काही वेळेस आरोग्याच्या काही सामान्य समस्या देखील गंभीर ठरू शकतात. यासाठीच अशा सामान्य समस्येची लक्षणं लक्षात घेऊन योग्य काळजी घेणं गरजेचं असतं. यापैकीच एक म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन- यूटीआय अर्थात मूत्रसंसर्ग.
UTI ही एक सामान्य समस्या असली तरी हे इन्फेक्शन जलद गतीने वाढत असल्याने किडनीपर्यंत इन्फेक्शन पसरून किडनचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. मूत्रसंस्थेमध्ये जंतूच्या संक्रमाणामुळे UTI Infection होतं. हे इन्फेक्शन साधारण वाटत असलं तरी मूत्रसंसर्गाकडे दुर्लक्ष करू नये. Marathi Health Tips it may be dangerous to ignore urinary infection
अन्यथा हे इन्फेक्शन ब्लॅडरसोबतच किडनीपर्यंत Kidney पसरू शकतं. ज्यामुळे कंबरेच्या भागात किंवा पाठीमध्ये प्रचंड वेदना होणं, ताप, थंडी आणि उलटी होणं अशा त्रास होवू शकतो.
UTI ची समस्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत असली तरी पुरुषांना देखील मूत्रसंसर्ग होतो. या संसर्गाकडे गांभीर्याने न पाहिल्यास एक किंवा दोन्ही किडनी निकामी होण्याचा धोका वाढू शकतो. खास करून आरोग्याच्या काही इतर समस्या असलेल्या व्यक्तींना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. अशा व्यक्तींनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
डायबेटिस
मधुमेह असलेल्या रुग्णांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच UTI चा धोका अधिक असतो. यामागे कारण म्हणजे जेव्हा शरीरात ब्लड शुगर जास्त होते तेव्हा ती मूत्रावाटे शरीराबाहेर पडते. यामुळे हे मूत्र ब्लॅडरमध्ये असताना ब्लॅडरमधील बॅक्टेरिया Bacteria वाढण्याचा धोका अधिक असतो.
यामुळे लघवी करताना जळजळ होते. तसचं वारंवार लघवीला येणं अशा समस्या उद्भवतात. यासाठीच मधुमेह असलेल्या रुग्णांना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.
हे देखिल वाचा-
किडनीच्या समस्या
किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींमध्ये तसंच किडनीच्या इतर समस्या असलेल्या व्यक्तींनाही मूत्रसंसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. अशा समस्या असलेल्या लोकांमध्ये अनेकदा मूत्र मार्गात अडथळा निर्माण झाल्याने बॅक्टेरिया वाढून इन्फेक्शन वाढू शकतं. जर तुम्हाला वारंवार युटीआय होत असेल तर ही समस्या किडनीमुळे देखील होवू शकते हे लक्षात घेऊ वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
बद्धकोष्ठतेची समस्या
नियमितपणे पोट साफ न होणं किंवा बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे देखील UTI ची समस्या निर्माण होवू शकते. बद्धकोष्ठतेमुळे मूत्राशय पूर्णपणे रिकामं होणं कठिण होतं. यामुळे जिवाणू आणि संसर्ग वाढण्यास जास्त वेळ मिळतो आणि मूत्रसंसर्ग होतो.
तसंच अतिसारामुळे देखील UTI चा धोका वाढतो. अशा स्थितीत मलाद्वारे जिवाणू मूत्रमार्ग आणि योनीमध्ये प्रवेश कऱण्याची शक्यता वाढते. यासाठीच प्रत्येकवेळी बाथरूमचा वापर केल्यानंतर प्रायव्हेट पार्ट स्वच्छ धुणं गरजेचं आहे.
मासिक पाळीतील अस्वच्छता
महिलांमध्ये मासिक पाळीतील अस्वच्छता हे युटीयआयसाठी एक मोठं कारण आहे. खास करून महिलांना दर महिन्याला पाळी येत असल्याने वेळोवेळी मूत्रसंसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. यासाठीच मासिक पाळी दरम्यान महिलांनी स्वच्छतेच्या बाबतीत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
तसंच व्हजायनल हायजीनसाठी खास काळजी घेणं गरजेचं आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात पाण्याचं सेवन करण्यासोबतच नारळपाणी किंवा दह्याचं सेवन करून शरीराचं पीएच नियंत्रणात राखल्यास हा धोका टाळता येणं शक्य आहे.
अशा प्रकारे महिलांसोबतच मधुमेही रुग्ण किंवा किडनीची समस्या असलेल्या व्यक्तींना मूत्रसंसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने अशा व्यक्तींनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
हे देखिल वाचा-
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.