Orange Kheer Recipe in marathi Esakal
आरोग्य

Kheer Recipe : शेवया किंवा तांदळाची नव्हे तर आता बनवा Orange Kheer, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी फायदेशीर

Orange Kheer Recipe: जर तुमच्या घरातही गोड पदार्थ आवडत असतील तर संत्र्याती ही खीर नक्की ट्राय करा. अगदी घरातील लहानांपासून ते मोठ्यांना देखील या खीरीचा स्वाद नक्कीत आवडेल

Kirti Wadkar

Orange Kheer Recipe: महाराष्ट्रात साधारण अनेक घरांमध्ये सणसूद म्हंटलं तर जेवणात गोड पदार्थ Sweet Dish असल्याशिवाय त्या सणाची मजा अपुरी राहते. मग श्रीखंड पुरी असो पुरणपोळी, मोदक किंवा शेवया, रवा किंवा तांदळाची खीर. Marathi Health Tips Try orange Kheer to boost immunity

महाराष्ट्रात Maharashtra वेगवेगळ्या भागात विविध प्रकारच्या खीर तयार केल्या जातात. पण तुम्ही कधी संत्र्याच्या खीरबद्दल ऐकलं आहे का?

तांदळाच्या खीरीप्रमाणेच संत्र्याची Orange खीर देखील बवनण्यासाठी अगदी सोपी आहे. तसचं ती अतिशय टेस्टी देखील लागते. ही खीर आरोग्यासाठी Health देखील फायदेशीर आहे. संत्र्याप्रमाणेच संत्र्याच्या खीरीचं सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होवू शकतात.

या खीरीच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास Immunity मदत होते. तसचं रक्त दाब नियंत्रणात राखण्यासाठी या खीरचं सेवन फायदेशीर ठरू शकतं.

जर तुमच्या घरातही गोड पदार्थ आवडत असतील तर संत्र्याती ही खीर नक्की ट्राय करा. अगदी घरातील लहानांपासून ते मोठ्यांना देखील या खीरीचा स्वाद नक्कीत आवडेल. तेव्हा जाणून घेऊयात संत्र्याची खीर कशी तयार करायची ते. orange kheer

संत्र्याच्या खीरीसाठी लागणारं साहित्य

३-४ संत्री, १ लीटर दूध, मिल्कमेड १०० ग्रॅम, मावा ५० ग्रॅम, केसर ४-५ काड्या, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्सचे काप २ चमचे, साखर गरजेनुसार

Orange खीर तयार करण्याची रेसिपी

  • खीर तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यात दूध तापवत ठेवा.

  • दूध तापलं की गॅसची आच मध्यम ठेवा आणि दूध चांगलं उकळू द्या. दूध निम्मं आटेपर्यंत ते उकळू द्या.

  • दूध आटेपर्यंत संत्र्याची साल काढून. त्यातील फोडींवरील पातळ साल आणि बिया काढून एका वाडग्यात संत्र्याचा गर काढून घ्यावा.

हे देखिल वाचा-

  • दूध आटल्यानंतर त्यात मिल्क मेड आणि मावा घालून चांगलं मिक्स करा. मिल्क मेड घालूनही गरज वाटल्यास तुमच्या आवडीप्रमाणे साखर अॅड करा.

  • दूधात वेलची पावडर, केसर आणि ड्रायफ्रूटते काप घालून एक उकळी येऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा आणि दूध गार होण्यासाठी बाजूला ठेवा.

  • दूधाचं मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतर त्यात संत्र्याचा गर अॅड करून चांगला मिक्स करा. त्यानंतर तयार खीर १५ मिनिटांसाठी फ्रिजमध्ये गार होण्यासाठी ठेवा.

अशा प्रकारे तुमची यम्मी संत्र्याची खिर तयार होईल. एखाद्या सणासुदाला तुम्ही ही हटके आणि तितकीच टेस्टी स्विट डिश नक्कीच ट्राय करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT