ब्ल्यू टी Esakal
आरोग्य

Blue Teaच्या सेवनाचे आश्चर्यकारक फायदे, वजन होईल झटक्यात कमी आणि हृदय राहील निरोगी

ब्लू टी किंवा बटरफ्लाय पी फ्लावर टीला सध्या अनेकजण पसंती देऊ लागले आहेत. हा चहा भारतातही मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या अपराजिता म्हणजेच गोकर्णाच्या फुलांपासून तयार करण्यात येतो

Kirti Wadkar

भारतात बहुतेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने होते. काहीजण दुधाचा छान उकळलेला बदामी रंगाचा चहा पिणं पसंत करतात. तर काहीजण ब्लॅक टीने दिवसाची सुरुवात करतता. मात्र गेल्या काही वर्षात अनेकजण आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि फिटनेसचा विचार करून चहासाठी विविध पर्याय शोधू लागले आहेत. Marathi Health Tips know about this blue tea and its benefits

यात आता चहाला पर्याय म्हणून किंवा आरोग्यासाठी Health लाभदायक म्हणून ग्रीन टी, हर्बल टी Herbal Tea किंवा केमोमाइल टी अशा वेगवेगळ्या चहाचं अनेकजण सेवन करू लागले आहेत. यातच सध्या चर्चेत आहे ती म्हणजे ब्लू टी. होय निळ्या रंगाचा हा चहा सध्या चांगलाच चर्चेत आहे तो म्हणजे त्याच्या आरोग्यासाठी असलेल्या फायद्यामुळे.

ब्लू टी किंवा बटरफ्लाय पी फ्लावर टीला सध्या अनेकजण पसंती देऊ लागले आहेत. हा चहा भारतातही मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या अपराजिता म्हणजेच गोकर्णाच्या फुलांपासून तयार करण्यात येतो. Blue Tea Benefits

सुंदर जांभळ्या रंगाच्या या फुलांचं महत्व आयुर्देवातही सांगण्यात आलं आहे. या फुलाचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. अगदी मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी तसंच वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेहासाठी ही फुलं गुणकारी ठरतात. शिवाय हा चहा कॅफेन फ्री असल्याने ब्लू टी च्या सेवनाकडे अनेकांची पसंती वाढत असल्याचं दिसून येतंय.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी ब्लू टी अत्यंत फायदेशीर आहे. ब्लू टीच्या सेवनामुळे खास करून बेली फॅट्स म्हणजेच पोटावरील चरबी कमी होवून वजन कमी होण्यास मदत होते. रोज सकाळी केवळ एक कप ब्लू टीचं सेवन केल्यास तुम्हाला लगेचच फरक जाणवेल.

वजन कमी करण्यासोबतच या चहाच्या सेवनामुळे फॅटी लिव्हर संबधीत आजारांवर नियंत्रण मिळवण्यास आणि फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यास मदत होते. blue tea for weight loss

हे देखिल वाचा-

मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत

मधुमेह तसचं शुगरची समस्या असलेल्या रुग्णांना चहापासून कायमच दुरावा निर्माण करावा लागतो. मात्र अशा रुग्णांसाठी ब्लू टी किंवा गोकर्णाचा हा निळा चहा फायदेशीर ठरू शकतो. नुकत्याच झालेल्या एका वैद्यकीय अभ्यासानुसार निळ्या चहाच्या अर्कामध्ये मधुमेहसाठी देण्यात येणाऱ्या औषधांसारखेच मधुमेहविरोधी गुणधर्म असल्याचं सिद्ध झालयं.

त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राखण्यासाठी ब्लू टी फायदेशीर ठरू शकतो. अर्थात यासाठी चहात साखर किंवा कोणत्याही प्रकारचे स्वीटनर न वापरता त्याचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी

या चहाचा सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे या चहाच्या सेवनामुळे तणाव, चिंता दूर होण्यास मदत होते. ब्लू टी मध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स उपलब्ध असतात. ज्यामुळे शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर चमत्कारिक परिणाम दिसून येतो. यामुळे मूड चांगला होण्यास मदत होते आणि तुम्हाला फ्रेश वाटू लागतं.

ब्लू टीच्या सेवनामुळे स्ट्रेस आणि नैराश्य दूर होत असल्याचं अभ्यासातही समोर आलं आहे. यासाठीच अनेक आरोग्य तज्ज्ञ रात्री झोपण्यापूर्वी देखील ब्लू टीच्या सेवनाचा सल्ला देतात. ज्यामुळे तणाव कमी होवून चांगली झोप लागण्यास मदत होते.

हृदयासाठी फायदेशीर

ब्लू टीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. यामुळे शरीराचं इन्फेक्शन पासून संरक्षण तर होतंच शिवाय या चहाच्या सेवनामुळे हृदय निरोगी राहण्यासही मदत होते. ब्लू टीच्या सेवनामुळे कोलेस्ट्रालची समस्या दूर होण्यास मदत होते. ज्यामुळे हृदय रोगांचा धोका कमी होतो.

तसंच या चहाच्या सेवनामुळे हायपरलिपिडेमियापासून हृदयाचे संरक्षण होण्यास मदत होते. तसचं ब्लू टीमुळे ब्लॉकेज, रक्त गोठणं, स्ट्रोक अशा हृदयाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

मासिक पाळीच्या समस्या दूर

ज्या महिलांना अनियमित पाळीची समस्या आहे. अशा महिलांसाठी ब्लू टीचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. ब्लू टीच्या सेवनामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते. तसंच यामध्ये अँटीइंफ्लेमेटरी म्हणजेच दाहविरोधी गुणधर्म असल्याने मासिक पाळीतील वेदना आणि त्रास कमी होण्यासही मदत होते.

हे देखिल वाचा-

ब्लू टीच्या सेवनाचे इतर फायदे

ब्लू टीच्या सेवनामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. तसचं रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी ब्लू टीचं सेवन फायदेशीर ठरतं यामुळे दृष्टी चांगली राहण्यास तसंच डोळ्यांमधील जळजळ कमी होण्यास मदत होते.

ब्लू टी अँटीएजिंग म्हणून काम करते. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होवून त्वचा तरुण दिसू लागते.

तसंच वेदना कमी करण्यासाठी ब्लू टी पेनकिलर प्रमाणे काम करते. यासाठी तापासारख्या आजारामध्ये ब्लू टीच्या सेवनामुळे आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT