kirti Wadkar

कांदा हा साधारण सर्वच भारतीयांच्या स्वयंपाकामध्ये Cooking वापरला जाणारा महत्वाचा घटक आहे. जवळपास सर्वच पदार्थांमध्ये कांदा वापरला जातो. मग एखादी भाजी असो, आमटी किंवा चिकन आणि मटन ग्रेव्ही कांद्याचा वापर हमखास केला जातो. Marathi Health and Diet tips Use of white onion

एवढचं नव्हे तर चटणीमध्ये किंवा सलादमध्ये Salad शिवाय जेवताना देखील कच्चा कांदा खाणं अनेकजण पसंत करतात. खरं तर कांद्याच्या Onion अनेक जाती आहे. मात्र स्वयंपाकासाठी खास करून लाल कांद्याचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो.

लाल कांदयाचं सेवन हे देखील आरोग्यासाठी Health फायदेशीर आहे. मात्र त्याचप्रमाणे आहारामध्ये पांढऱ्या कांद्याचा समावेश केल्यास तुम्हाला आरोग्याचे अनेक फायदे मिळू शकतात White Onion Benefits.

पांढऱ्या कांद्याच्या नियमित सेवनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होवू शकतात. खास करून महिलांमध्ये वाढत जाणारी इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्वाची समस्या दूर करण्यासाठी तसचं ब्लड शुगर Blood Sugar नियंत्रणात ठेवण्यासोबतच पांढऱ्या कांद्याच्या सेवनाचे इतर अनेक फायदे आहेत.

पांढऱ्या कांद्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स, सॅच्युरेटेड फॅट, फायबर, पाणी, प्रथिने, व्हिटॅमिन ए आणि सी ही पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात. त्याचप्रमाणे कच्च्या कांद्यामध्ये कॅलरीचं प्रमाण अत्यंत कमी असतं.

हे देखिल वाचा-

पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत- पांढऱ्या कांद्याच्या सेवनामुळे तुमच्या पचनासंबधीच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. यामध्ये प्रोबायोटिक्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने पचन सुधारण्यास मदत होते.

याशिवाय पांढऱ्या कांद्यामध्ये प्रीबायोटिक इन्युलिन आढळतं, ज्यामुळे पोटात चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढण्यास मदत होते.

ब्लड शुगर राहते नियंत्रणात- पांढऱ्या कांद्यामध्ये क्रोमियम आणि सल्फरचं प्रमाण अधित असल्याने ब्लड शुगर नियंत्रणात आणण्याचं कार्य सुरळीतपणे होतं. अभ्यासानुसार मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नियमितपणे सफेद कांद्याचं सेवन करावं.

हाडं मजबूत राहतील - खास करून वाढत्या वयामध्ये हाडांच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी या समस्या दूर करण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे पांढऱ्या कांद्याचा समावेश केल्यास ते उपयुक्त ठरू शकतं.

पाढऱ्या कांद्याच्या सेवनामुळे ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. तसचं White Onion च्या सेवनामुळे अँटीऑक्सिडंट लेव्हल बूस्ट होण्यास मदत होते. ज्यामुळे हाडं मजबूत होतात. तसचं हाडांची डेंसिटी म्हणजेच घनता देखील बूस्ट होण्यास मदत होते.

कॅन्सरचा धोका दूर- पांढऱ्या कांद्यामध्ये सल्फर कंपाउंड तसंच फ्लेवोनॉइड अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी लढण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसंच पांढऱ्या कांद्याच्या सेवनाने ट्युमरचा धोका देखील कमी होतो.

निरोगी हृदयासाठी फायदेशीर- पांढऱ्या कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि केमिकल्समुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. तसचं या कांद्याच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल Cholesterol नियंत्रणात राहण्यासही मदत होते.

यातील तत्वांमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या दूर होते. तसचं रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

हे देखिल वाचा-

अनिद्रा आणि तणाव होईल दूर- जर तुम्ही तणावात असाल किंवा तुम्हाला रात्री तणावामुळे झोप लागण्यास अडचण निर्माण होत असेल तर सफेद कांद्याचं सेवन तुम्हाला फायदेशीर ठरेल.

पांढऱ्या कांद्यामध्ये एल-ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड आढळतं जे सीडेटिव्ह म्हणून काम करत ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. तसचं तुम्हाला रात्री चांगली झोप लागू शकते.

याचसोबत केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि संसर्गजन्य आजार दूर करण्यासाठी देखील पांढऱ्या कांद्याचं सेवन उपयुक्त ठरतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT