Dog Bite नंतरची काळजी Esakal
आरोग्य

Dog Bite झाल्यास सर्वप्रथम करा हे उपाय

प्रत्येक कुत्रा चावल्याने रेबिज किंवा मृत्यू होतो हा समज मनातून काढून टाकणं अत्यंत गरजेचं आहे. केवळ पिसाळलेला किंवा रेबिज झालेला कुत्रा चावल्यानेच गंभीर स्थिती निर्माण होवू शकते

Kirti Wadkar

कुत्रा किंवा श्वान हा पाळीव प्राणी मानवप्रिय तसंच प्रामाणिक आहे. मात्र त्याचसोबत तो आक्रमक प्राणी देखील आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. काही ठराविक परिस्थितीमध्ये किंवा काळामध्ये श्वान अधिक आक्रमक होतात. Marathi Health Tips Know what to do in case of dog bite

भूक लागलेली असताना, प्रजनन काळामध्ये Reproduction तसंच इतर प्राणी पाहिल्यानंतर किंवा एखादी नवी व्यक्ती पाहिल्यानंतर श्वान Dogs अधिक आक्रमक होतात. आक्रमक झालेले श्वान एखाद्या व्यक्तीवर हल्ला Attack करण्याची किंवा त्यांना चावण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा कुत्रा घाबरल्यामुळे तसचं स्वत:चा बचाव करण्यासाठी देखील एखाद्या व्यक्तीला चावू शकतो.

आजवर आपण बातम्यामधून कुत्रा चावल्याच्या काही घटना वाचल्या किंवा एकल्या असतील. यात काही प्रसंगांमध्ये Dog Biteमुळे मृत्यू झाल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत.

मात्र प्रत्येक कुत्रा चावल्याने रेबिज किंवा मृत्यू होतो हा समज मनातून काढून टाकणं अत्यंत गरजेचं आहे. केवळ पिसाळलेला किंवा रेबिज झालेला कुत्रा चावल्यानेच गंभीर स्थिती निर्माण होवू शकते. यासाठी कुत्रा चावल्यानंतर घाबरून न जाता त्वरित काही गोष्टी केल्यास संभाव्य धोका टाळणं शक्य आहे.

श्वान चावल्यानंतर सर्वप्रथम काय करावं

कुत्रा चावल्यानंतर सर्वप्रथम घाबरून न जाता लगेचच कुत्र्याने चावलेला भाग किंवा जखम वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवावी. जवळपास १० मिनिटांसाठी ही जखम वाहत्या पाण्याखाली धरुन ठेवावी. त्यानंतर जिवाणूरहित पट्टी किंवा स्वच्छ रुमाल बांधून जवळच्या दवाख्यान्यात जावं.

हे देखिल वाचा-

घरगुती उपाय करू नका

सर्दी, खोकला या आजारांवर ज्याप्रमाणे सुरुवातीला काही घरगुती उपाय करून त्रास कमी कऱणं शक्य आहे किंवा एखादी लहानशी जखम घरगुती उपायांनी बरी होत असली तरी कुत्रा चावल्यावर मात्र कोणतेही घरगुती उपाय करू नका. हे करणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. यासाठी घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांकडे धाव घ्या.

घरातील पाळीव कुत्र्‍याचे दात लागल्यास रेबीज होवू शकतो का?

जर तुम्ही घरात एखादं श्वान पाळलं असेल तर त्याचं वेळोवेळी लसीकरण करा. श्वानाचं लसीकरण झालं असल्यास रेबिज होण्याची शक्यता कमी होते. मात्र तरीही घरातील पाळीव कुत्र्याचे दात लागल्यास किंवा कुत्र्याने ओरबडल्यास त्वरित दवाखान्यात जाऊन डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

कुत्रा चावल्यानंतर किता तासांच्या आत इंजेक्शन घ्यावं?

कुत्रा चावल्यानंतर २४ तासांच्या आत इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. कुत्रा चावल्यानंतर साधारण ५ किंवा ३ इंजेक्शन दिली जातात. पहिलं इंजेक्शन दिल्यानंतर ३ दिवसांनी दुसरं आणि सातव्या दिवशी तिसरं इंजेक्शन दिलं जातं. त्यानंतर १४व्या दिवशी आणि २८व्या दिवशी पाचवं इंजेक्शन दिलं जातं.

रेबीजची लक्षणं कधी दिसू लागतात?

कुत्रा चावल्यानंतर साधारण एक ते तीन महिन्यांमध्ये रेबीजची लक्षणं दिसू शकतात. या लक्षणांमध्ये अंग दुखणं किंवा स्नायूंमध्ये वेदना होणं, ताप, डोकेदुखी, सतत भूक लागणं आणि मानसिक संतुलन बिघडणं अशी लक्षणं दिसू लागतात.

कुत्रा चावल्याने रेबिज होण्याची शक्यता किती आह?

कुत्रा चावला म्हणजे रेबिज होणार असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र प्रत्येक कुत्रा चावल्याने रेबिज होत नाही तर रेबीजची लागण झालेला कुत्रा चावल्यानेच रेबीज होतो. तसचं जर कुत्र्याला रेबीजची लस दिली असेल तर त्याला रेबीज होण्याचा धोका कमी होतो.

जरी कोणतही श्वान चावल्याने रेबीज होत नसला तरी कुत्रा चावल्यानंतर किंवा ओरबडल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT