व्हिटॅमिन के साठी Esakal
आरोग्य

Vitamin K Rich Foods: पालक पनीरला नाक मुरडू नका; मिळणार हे व्हिटॅमिन, जीवघेण्या आजारांचा धोका होईल दूर

ब्लड क्लॉटिंग Blood Clotting म्हणजेच रक्त गोठण्यासाठी व्हिटॅमिन के अत्यंत गरजेचं आहे. यामुळे जखम भरून येण्यास मदत होते

Kirti Wadkar

शरीरासाठी सगळेच व्हिटॅमिन्स पुरेशा प्रमाणात गरजेचं आहेत. हे व्हिटॅमिन्स शरीराच्या Human Body वेगवेगळ्या कार्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. यापैकीच एक म्हणजे Vitamin K. खासकरून यकृत, मेंदू Brain, हृदय आणि स्वादुपिंडाच्या पेशी निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन के उपयुक्त आहे. Marathi Health Tips try these substances to increase vitamin K

त्याचप्रमाणे ब्लड क्लॉटिंग Blood Clotting म्हणजेच रक्त गोठण्यासाठी व्हिटॅमिन के अत्यंत गरजेचं आहे. यामुळे जखम भरून येण्यास मदत होते. तसचं हाडं बळकट राहण्यासाठी Vitamin K उपयुक्त ठरतं. यासाठीच शरीरात व्हिटॅमिन के चं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहें. अन्यथा आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होवू शकतात.

हे देखिल वाचा-

Vitamin K च्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या

हृदयाच्या कामात अडथळा निर्माण होणं.

हाडं कुमकुवत झाल्याने हाडांचे आजार होवू शकतात. तसचं हाडांशी संबंधीत ऑस्टियोपोरोसिस हा आजाराचा धोका वाढतो.

यामुळे दातांच्या समस्यादेखील निर्माण होवू शकतात.

व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळे नाकातून रक्त येण्यीच समस्या निर्माण होवू शकते.

लघवीतून रक्त येणं हे देखील याचंच एक लक्षण आहे.

व्हिटॅमिन के ची करतरचा भरून काढण्यासाठी आहारामध्ये Vitamin K ने परिपूर्ण असलेल्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. हे पदार्थ कोणते ते पाहुयात.

पालक आणि पनीर- अनेकांच्या आवडीचे पालक पनीर विटामिन केची कमतरता भरून काढण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. कारण पालकमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन के, पोटॅशियम, फायबर, फोलेट आणि विटामिन इ उपलब्ध असतं.तसचं यात पाण्याचं प्रमाण देखील जास्त असल्याने शरीरातील पाण्यीच कमतरता भरून निघण्यास मदत होते.

त्याचप्रमाणे पनीरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन के उपलब्ध असतं. यासाठी आहारात पालक पनीरच्या भाजीचा समावेश केल्यास त्याचा फायदा होवू शकतो.

अंड- अंड हे प्रोटीनचं स्त्रोत असलं तरी यात विटामिन के आणि विटामिन डी देखील मोठ्या प्रमाणात आढळतं. अंड्याच्या बलकामध्ये विटामिन के उपलब्ध असतं. एका अंड्यामध्ये साधारण ६७ ते १९२ माइक्रोग्रॅम विटामिन के उपलब्ध असतं. यासाठीच आहारामध्ये अंड्याचा समावेश केल्यास प्रोटीन सोबतच विटामिन केची कमतरता भरून निघण्यास मदत होईल.

बीन्स- बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी, बी-६ आणि व्हिटॅमिन के उफलब्ध असतं. तसचं यामध्ये फायबर, कॅल्शियम, आयरन, प्रोटीन आणि पोटॅशियम उपलब्ध असल्याने त्याचे आरोग्याला इतरही अनेक फायदे होतात. भाजीच्या, आमटच्या किंवा सलाडच्या स्वरुपात तुम्ही बिन्सचं सेवन करू शकता.

ब्रोकोली- ब्रोकोली हा व्हिटॅमिन केचा एक उत्तम स्त्रोत आहे. जवळपास १ कप ब्रोकोलीमध्ये २२० मायक्रोग्रॅम विटामिन के उपलब्ध असतं. त्याचसोबत यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, कार्ब्स, क्रोमियम आणि विटामिन ए उपलब्ध असतं.

ब्रोकोलीचं तुम्ही आहारामध्ये वेगवेळ्या प्रकारे सेवन करू शकता. सलाडमध्ये किंवा ब्रोकोला सूपसोबतच भाजीच्या स्वरुपातही ब्रोकोलीचं सेवन करता येईल.

बीट- बीटमध्ये मोठ्या प्रमाणात आयरन उपलब्ध असल्याने बीट खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. तसचं यामध्ये इतरही अनेक पोषक तत्व मोठ्या प्रमाणात आढळतात. खास करून विटामिन के मुबलक प्रमाणात आढळतं.

एक कप बीटामध्ये ६९७ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन के आढळतं. त्यामुळे बीटाचं आहारात नियमित सेवन करणं गरजेंचं आहे.

या पदार्थांसोबत आहारामध्ये दूध आणि दह्याचा समावेश केल्याने देखील Vitamin Kची कमरतरचा पूर्ण होईल. तसचं फळांमध्ये पपई, सफरचंद आणि डाळिंबाचं सेवन उपयुक्त ठरतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT