Excess Vitamin D Side effects Esakal
आरोग्य

शरीरात Vitamin D जास्त झाल्यास होवू शकतात या समस्या, जाणून घ्या लक्षणं

excess vitamin D disease: ज्याप्रमाणे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डीचं शरीरात प्रमाण वाढल्यासही आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. Vitamin D Levels

Kirti Wadkar

Excess Vitamin D: शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होणं ही एक सामान्य समस्या आहे. खास करून भारतामध्ये ड जीवनसत्व कमी होण्याचं प्रमाण मोठं आहे. शरीराचं तसंच मेंदूचं कार्य सुरळीत चालण्यासाठी व्हिटॅमिन डी Vitamin D अत्यंत आवश्यक आहे. Marathi Health Tips Know bad effects of excess of Vitamin D

मेंदूकडून दिले जाणारे विविध संकेत शरीराच्या विविध अवयवापर्यंत पोहचवण्याच्या कामात व्हिटॅमिन डी Vitamin D अत्यंत महत्वाची भूमिका बजावतं. शरीरामध्ये ड जीवनसत्व कमी झाल्यास थकवा, हातपाय दुखणे आणि इतर अनेक समस्या निर्माण होतात. तसंच तुमचं मानसिक आरोग्य Mental Health, झोप या गोष्टींवर देखील व्हिटॅमिन डीचा परिणाम होत असतो.

ज्याप्रमाणे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डीचं शरीरात प्रमाण वाढल्यासही आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. Vitamin D Levels

शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण वाढल्यास vitamin D toxicity किंवा हायपरविटामोनोसिस डी असं म्हंटलं जातं. यामुळे हाडांच्या समस्या, थकवा, मळमळ किंवा किडनीच्या समस्या निर्माण होवू शकतात.

शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण वाढू लागल्यास रक्तामध्ये कॅल्शियमचं प्रमाणा वाढू लागतं ज्यामुळे हायपरकॅल्शियाचा धोका वाढतो आणि यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होवून हृदयाचं आरोग्य धोक्यात येतं .

हाडांचं आरोग्य बिघडू शकतं

ज्या प्रमाणे हाडं चांगली राहण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन डी पुरेश्या प्रमाणात असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ड जीवनसत्वाचं प्रमाण वाढल्यास हाडांच्या समस्य़ा निर्माण होवू शकतात.

व्हिटॅमिन डीचं प्रमाण वाढल्याने रक्तामध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. यामुळे हार्मोन्सला हाडांपर्यंत कॅल्शियम पोहचवण्याचं काम करणं कठिण होतं. Bone problems

यामुळे हाडांमध्ये किंवा सांध्यांमध्ये वेदना होणं, सांधे अवघडणं किंवा सांध्यांमध्ये सूज अशा समस्या वाढू लागतात. ही स्थिती गंभीर झाल्यास फ्रॅक्चर किंवा हाडांच्या इतर समस्या देखील वाढू शकतात.

हे देखिल वाचा-

किडनीचं आरोग्य धोक्यात

हायपरकॅल्शिमिया किडनीसाठी देखील धोकादायक आहे. शरीरामध्ये व्हिटॅमिन डीच्या जास्त प्रमाणामुळं शरीरात कॅल्शियमचं अवशोषण वाढतं. यामुळे किडनीच्या समस्या निर्माण होवू शकतात. काही परिस्थितीमध्ये किडनीच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

अशक्तपणा आणि उलटी

शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण वाढल्यास तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. यामुळे मळमळ किंवा उलटीचा त्रास होवू शकतो. वाढलेल्या ड जीवनसत्वामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो ज्यामुळे मळमळ आणि उलटी होवू शकते.

भुकेवर परिणाम

आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. मात्र ते योग्य प्रमाणात. कारण जर व्हिटॅमिन डी वाढलं तर त्याचा भूकेवरही परिणाम होतो. यामुळे तुमची भूक कमी होवू शकते. किंवा खाण्यावरची इच्छा कमी होवू शकते.

अशा प्रकारे शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण वाढल्यासही तुम्हाला विविध समस्या निर्माण होवू शकतात. यासाठीच वरिल लक्षणं आढळताच डॉक्टरांचा सल्ला घेवून योग्य त्या चाचण्या करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: पवारांवर बोलताना सदाभाऊंची जीभ घसरली, अजित पवार भडकले; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...

Veg Thali: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका; व्हेज थाळीची किमत 20 टक्क्यांनी वाढली, काय आहे कारण?

Latest Maharashtra News Updates : सदाभाऊ खोत यांच्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याविरोधात निदर्शने

Rahul Gandhi : ‘संविधान’ नुसते पुस्तक नसून जगण्याचा मार्ग..! संघाने समोरून हल्ला केल्यास पाच मिनिटांत हारेल

Nashik Crime : ‘ईव्हीएम हॅक’चे आमिष देणाऱ्यास अटक; राजस्थानी नागरिक

SCROLL FOR NEXT