Jute Leaves recipe  Esakal
आरोग्य

ही रानभाजी आहे आरोग्यासाठी गुणकारी, युरिक ऍसिडसह ते कोलेस्ट्रॉल अनेक समस्या होतील दूर

Ranbhaji Recipe: पोटासंबधी अनेक समस्या दूर करण्यासाठी तागाच्या पानांच्या भाजीचं सेवन उपयुक्त ठरतं. तेव्हा आज आपण या भाजीचे फायदे आणि तिची खास रेसिपी जाणून घेणार आहोत

Kirti Wadkar

Wild Vegetable Recipe: आजही अनेक भागांमध्ये अशा अनेक रानभाज्या आढळतात ज्यांकडे फारसं लक्ष दिलं जातं. नाही मात्र या रानभाज्यांचे आरोग्यासाठी Health अनेक फायदे आहेत. यापैकी अनेक रानभाज्या या वेगवेगळ्या मौसमात दिसून येतात. Marathi Health Tips Jute Leaves Subzi good for Health

या सिझनल म्हणजेच मोसमी रान भाज्यांच्या Vegetables सेवनामुळे काही आजाराना दूर करणंही शक्य आहे. यापैकीच एक भाजी म्हणजे तागाच्या पानांची Jute Leaves भाजी.  भारतातील अनेक भागांमध्ये ही भाजी पट्टशाक किंवा पटुआ शाक आणि बडी जूट नावाने ओळखली जाते. 

खास करुन बिहार, बंगाल आणि डोंगराळ भागांमधील लोक या आहारामध्ये Diet या भाजीचं सेवन करतात. खास करुन उन्हाळ्यामध्ये या भाजीचं सेवन केलं जातं.

पोटासंबधी अनेक समस्या दूर करण्यासाठी या भाजीचं सेवन उपयुक्त ठरतं. तेव्हा आज आपण या तागाच्या पानांच्या भाजीचे फायदे आणि तिची खास रेसिपी जाणून घेणार आहोत. 

तागाच्या पानांची भाजी कशी बनवावी?

तागाच्या पानांची भाजी उन्हाळ्यामध्ये बाजारात उपलब्ध होते. त्यानंतर ही भाजी स्वच्छ निवडून धुवावी. त्यानंतर दोन कच्च्या कैऱ्या कापून घ्या. तागाची भाजी आणि कैऱ्या एकत्र शिजवून घ्या. तुम्ही कुकरलादेखील भाजी आणि कैऱ्या शिवजून घेऊ शकता. 

शिजलेल्या भाजीतील पाणी बाजूला काढावं. त्यानंतर भाजी आणि कैऱ्या कुस्करुन घ्याव्या. कढईत २ चमचे तेल गरम करा. यात बारीक केलंल लसूण, बारीक चिरलेला कांदा आणि मिरची चांगली परतून घ्या. त्यानंतर शिजलेली भाजी त्यात टाका.

बाजूला काढलेलं पाणी देखील त्यात टाकावं. भाजी २-३ मिनिटं पुन्हा शिजवावी. त्यात १ चमचा दही टाकावं. त्यानंतर गॅस बंद करावा. अशा प्रकारे तुमची भाजी तयार होईल. 

हे देखिल वाचा-

तागाच्या भाजीतील पोषक तत्व

व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने समृद्ध तागाच्या  पानांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.

यामध्ये विटामिन बी गटातील थायमिन, रिबोफ्लेविन आणि नियासिन ही जीवनसत्व आढळतात. तसचं यातील क्षारांमध्ये प्रथिनांसह लोह, जस्त, मॅग्नेशियम, क्रोमियम, सेलेनियम, तांबे देखील आढळतं.

तागाच्या भाजीचे फायदे

  1. युरिक ऍसिडची समस्या होते दूर- युरिक ऍसिडची समस्या असलेल्यांसाठी तागाच्या भाजीच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. या भाजीच्या सेवनाने प्रोटीन मेटाबोलिज्म जलद होतं. तसचं प्युरिन पचण्यास मदत होते. यामुळे शरीरामध्ये युरिक ऍसिड साठून राहत नाही. यासाठी आठवड्यात २-३ वेळा तरी तागाच्या भाजीचं सेवन करावं. 

  2. नाकातून रक्त येत असल्यास- उन्हाळ्यामध्ये नाकातून रक्त येण्याची समस्या अनेकांना भेडसावते. अशा वेळी तागाच्या भाजीचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. ही भाजी शरीरासाठी थंड असते. या भाजीमध्ये आयरनचं प्रमाण जास्त असल्याने अनेक समस्या दूर होतात. तसचं शरीर हायड्रेट ठेवण्यासही तागाची भाजी मदत करते. 

  3. पोटाच्या विविध समस्या होतील दूर- तागाच्या भाजीने पोटाला थंडावा मिळतो शिवाय या भाजीमुळे आतड्यांचं कार्य सुधारतं. तसचं ही भाजी शरीरातील डायडेस्टिव्ह इंजाइम्स दूर करते ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात. यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि मळमळ यांसारखे त्रास कमी होतात. 

तागाच्या भाजीचे इतर फायदे

  • तागाची भाजी हेमोलाइटिक अॅनिमियाच्या उपचारात उपयुक्त असल्याचे आढळलं आहे.

  • या भाजीमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

  • पटुआ साग हे मधुमेहविरोधी असून यकृताला संरक्षण देण्याचं काम करतं. 

  • तसचं मूत्राशयातील स्टोनची समस्या दूर करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. 

असे अनेक गुणधार्म तागाच्या भाजीमध्ये आढळून येतात ज्यामुळे ती आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला बाजारात ही भाजी आढळून आल्यास तिचं नक्की सेवन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT