leg swelling reasons Esakal
आरोग्य

पायावर सतत Swelling होतंय?... मग या उपायांनी दूर होईल समस्या

leg swelling reasons: पायावर सूज येण्यासाठी अनेक कारणं जबाबदार असू शकतात. अनेकदा किडनीचे आजार, मधुमेह किंवा हृदयाशी संबधींत समस्यांमुळेही Heart Related Problems पायांवर सूज येऊ शकते

Kirti Wadkar

दररोज प्रवास केल्यानं किंवा रोजच्या धावपळीत अनेकदा पायावर सूज येऊ शकते. ही खरं तर एक सामान्य समस्या Common Health Problem आहे. मात्र काहीजणांच्या पायांवर सतत सूज येत असल्याने दररोजच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. Marathi Health Tips How to Treat Legs Swelling

अनेकदा पायावर सूज Leg Swelling येतेच शिवाय वेदना देखील होतात. पाय दुखत Pains राहिल्याने रोजची कामं करणं कठीण होतं. अनेकदा पायावर सतत सूज आणि वेदनांमुळे एखाद्या कामात लक्ष केंद्रीत करणं कठिण होतं. खास करून अनेकदा सकाळच्या वेळी पायावर सूज दिसते. तर रात्री पायांमध्ये प्रचंड वेदना होतात.

पायावर सूज येण्यासाठी अनेक कारणं जबाबदार असू शकतात. अनेकदा किडनीचे आजार, मधुमेह किंवा हृदयाशी संबधींत समस्यांमुळेही Heart Related Problems पायांवर सूज येऊ शकते.

यामुळे याकडे दूर्लक्ष करू नका. काही घरगुती उपायांच्या मदतीने ही समस्या दूर करणं शक्य आहे. केवळ स्वयंपाक घरातील काही पदार्थांच्या मदतीने पायावरील सूज कमी करणं शक्य आहे.

मोहरीचं तेल- साधारण काही घरांमध्ये स्वयंपाकासाठी मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. याच तेलाच्या मदतीने पायावरील सूज कमी करणं शक्य आहे. यासाठी मोहरीचं तेल थोडं कोमट करून या तेलाने पायावर सूज आलेल्या ठिकाणी हलक्या हाताने मालिश करा. यामुळे सूज कमी होण्यास मदत होईल.

लिंबाचा रस- लिंबाचा रसदेखील सूज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. सूज जास्त वाढल्यास आणि वेदना वाढल्यास सूज आलेल्या भागावर लिंबाचा रस लावल्यास वेदना कमी होण्यास मदत होईल.

तसंच लिबू पाण्याच्या सेवनामुळे देखील तुम्हाला आराम पडेल. लिंबू पाण्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स आणि अतिरिक्त पाणी शरीराबाहेर पडण्यास मदत होते. यामुळे पायावरील सूज कमी होण्यास मदत होईल.

हे देखिल वाचा-

तुरटी आणि हळद- हळदीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळतात. जखम भरून निघण्यासोबत सूज कमी करण्यासाठी देखील हळद गुणकारी आहे. यासाठी चमचाभर हळद घेऊन त्यात तुरटीची पावडर तयार करून अर्धा चमचा तुरटी पावडर मिसळावी.

हळद आणि तुरटीच्या पाव़डरमध्ये किंचित पाणी किंवा नारळाचं तेल मिसळून लेप तयार करावा. हा लेप पायावर सूज आलेल्या ठिकाणी लावून ठेवावा. यामुळे फायदा होईल.

सैंधव मीठ- रॉक सॉल्ट म्हणजेच सैंधव मीठामध्ये हायड्रेटेड मॅग्नेशियम सल्फाइडचे क्रिस्टल्स असतात. जे स्नायूंचं दुखणं कमी करून त्वरित आराम देतात.

यासाठी एका बादलीत किंवा टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात अर्धा कप सैंधव मीठ टाका. आता या गरम पाण्यामध्य १०-१५ मिनिटांसाठी पाय बुडवून बसा. झोपण्यापूर्वी रोज अशा प्रकारे पाय शेकल्याने सूज ओसरेल.

या काही लेपांच्या मदतीने पायांची सूज तर कमी होईलच शिवाय काही पदार्थ्यांच्या सेवनामुळेदेखील पायांवरील सूज कमी होवून वेदना कमी होण्यास मदत होईल.

बार्ली वाटर- बार्ली म्हणजेच जवाच्या पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे पायावरील सूज कमी होण्यास मदत होईल. नियमितपणे या पाण्याचं सेवन करावं.

धण्यांचं पाणी- धणे हे मूत्रवर्धक असल्याने धण्याच्या पाण्याच्या सेवनामुळे पायातील अतिरिक्त पाणी शरीराबाहेर पडण्यास मदत होईल. यासाठी १ ग्लास पाण्यामध्ये २ चमचे धणे चांगले उकळून घ्यावे. त्यानंतर पाणी गार झाल्यावर गाळून या पाण्याचं सेवन करावं. दिवसातून दोनदा या पाण्याचं सेवन केल्यास सूज कमी होईल.

या काही उपायांसोबतच बर्फाचा शेक देखील सूज कमी करण्यास मदत करेल. तसंच रात्री झोपताना पायीखाली उशी घेतल्यानेही सूज कमी होण्यास मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North: काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार बदलला, मधुरीमाराजेंना उमेदवारी

Shivsena Candidate List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर! १५ जणांच्या नावांचा समावेश, दोन जागा मित्रपक्षांना; शायना एनसी यांना उमेदवारी

Pradip Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं बंड! शिवसेनेचा आदेश डावलून पत्नीचा अपक्ष अर्ज भरणार

Chetna Pagydyala : १६ वर्षीय चेतनाने मोडला मिताली राजचा विक्रम; १९७३ सालचा पराक्रमही उध्वस्त, संघाचा ऐतिहासिक विजय

Video Viral: ''शिंदेंनी फसवलं, उद्धव ठाकरेच आमच्यासाठी देव'' उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले; अन्नही सोडलं

SCROLL FOR NEXT