excess protein symptoms: शरीरामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन Protine असणं गरजेचं आहे. बळकट स्नायूंसोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रोटीन गरजेच आहे. तसचं वजन कमी करण्यासाठी किंवा स्नायू बळकट करण्यासाठी, जीममध्ये Gym वर्क आउट करणाऱ्यांसाठी प्रोटीन युक्त आहाराचं सेवन गरजेचं आहे. Marathi Health Tips Excess Protine may prove harmful
पण तुम्हाला माहित आहे का गरजेपेक्षा जास्त प्रोटीन शरीरासाठी हानिकारक छरू शकतं. जास्त शरीरात प्रोटीनचं Protine प्रमाण वाढल्यास वजन कमी होण्याएवजी ते वाढू शकतं Weight Gain . तसचं किडनी आणि हाडांच्या Bones समस्या निर्माण होऊ शकतात.
शरीराला प्रोटीनची किती आवश्यकता आहे हे व्यक्तीचं वजन आणि तो दिवसाला किती कॅलरीज घेतो यावर ठरतं. समजा एखादी व्यक्ती दिवसात २००० कॅलरीज असलेला आहार घेतो. तर त्यात ६०० कॅलरी या प्रोटीनने तयार झालेल्या असतात. अशात एका व्यक्तीला ६० ते १०० ग्रॅम प्रोटीनचं सेवन करणं गरजेचं आहे.
वेगवेगल्या प्रकारच्या अमिनो ऍसिडपासून शरिरासाठी आवश्यक असलेलं प्रोटीन तयार होतं. यातील १० अमीनो ऍसिड आपलं शरीर तयार करतं. तर इतर १० अमीनो ऍसिड य़ोग्य आहार आणि इतर पोषक तत्वांनी तयार होतात. यासाठीच प्रोटीनयुक्त आहार घेण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो.
अनेकदा कमी काळात वजन कमी कऱण्यासाठी बरेचजण आहारात जास्त प्रोटीनचा समावेश करतात. मात्र गरजेपेक्षा जास्त प्रोटीन शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. यामुळे शरीरावर काही दुष्परिणाम होवू शकतात.
हे देखिल वाचा-
वजन वाढणं- वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही अतिरिक्त प्रमाणात प्रोटीनयुक्त आहार घेत असाल तर काही वेळेस वजन कमी होण्याएवजी ते वाढू शकतं. गरजेपेक्षा जास्त प्रोटीन शरीरात झाल्यास फूड क्रेव्हिंग म्हणजेच सतत काही ना काही खाण्याची इच्छा वाढू शकते. यामुळे तुम्ही सतत काही ना काही खाल्ल्याने वजन वाढू शकतं.
बद्धकोष्ठता- प्रोटीन हे पचनासाठी जड असतं. जास्त प्रोटीनयुक्त आहारामुळे ते पचनास अडचण निर्माण होवू शकते यामुळे बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते. तसंच योग्य पचन न झाल्याने ब्लोटिंग म्हणजे पोटफुगीचा त्रास होवू शकतो.
किडनी- शरीरामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढल्यास त्याचा परिणाम किडनीवरही होऊ शकतो. किडनीमध्ये जास्त प्रोटीन जमा झाल्याने तुमच्या पोटामध्ये ऍसिडिक स्थिती निर्माण होते. ज्यामुळे तुम्हाला वारंवार लघवीला होऊ शकते. यामुळेच ज्यांना आधीपासूनच किडनीच्या काही समस्या असतील त्यांनी योग्य प्रमाणातच प्रोटीनयुक्त आहार घ्यावा.
तर एका संशोधनानुसार प्लान्ट बेस्ड प्रोटीनपेक्षा नॉन-डेअरी एनिमल प्रोटीन म्हणजेच चिकन, मटण, अंडी किंवा विविध मांसामधून मिळणारं प्रोटीन हे किडनीच्या कार्यावर हानिकार प्रभाव टाकत असतं.
डिहायड्रेशन- जास्त प्रोटीनमुळे तुम्हाला जास्त तहान लागू शकते अशात जर तुम्ही कमी पाणी प्यायलात तर डिहायड्रेशन होवू शकतं. तसंच यामुळे किडनीस्टोन होण्याचा धोका वाढतो.
हाडं कुमकवत होणं- जास्त प्रथिनंयुक्त आहार घेतल्याने हाडांवर दुष्परिणाम होऊ शकतो. यामुळे ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis) किंवा हाडांमध्ये वेदना होण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. शरीराच प्रोटीनचं प्रमाण वाढल्यास त्याचा परिणाम म्हणून शरिराचील कॅल्शियम कमी होऊ लागतं.
कर्करोगाचा धोका वाढतो- आहारत जर काही जास्त प्रमाणात प्रथिनं असलेल्या पदार्थांचा समावेश केला तर कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. खास करून रेड मीड म्हणजेच लाल मासांमुळे हा धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.
यासोबतच प्रोटीनचं अधिक सेवन केल्याने खकवा जाणवतो. काही वेळेला नैराश्य देखील जाणवू शकतं. यासाठीच आहारात गरजेक्षा जास्त प्रोटीन घेतलं जाणार नाही याची खबरदारी बाळगा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.