उपयुक्त जवस Esakal
आरोग्य

Cholesterol कमी करण्यापासून वजन घटवण्यापर्यंत या बियांच्या सेवनाचे आहेत अनेक फायदे

तुम्हाला माहित आहे का. यातील अनेक समस्यांवर तुमच्या स्वयंपाक घरातील अनेक पदार्थ उपायकारक ठरू शकता. त्यापैकीत एक म्हणदे जवस.

Kirti Wadkar

कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबाच्या समस्याने सध्या देशभरातील अनेक नागरिक त्रस्त आहे. बदललेल्या जीवन शैलीमुळे तसचं चुकीच्या आहारामुळे Wrong Diet कमी वयातच कोलेस्ट्रॉल वाढणं तसचं रक्तदाबासंबधीत समस्या निर्माण झाल्या आहेत. या दोन्ही समस्या थेट हृदयाशी संबधीत असल्याने हार्ट अटॅक Heart Attack तसचं स्ट्रोकचं प्रमाणही वाढलं आहे. Marathi Health TIps linseeds helpfu for heart

यासोबतच बदलेलेल्या जीवन शैलीचा Life Style आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होत आहे. यातील अनेक आजार हे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. वाढत्या कोलेस्ट्रॉल Cholesterol आणि रक्तदाबासोबतच Blood Pressure , ताण तणाव, त्यामुळे झोप न लागणे, वजन वाढणे, त्वचा आणि केसांशी निगडीत अनेक समस्या निर्माण होवू लागल्या आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे का. यातील अनेक समस्यांवर तुमच्या स्वयंपाक घरातील अनेक पदार्थ उपायकारक ठरू शकता. त्यापैकीत एक म्हणदे जवस. 

जवसला इंग्रजीमध्ये लीन सीड्स linseed तर हिंदीमध्ये अलसी म्हणतात. महाराष्ट्रातही काही भागात अळसी म्हणून या बियांना ओळखलं जातं. आयुर्वेदातही जवस खाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. अँटी-फंगल आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या जवसामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत.

या बियांमध्ये प्रोटीन, फायबर आणि ओमेगा ३ फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. या बियांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल तसचं रक्तदाबाच्या समस्या दूर करण्यास मदत होते. तसचं कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी देखील अळशीच्या बियांचं सेवनं फायदेशीर ठरतं. या अळशी किंना जवसाचे आपण आज काही आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहेत. 

हे देखिल वाचा-

१. कोलेस्ट्रॉल कमी करतं- अभ्यासानुसार जवसाच्या सेवनामुळे LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्याचसोबतत चांगल कोलेस्ट्रॉल वाढतं. म्हणजेच जवसाच्या सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी  नियंत्रणात आणण्यास मदत होते. या अभ्यासानुसार रोज चार चमचे म्हणजेच जवळपास ३० ग्रॅम जवसाचं सेवन केल्यास बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी १५ टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होते. या बियांमधील फायबर कोलेस्ट्रॉल कमी करत आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करत.

२. रक्तदाब नियंत्रणात राखण्यास मदत- अळशीच्या बियांमुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. एका रिसर्चनुसार हायपर टेंशन असलेल्या व्यक्तींनी अळशीच्या बियांचं नियमित सेवन केल्यास ३ महिन्यांमध्ये ब्लड प्रेशरची समस्या दूर होवू शकते. 

३. कॅन्सरचा धोका कमी- जवसाच्या सेवनाने कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारापासूनही सुटका होवू शकते. या बियांमध्ये लिग्नास अँटीऑक्सिडंट आणि एस्ट्रोजन तत्व असल्याने कॅन्सरचा धोका कमी होवू शकतो. तसचं कॅन्सरचा प्रभावही कमी होतो. स्त्रीयांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी या बिया उपयुक्त आहेत.

४. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त-  लठ्ठपणा आणि वाढत्या वजनाची समस्या दूर करण्यासाठी अळशीच्या बिया उपयुक्त ठरतात. या बिया वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. या बियांच्या सेवनाने भूक कमी लागते त्यामुळे तुम्ही अतिरिक्त कॅलरीजच सेवन करत नाही आणि वजन कमी होतं.

५. पचनास मदत- अळशीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर उपलब्ध असतं. त्यामुळे पचनसक्ती सुधारण्यास मदत होते. तसचं बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. 

६. त्वचेसाठी उपयुक्त- जवसामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आणि फाइटोकॅमिकल्स वाढत्या वयाची लक्षण कमी करण्यास मदत करतं. यामुळे त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या कमी होते आणि तुम्ही तरुण दिसता.

७. शाकाहारींसाठी प्रोटीन स्त्रोत- जर तुम्ही मासं-मच्छीचं सेवन करत नसाल तर जास्तीत जास्त प्रोटीन मिळवण्यासाठी जवस हा शाकाहारी लोकांसाठी चांगला पर्याय आहे. अळशीला प्लांट बेस्ट प्रोटीन मानलं जातं. याचं सोबत मांसाहारातून मिळणार ओमेगा ३ फॅटी ऍसिडही जवसाच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं.

हे देखिल वाचा-

८.मासिक पाळीतील त्रास कमी- अळशीच्या बिया या महिलांसाठी खूपच उपयुक्त आहेत . खास करून हार्मोनल बदलांमुळे होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी जवस उपयुक्त ठरतं. अनेकदा हार्मोनस बदलांमुळे मासिक पाळीचं चक्र बिघडतं त्यामुळे महिलांना इतर समस्या निर्माण होतात. यासाठीच जवसाचं सेवन केल्यास होर्मोन नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते.

९. दातदूखीवर उपचार- दाद दुखीची समस्या दूर करण्यासाठी देखील अळशी लाभदायक आहे. यामध्ये वेदनाशामक आणि सूज कमी करण्यासाठी आवश्यक असणारी गुणधर्म असतात. यासाठी अळशीचं तेल हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी वापरावं. 

१०. संधिवात दूर करण्यास मदत- जवसमध्ये अँटीआर्थराइटिक म्हणजेच संधीवात कमी करण्यासाठी आवश्यक प्रबाव असतो. त्यामुळे संधिवाताची समस्या असलेल्यांनी आहारामध्ये अळशीचा समावेश करावा. 

अशा प्रकारे आकाराने अगदी लहान दिसणाऱ्या या बिया आरोग्याशी निगडीत अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकता. आहारामध्ये तुम्ही जवसाची चटणी खाऊ शकता. तसेच हलके भाजलेले जवस बडीसोबमध्ये मिसळून खावू शकता. त्याचसोबत सुक्या मेवासोबत किंवा स्मूदी आणि सलाडमध्येही तुम्ही अळशीच्या बिया टाकू शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT