दुष्परिणाम हळदीच्या दुधाचेही Esakal
आरोग्य

या व्यक्तींसाठी हळदीचं दूध ठरू शकतं घातक, Turmeric Milk चे दुष्परिणाम माहित आहेत का?

काही आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी हळदीच्या दूधाचं सेवन केल्यास त्यांना फायदे होण्याएवजी आरोग्याचं नुकसान होवू शकतं. यामुळे अशा व्यक्तींना हळदी दूध पिण्यास मनाई केली जाते. कोणत्या व्यक्तींनी हळदीच्या दुधाचं सेवन टाळावं हे जाणून घेऊ यात

Kirti Wadkar

हळदीचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. अगदी पुरातन काळापासून हळदीचा Turmeric औषधी म्हणून उपयोग केला जातो. खास करून सर्दी, पडसं दूर करण्यासाठी तसंच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हळदीच्या दुधाचं सेवन फायदेशीर ठरतं. Marathi Health Tips Know about drawbacks of Turmeric Milk

हळदीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइंफ्लेमेटरी तसंच अँटीसेफ्टीक गुणांमुळे हळदीच्या दूधाच्या सेवनाचे Turmeric Milk शरीराला असंख्य फायदे होतात. हळदीचं दूध आरोग्यासाठी Health उपयुक्त असलं तरी काही व्यक्तींना मात्र हळदीच्या दूधाचं सेवन घातक ठरू शकतं.

काही आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी हळदीच्या दूधाचं सेवन केल्यास त्यांना फायदे होण्याएवजी आरोग्याचं नुकसान होवू शकतं. यामुळे अशा व्यक्तींना हळदी दूध पिण्यास मनाई केली जाते. कोणत्या व्यक्तींनी हळदीच्या दुधाचं सेवन टाळावं हे जाणून घेऊ यात.

हळदीमुळे शरीरातील उष्णता वाढते- हळदीच्या दुधाचं सेवन केल्याने शरीरात गरमी वाढू शकते. हळदीतील मुख्य घटक म्हणजेच करक्यूमिन हे एक गरम अँटीऑक्सिडंट असल्याने पोटातील उष्णता वाढून त्याचा पोटातील अस्तरांवर परिणाम होवू शकतो. यामुळे तोंड येणं, त्वचेवर पुरळ येणं किंवा त्वचेच्या इतर समस्या निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला गरम पदार्थांमुळे पोटात गरम पडत असेल तर अशा व्यक्तींनी हळदीच्या दूधाचं सेवन देखील टाळावं.

यकृत आणि पोटाचे आजार असलेल्या व्यक्ती- हळदीच्या दुधाच्या सेवनामुळे शरीराच्या पीएचवर देखील परिणाम होतो. त्यामुळे कायम हळदीच्या दुधाचं सेवन केल्यास पोटात सूज येणं, अॅसिडीटी किंवा जुलाब अशा पचनासंबंधीत समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.

तसंच ज्या व्यक्तींना यकृताच्या समस्या आहेत अशा व्यक्तींनी हळदीच्या दुधाचं सेवन टाळावं. हळदीच्या दुधामुळे यकृताच्या समस्या अधिक वाढू शकतात.

पित्ताशय काढलेल्या व्यक्ती- पित्ताशय काढून टाकलेल्या व्यक्तींनी हळदीच्या दुधाचं सेवन करू नये. पित्ताशयाचं मुख्य काम हे पित्त साचवणं असतं. मात्र पित्ताशय काढून टाकलेल्या व्यक्तींमध्ये या कार्यप्रणालीवर परिणाम होतो.

हे देखिल वाचा-

हळदीच्या दुधाच्या अतिसेवनाचे इतर दुष्परिणाम-

कोणत्याही पदार्थाचं अतिसेवन हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. त्याचप्रमाणे हळदीच्या दूधाचे आरोग्याला फायदे असले तरी त्याच्या अति सेवनामुळे आरोग्याच्या काही समस्यादेखील निर्माण होवू शकतात.

गरजेपेक्षा जास्त प्रमाणात हळदीच्या दूधाचं सेवन केल्यास शरीरामध्ये अॅलर्जिक रिऍक्शन होवू शकते. यामुळे शरीरावर पुरळ येणं, त्वचेच्या समस्या आणि श्वास घेण्यास त्रास होणं अशा समस्या निर्माण होवू शकतात.

तसंच गर्भवती महिलांनी हळदीच्या दुधाचं सेवन टाळावं. गर्भावस्थेत हळदीच्या दुधाच्या सेवनामुळे पोटात दुखणं, रक्तस्त्राव आणि वेदना निर्माण होवू शकतात.

अति प्रमाणात हळदीच्या दुधाचं सेवन केल्यास शरीरामध्ये आयर्नची कमतरता निर्माण होवू शकते.

अशा प्रकारे आरोग्यासाठी उपयुक्त असलेलं हळदीचं दूध काही व्यक्तींसाठी किंवा काही विशेष स्थितीमध्ये शरीराला हानिकारक ठरू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT