टुथब्रशचा वापर Esakal
आरोग्य

Oral Health : एकच टूथब्रथ तुम्ही किती दिवस वापरताय? वेळीच बदला नाहीतर होतील दुष्परिणाम

अनेक दिवस एकच ब्रश वापरणं हे तुमच्या दातांसाठी आणि एकंदरच ओरल हेल्दसाठी अजिबात योग्य नाही. यामुळे तुमचे दात तर स्वच्छ होणार नाहीच शिवाय इन्फेक्शनचा धोका वाढण्याची शक्यता बळावते

अमित गोळवलकर

आपल्या आरोग्याची काळजी घेत असतानाच सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमच्या दातांची योग्य ती काळजी घेणं. अनेकदा आरोग्याची काळजी घेत असताना दात किंवा तोंडाच्या आरोग्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. मात्र दातांची योग्य काळजी न घेतल्यास दात Teeth खराब होण्यासोबतच आरोग्याच्या Health इतर समस्यादेखील निर्माण होवू शकतात. Marathi Health Tips Change your Toothbrush for good oral health

दातांची काळजी Dental Care घेत असताना नियमित दिवसातून दोन वेळेस तरी ब्रश करणं म्हणजेच दात घासणं गरजेचं आहे. यामुळे दात आणि तुमची ओरल हेल्द Oral Health चांगली राहते. अर्थात दात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वापरत असलेला टुथब्रश ToothBrush महत्वाची भूमिका बजावतो. काही लोक योग्य प्रकारे ब्रश करत नाहीत तर काही दीर्घ काळासाठी एकच ब्रश दात घासण्यासाठी वापरतात. 

अनेक दिवस एकच ब्रश वापरणं हे तुमच्या दातांसाठी आणि एकंदरच ओरल हेल्दसाठी अजिबात योग्य नाही. यामुळे तुमचे दात तर स्वच्छ होणार नाहीच शिवाय इन्फेक्शनचा धोका वाढण्याची शक्यता बळावते. यासाठी टुशब्रश नेमका किती दिवसांनी बदलावा हे तुम्हाला ठाऊक असणं गरजेचं आहे. 

टुथब्रश कधी फेकावा

American Dental Association नुसार दर तीन महिन्यांनी टुथब्रश बदलणं गरजेचं आहे. तीन महिन्यांनी ब्रशचे ब्रिसल्स तुटू लागतात ज्यामुळे योग्य प्रकारे दात साफ होत नाहीत. या  शिवाय यामुळे बॅक्टेरियल इफेंक्शन होण्याचा धोका देखील वाढतो. 

वेळेनुसार आपल्या टुथब्रशवर किटाणू जमा होवू लागतात आणि दात तसचं तोंडाशी संबंधित इतर समस्या निर्माण होवू शकतात. change your toothbrush every 3 months

हे देखिल वाचा-

दर तीन महिन्यांनी ब्रश न बदलल्यास होतील दुष्परिणाम

जर तुम्ही तीन महिन्यांनी ब्रश बदलला नाही तर ब्रिसल्समध्ये toothbrush bristles देखील बॅक्टेरिया आणि फंगस म्हणजेच बुरशी विकसित होवू शकते. असा ब्रश जर तुम्ही वापरत असाल तर तुमच्या तोंडामध्ये गंभीर इंफेक्शन निर्माण होवू शकतं ज्यामुळे वेळोवेळी माऊथ अल्सर होवू शकतं. तसचं फंगल इंफेक्शनचा धोकाही वाढतो. 

दर महिन्यांनी टूथब्रश बदलणं तर गरजेचं आहेच. मात्र याशिवाय तुम्ही जर एखाज्या आजारातून बरे होत आहात तर त्यानंतरही टूथब्रश बदलणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे एखाद्या आजारी व्यक्तीचे आपण चादरी किंवा उशीची कव्हर बदलतो अगदी त्याचप्रमाणे टूथब्रश बदलणं गरजेचं आहे. आजारातून बरे झाल्यानंतरही तुम्ही तोच आजारपणातील टूथब्रश वापरत असाल तर पुन्हा संक्रमण होण्याची शक्यता असते. Dental care 

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही आजारातून बरे झाल्यानंतरही टूथब्रश बदलणं गरजेचं आहे. खास करून वायरल आजारांमध्ये ही काळजी घ्यावी. 

आजारी असताना रुग्ण जेव्हा ब्रश करतो तेव्हा इन्फेक्टेड बॅक्टेरिया ब्रशमध्ये चिटकून राहण्याची शक्यता असते. तो पुन्हा बरा झाल्यावरही जुनाच ब्रश वापरत असेल तर पुन्हा आजारी होण्याची शक्यता वाढते. Replace Your Toothbrush

व्हायरल इंफेक्शन, स्किन इंफेक्शन तसचं इतर कोणत्याही संसर्गजन्य आजारानंतर जर एखादी व्यक्ती बरी होत असेल तर त्याने टूथब्रश बदलावा. यामुळे रुग्णाला तर पुन्हा आजारी होण्याची शक्यता असतेच. मात्र जर घरातील सर्व सदस्यांचे ब्रश एकाच ठिकाणी ठेवले जात असतील तर  यामुळे घरातील इतर लोकांना इन्फेक्शन होण्याची शक्यता बळावते. Oral care

हे देखिल वाचा-

टूशब्रशची घ्या योग्य काळजी

दर तीन महिन्यांनी किंवा आजारपणानंतर टूशब्रश बदलण्यासोबत टूथब्रशची योग्य काळजी घेणं दातांच्या आणि तोंडाच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. यासाठी Toothbrush care

  • घरातील सर्व सदस्यांचे  टूथब्रश ठेवताना ते एकमेकांपासून दूर सरळ ठेवावेत.  

  • प्रत्येक वापरानंतर टूशब्रश स्वच्छ धूवून कोरडा करून ठेवावा.

  • तसच प्रवासा दरम्यान टूथब्रशला कॅप लावावी जेणेकरून तो स्वच्छ राहिल आणि इन्फेक्शनचा धोका कमी होईल.

  • अधून मधून टूथब्रश गरम पाण्यात थोडं मीठ टाकून  या मिठाच्या पाण्यात ५ मिनिटं बुडवून ठेवून स्वच्छ धुवावा. यामुळे तो स्वच्छ राहिल.

अशा प्रकारे नियमितपणे तुमचा टूथब्रश बदलल्यास तुमचे दात तर चमकदार राहतीलच शिवाय दातांच्या आणि तोंडाच्या आजारांचा धोका कमी होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT