High Blood Pressure वर गुणकारी दूधी भोपळा Esakal
आरोग्य

Hight Blood Pressureच्या रुग्णांसाठी दूधी भोपळा वरदान, अनेक समस्या होतील दूर

हृदय निरोगी राहण्यासाठी Heart Health दुधीचं सेवन फायदेशीर ठरतं. खास करून High Blood Pressure असलेल्या रुग्णांसाठी दुधीच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. दुधीतील कोणते घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत ते जाणून घेऊयात

Kirti Wadkar

दूधी भोपळ्याचं नाव ऐकताच अनेकजण नाक मुरडातात. कायम अनेकांना जेवणात नकोश्या वाटणाऱ्या दूधी भोपळ्याच्या भाजीचे मात्र आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. खास करून हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब High BP असलेल्या रुग्णांसाठी दूधीच्या सेवनाचे विविध फायदे आहेत. Marathi Health Tips Benefits of Milk Pumpkin to High Blood Pressure Patients

दूधीमध्ये अत्यंत कमी कॅलरी असून मोठ्या प्रमाणात पोटॅशियम उपलब्ध असल्याने रक्त प्रवाह Blood Flow नियंत्रणात राहण्यास मदत होते. दुधीमध्ये असलेल्या पोटॅशियममुळे स्नायू अवघडण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

तसंच हृदय निरोगी राहण्यासाठी Heart Health दुधीचं सेवन फायदेशीर ठरतं. खास करून उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी दुधीच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. दुधीतील कोणते घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत ते जाणून घेऊयात.

फायबरचं प्रमाण जास्त

दुधी भोपळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर उपलब्ध असल्याने शरीरातील फॅट्सची चयापचय क्रिया जलद होते. ज्यामुळे शरीरात फॅट्स साचत नाहीत. तसंच दुधीतील फायबर फॅट्ससोबतच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर टाकतं. तसंच दुधीतील फायबरमुळ पोट जास्त वेळ भरलेलं राहतं असल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि रक्तदाब वाढण्याची समस्या कमी होते.

दुधीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी

दूधी भोपळ्यामध्ये मोठ्य़ा प्रमाणात पाण्याचं प्रमाण आढळतं. यामुळे शरीरातील नसांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. खास करून दूधी भोपळ्याच्या सेवनानंतर यातील पाणी रक्तामध्ये मिसळल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगल होतं आणि हृदयावरील दाब कमी होण्यास मदत होते. तसंच शरीराला पुरेस पाणी मिळाल्याने शरीरात सोडियमचं प्रमाण निय़ंत्रणात राहण्यास मदत होते. यासाठीच जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर आहारामध्ये दूधी भोपळ्याचा समावेश नक्की करा.

हे देखिल वाचा-

उच्च रक्तदाबासाठी असं करा दूधी भोपळ्याचं सेवन

उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास दूधी भोपळ्याच्या ज्यूसचं सेवन जास्त फायदेशीर ठरू शकतं. ज्यूस तयार करण्यासाठी सर्व प्रथम ताज्या दूधी भोपळ्याचे सालासह तुकडे करा. हे दुधीचे तुकटे एका ब्लेंडरमध्ये टाका. त्यानंतर त्यात पुदीन्याची काही पानं, कोथिंबीर टाकून ग्राइंड करा. हा ज्यूस एका गाळण्याच्या किंवा कापडाच्या मदतीने गाळून घ्या. या ज्यूसमध्ये थोडा लिंबाचा रस टाकून सकाळी या ज्यूसचं सेवन करा.

दुधीचं सेवन करण्यापूर्वी ही काळजी घ्या

दूधी भोपळ्याच्या ज्यूसचं किंवा दुधीचं सेवन करण्यापूर्वी एका गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. कधीही दूधी भोपळा कापल्यानंतर त्याचा एक लहानसा तुकडा चाखून पहा. दूधी चवीला कडू लागल्यास अशा दूधीचं सेवन करू नका. अन्यथा आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: तेल्हाऱ्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई, रोख रक्कम आणि दोन मोबाईल जप्त

Nashik Vidhan Sabha Election 2024 : माझे वोट, माझी ताकद! पोलिस आयुक्तांचे मतदानाचे आवाहन

Ajit Pawar : विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका? वाचा काय म्हणाले अजित पवार

Sindhudurg Assembly Election 2024 : मतदानासाठी ओळखपत्र सोबत नेणे बंधनकारक

अर्ध्यावरती डाव मोडला! २९ वर्षांनी एन आर रहमान व सायरा बानू यांचा घटस्फोट, निवेदन जाहीर करत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT