पिरिएडस् फ्लो मधले बदल Esakal
आरोग्य

Periods Flow मध्ये बदल जाणवल्यास त्वरित घ्या डॉक्टरांचा सल्ला

मासिक पाळीतील ब्लड फ्लो कमी असल्यास ते शरीरातील रक्ताच्या कमतरतेचे संकेत असू शकते. तर जास्त बल्ड फ्लो म्हणजे हार्मोनल बॅलेन्स Hormonal Balance बिघडल्याचं लक्षण असू शकतं.

Kirti Wadkar

पिरिएड्स म्हणजेच मासिक पाळी Menstrual Cycle आणि महिलांच्या आरोग्याचा खूप जवळचा संबंध असतो. नियमितपणे येणाऱ्या मासिक पाळीसोबत मासिक पाळीतील इतर अनेक लक्षणांचा महिलांच्या आरोग्याशी Women Health संबध आहे. Marathi Health Tips For Women Consult Doctor if blood flow in menstrual cycle changes

प्रत्येक महिलेमध्ये मासिक पाळीशी Menstrual Cycle संबंधित वेगवेगळी लक्षणं दिसून येतात. यात मासिक पाळीचं चक्र, मासिक पाळीचे दिवस तसचं मासिक पाळीतील ब्लड फ्लो, यांचा समावेश असतो. मासिक पाळी नियमित येण्यासोबतच मासिक पाळीतील ब्लड फ्लो Blood Flow योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे.

मासिक पाळीतील ब्लड फ्लो कमी असल्यास ते शरीरातील रक्ताच्या कमतरतेचे संकेत असू शकते. तर जास्त बल्ड फ्लो म्हणजे हार्मोनल बॅलेन्स Hormonal Balance बिघडल्याचं लक्षण असू शकतं. जर तुम्हाला देखील पिरिएड्सच्या फ्लोमध्ये बदल जाणवला तर यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

मासिक पाळीतील कमी ब्लड फ्लो- मासिक पाळीमध्ये कमी ब्लड फ्लो असणं यासाठी विविध कारणं जबाबदार आहेत. अनेकदा हार्मोन्सचं संतुलन बिघडल्याने ब्लड फ्लो कमी होतो. तर काही वेळा तणाव, चुकीचा आहार, वजनातील बदल आणि पीसीओएस सारख्या समस्येमुळे ब्लड फ्लो कमी होतो.

काही वेळेस मासिक पाळीत ब्लड फ्लो कमी दिसणं हे सामान्य लक्षण आहे. मात्र सलग काही महिने ब्लड फ्लो कमी असल्यास गायनॅकॉलोजिस्ट म्हणजेच स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. काही वेळेस फक्त स्पाॅटिंग होणं हे एक्टोपिर प्रेग्नेंसीचं लक्षण असू शकतं.

हे देखिल वाचा-

मध्यम ब्लड फ्लो- अधिक जास्त किंवा अधिक कमी ब्लड फ्लो नसणं म्हणजेच मध्यम ब्लड फ्लो ही एक सामान्य आणि हेल्दी मासिक पाळीचं लक्षण आहे. जर तुम्ही menstrual cup मेंस्ट्रुअल कप वापरत असाल तर दिवसातून २०-३० मिली ब्लड जाणं हे सामान्य लक्षण आहे. म्हणजेच दिवसातून जर तुम्ही दर ४ तासांनी पॅड बदलत आहात तर हे देखील सामान्य लक्षण आहे.

हेवी ब्लड फ्लो- जर मासिक पाळीमध्ये तुम्हाला हेवी म्हणजेच ८० मिलीहून अधिक ब्लड फ्लो असेल तरच ब्लड क्लॉट्स देखील असतील तर मात्र तुम्हाला वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वारंवार पॅड्स बदलावे लागत असतील किंवा तुम्हाला मासिक पाळी दरम्यान उलटी, मळमळ, पाठीत आणि पोटात असह्य वेदना होत असतील तर हे हेवी पिरियड्समुळे होत असतं.

तसंच जर तुमची मासिक पाळी किंवा ब्लिडिंग ७ दिवसांहून अधिक काळ होत असेल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

पिरिएड्सचा फ्लो योग्य राहण्यासाठी नियमित व्यायाम किंवा योगा करणं आणि योग्य आहार घेणं गरजेचं आहे. खास करून महिलांनी आयर्नयुक्त आहार घेणं गरजेचं आहे. तसंच अनेकदा काही औषधांच्या सेवनामुळे, पेनकिलर्सच्या अतिसेवनामुळे देखील परियड्च्या फ्लोवर परिणाम होत असतो. शिवाय मासिक पाळीचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने ब्लड फ्लोमध्ये काही बदल जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT