म्हणून घटवा वजन Esakal
आरोग्य

Health Tips: आरोग्याच्या समस्या झटक्यात होतील दूर म्हणून Weight Loss आहे गरजेचा...

तुम्ही अगदी २-३ किलो वजन कमी करा किंवा ८-१० अथवा त्याहून जास्त. मात्र वजन कमी करताच तुम्हाला शरीरात बदल जाणवू लागतील आणि आरोग्याच्या विविध समस्या एक एक करून गायब होतील

Kirti Wadkar

वाढतं वजन ही सध्याच्या काळातील एक मोठी समस्या बनली आहे. चुकीची जीवनशैली Life Style, आहाराच्या चुकीच्या वेळा आणि पद्धती तसचं व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांमध्ये वजन वाढण्याची समस्या दिसू लागली आहे.

जर तुमचं वजन हे BIM नुसार नसेल म्हणजेच तुमच्या उंचीच्या तुलनेत तुमचं वजन अधिक असेल तर आरोग्याच्या विविध समस्या भेडसावू लागतात. यासाठीच वजन नियंत्रणात Weight Control ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. Marathi Health Tips Know necessity to control and reduce your weight

वजन वाढल्याने Weight Gain सांधेदुखी, कोलेस्ट्रॉल, हृदयाचे आजार, पाठीचे आजार तसचं मानसिक आरोग्य Mental Health बिघडण्यासोबत इतर अनेक समस्या निर्माण होतात. मात्र जर तुम्ही वजन कमी करण्यास प्रयत्न सुरु केलेत तर तुमच्या शरीरात आणि मानसिक आरोग्यात अनेक सकारात्मक बदल दिसू लागतात.

तुम्ही अगदी २-३ किलो वजन कमी करा किंवा ८-१० अथवा त्याहून जास्त. मात्र वजन कमी करताच तुम्हाला शरीरात बदल जाणवू लागतील आणि आरोग्याच्या विविध समस्या एक एक करून गायब होतील. वजन कमी Weight Loss केल्याने तुमच्या आरोग्याच्या समस्या कमी होण्यास सुरुवात तर होईलच, शिवाय तुमचं मानसिक स्वास्थ Mental Health सुधारेल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

सांधेदुखी होईल कमी- वजन कमी करत असताना तुमचं लक्ष अगदी १०-१२ किलो वजन कमी कऱण्याचं असेल तर वजन टप्प्या टप्प्याने कमी होत असताना तुम्हाला विविध फायदे जाणवतील. आरोग्य तज्ज्ञांच्या मते अगदी २-३ किलो वजन कमी करण्याने देखील आरोग्याला अनेक फायदे जाणवतात. शरीरातील सुस्तपणा कमी होवून दिवसभर एनर्जी राहते आणि फ्रेश वाटू लागतं.

तसंच ३-४ किलो वजन कमी केल्याने गुडघे आणि पायांवर पडणारा शरीराचा अतिरिक्त भार कमी झाल्याने सांधेदुखीची किंवा गुडघे दुखण्याची समस्या दूर होते. तसंच वजन कमी केल्याने संधीवाताच्या समस्येतूनही आराम मिळतो.

हे देखिल वाचा-

हृदयाचं आरोग्य सुधारतं- वजन कमी केल्याने रक्तदाब Blood Pressure नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसंच अनेकदा कोलेस्ट्रॉलची समस्या देखील दूर होते. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका दूर होतो. तसंच हृदय निरोगी राहिल्याने तुम्ही फिट राहता.

चांगली झोप- जास्त वजन असलेल्या व्यक्तींना अनेकदा रात्री झोप लागण्यास अडचणी निर्माण होतात. यास स्लिप एपनिया म्हणतात. जास्त वजन असल्याने श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्याने झोप लागत नाही. तर वजन कमी केल्यास श्वसनाचा त्रास दूर होवून रात्री शांत झोप लागण्यास मदत होते.

मानसिक आरोग्य सुधारतं- वजन कमी केल्याने मूड चांगला राहण्यासोबत मानसिक आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. वजन कमी केल्याने तणान, नैराश्य तसचं क्रोध आणि थकवा कमी होण्यास मदत होते. तसंच वजन कमी केल्याने मेंदूवरही परिणाम होतो. जास्त वजनामुळे स्मरणशक्तीवर आणि विचारक्षमतेवर परिणाम होत असल्याचं एका अभ्यासात समोर आलं होतं. मात्र वजन कमी केल्यास या समस्या दूर होतात.

महिलांमधील व्यंधत्वाची समस्या दूर- गेल्या काही वर्षांमध्ये महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या वाढत असल्याचं दिसत आहे. यासाठी विविध कारणं जबाबदार असली तरी वाढलेलं वजन हे देखील एक मुख्य कारण आहे. जास्त वजनामुळे पाळीच्या समस्या निर्माण होणं, हार्मोन्सवर परिणाम होणं तसचं गर्भधारणा न होणं किंवा गर्भपाताच्या समस्या निर्माण होतात. मात्र वजन कमी केल्यामुळे समस्या कमी होणं शक्य आहे. यामुळे गरोदरपणासाठी अडचणी निर्माण होत नाहीत.

यासोबतच वजन कमी केल्याने मधुमेहाचा धोका दूर होतो. वजन नियंत्रणात असल्यास तुमचा आत्मविश्वासही वाढतो.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT