समस्यामुक्त पाय Esakal
आरोग्य

Leg Health तुमच्या या सवयींमुळे पायांच्या समस्या होतील निर्माण, उभं राहणं देखील होईल अवघड

पायांची योग्य काळजी न घेतल्याने पुढे जाऊन अनेक आजार Illness होण्याची शक्यता असते. रोजच्या काही चुकीच्या सवयींमुळे पायाची हाडं Bones, गुडघे आणि नसांवर परिणाम होत असतो

Kirti Wadkar

शरीरांचं संतुलन राखण्यासाठी तुमचे पाय मजबुत असणं गरजेचं आहे. आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत असताना अनेकदा पायांकडे Legs मात्र दुर्लक्ष करतो. रोजच्या जीवनातील आपल्या अशा अनेक सवयी आहेत ज्याचा दुष्परिणाम परिणाम आपल्या पायांवर होत असतो. Marathi Health Tips Take care of legs change bad habits

पायांची Legs योग्य काळजी न घेतल्याने पुढे जाऊन अनेक आजार Illness होण्याची शक्यता असते. रोजच्या काही चुकीच्या सवयींमुळे पायाची हाडं Bones, गुडघे आणि नसांवर परिणाम होत असतो.

आपले पाय कुमकुवत होऊ लागतात. या सवयी Habits वेळीच बदलल्या नाहित तर भविष्यात गंभीर परिमाम भोगावा लागू शकतो. यासाठी या सवयी बदलणं गरजेचं आहेय या सवयी कोणत्या आहेत हे जाणून घेऊयात.

जास्तवेळ एकाच जागी बसणे

जास्त वेळ एकाच जागी बसल्यामुळे पायांच्याच नव्हे तर शरीराच्या अनेक समस्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढू लागल्या आहेत. तासनतास एकाच जागी बसून काम केल्यामुळे पायांच्या हाडांसोबत नसांवरही त्याचा विपरित परिणाम होवून अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहेत. जास्तवेळ एकाच जागी बसल्याने अगदी हृदयाचे विकार किंवा कॅन्सर सारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.

- जास्त वेळ एकाच जागी बसल्याने तुमचे पाय आणि ग्लूटल म्हणजेच स्नायू कुमकुवत होवू शकतात. यामुळे जीममध्ये वर्कआऊट करत असताना किंवा एखादं अवजड काम करत असताना पायांना भार सोसणं कठीण झाल्याने तुम्ही पडून तुम्हाला इजा होवू शकते.

- जास्त वेळ एकाच जागी बसून काम केल्याने रक्ताभिसरण हळू किंवा योग्यरित्या न झाल्याने वॅरिकॉज वेन्सची समस्या निर्माण होवू शकते. ही समस्या वाढल्यास पायला मुंग्या येणं किंवा पाय सुन्न पडण्याचा त्रास होवू शकतो.

- यासाठीच घरात किंवा ऑफिसमध्ये काम करत असताता. दर तास दीड तासाने एक ब्रेक घ्यावा आणि पाय मोकळे करावे.

हे देखिल वाचा-

पायाची तिढी घालून बसणं

एखाद्या ऑफिशल भेटीगाढीमध्ये किंवा वेटिंग एरियात किंवा काही खास प्रसंगी पायांची तिढी घालून बसणे म्हणजेच क्रॉस लेग पोझिशनमध्ये Cross Leg Position बसणं योग्य मानलं जातं. मात्र अनेकांना क्रॉस लेग मध्ये बसण्याची सवय असते. या सवयीमुळे तुमच्या पायांचं नुकसान होवू शकतं.

खास करून महिलांना पायांवर पाय ठेवून बसण्याची अधित सवय असते. मात्र बसण्याच्या या पोझिशनमध्ये शरीरा योग्य स्थितीत राहत नसल्याने त्याचे दुष्परिणाम होवू शकतात.

- क्रास लेगमध्ये बसल्यामुळे पायाच्या नसांमध्ये रक्त जमा झाल्याने त्यामुळे पायांना सूज येऊन वेदना निर्माण होवू शकतात.

- तसचं दिर्घकाळ अशाच स्थितीत बसल्याने पायांच्या नसा डॅमेजही होवू शकतात.

- यासाठी अगदी काही मिनिटांसाठी तुम्ही क्रास लेगमध्ये बसू शकता. मात्र जास्त वेळासाठी क्रास लेगमध्ये बसू नये.

जास्त एक्सरसाइज करणं

व्यायाम हा बळकट शरीरासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी नक्कीच गरजेचा आहे. मात्र गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्याने त्याचा दुष्परिणाम पायावर होवू शकतो. जास्त एक्सरसाइज केल्याने पायाच्या स्नायूंवर जास्त ताण पडल्याने ते कुमकुवत होण्याची शक्यता असते. यामुळे पायांमध्ये वेदना निर्माण होवू शकतात.

- अनेकजण जीममध्ये जास्त वजनाचे वेट्स उचलतात. मात्र यामुळे पायावर जास्त ताण पडून गुडघे कुमकुवत होण्याची शक्यता असते.

- तसचं अनेकजण एक्सरसाइज तर करतात मात्र स्ट्रेन्थ ट्रेनिंग करणं टाळतात. स्ट्रेन्थ ट्रेनिंगमुळे स्नायू आणि सांधे मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा तरी स्ट्रेन्थ ट्रेनिंग करणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT