missed period causes Esakal
आरोग्य

Missed Period Causes: मासिक पाळी चुकणं म्हणजे गरोदर आहातचं असं नव्हे, या कारणांमुळे पाळी होऊ शकते मिस

Kirti Wadkar

Missed period causes: महिलांना येणारी मासिक पाळी Menstrual Cycle चुकली की अनेकदा त्या चिंताग्रस्त होताता. पिरियड्स मिस झाले म्हणजेच पाळीची तारीख निघून गेली की आपण गरोदर तर नाही ना असा प्रश्न काही महिलांना पडतो. Marathi Health Tips Why Menstrual Cycle gets missed know the reasons

प्रेग्नेंसी टेस्टमध्ये Pregnancy Test मात्र रिझल्ट निगेटिव्ह आल्यावर तिच्या जीवात जीव येतो. अनेक महिलांमध्ये पाळीची तारीख सतत बदलत राहण्याची समस्या पाहायला मिळते.

पाळीची Menstrual Cycle तारीख पुढे-मागे होण्यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात. अलिकडे तर बदललेल्या जीवनशैलीचा Lifestyle देखील यावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतो.

त्याचप्रमाणे हार्मोन्सचं असंतुलन आणि काही औषधांचा परिणाम म्हणून देखील पाळीच्या तारखेत बदल होवू शकतो. म्हणजेच पाळीची तारीख निघून जाणं याचा अर्थ केवळ तुम्ही गरोदर आहात असा होत नाही.

मुलींना जेव्हा मासिक पाळी येण्यास सुरुवात होते तेव्हा देखील मासिक पाळीचं चक्र हे अनियमित असतं किंवा मोनोपॉझ म्हणजेच महिलांमध्ये वयाच्या ४५ नंतर जेव्हा मासिक पाळी येणं बंद होणार असतं तेव्हाही हे चक्र अनियमित होतं म्हणजेच पाळीची तारीख बदलू शकते. पाळीची तारीख बदलण्यामागची इतर काही कारणं पाहुयात

हे देखिल वाचा-

तणाव- क्रॉनिक स्ट्रेस म्हणजेच तुम्ही दिर्घकाळापासून तणावात असाल तर याचा परिणाम तुमच्या हार्मोन्सवर होतो. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुमचं शरीर कार्टिसॉल हार्मोन्सची निर्मिती करत.

या हार्मोन्सचा मेंदूवर परिणाम होतो. पिरियड नियमित येण्याच्या मेंदूच्या कार्यावर या हार्मोन्सचा परिणाम झाल्याने अनेकदा वजन कमी किंवा जास्त होवू शकतो परिणामी पाळीची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते.

वजनातील बदल- वजनातील कोणतेही बदल मग ते वजन वाढणं असो किंवा कमी होणं हे तुमच्या मासिक पाळीच्या तारखेवर परिणाम करू शकतं. याव्यतिरिक्त, वजनाशी संबंधित इतर आजार आणि विकार जसे की लठ्ठपणा, एनोरेक्सिया, बुलिमिया किंवा मधुमेह याचा देखील तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो.

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम- या सिंड्रोममध्ये महिलांमध्ये एन्ड्रोजन या मेल हार्मोनची निर्मीती वाढते. ज्यामुले ओव्हरीमध्ये सिस्ट तयार होऊ लागतात. यामुळे ओव्ह्यूलेशन देखील योग्यरित्या होत नाही. तर अनेकदा पाळी येणं बंद होतं. किंवा २-३ तीन महिन्यांनी पाळी येते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

औषधांचा परिणाम- जर काही औषधोपचार सुरु असतील तर काही मेडिसिनच्या परिणामामुळे देखील पाळीची तारीख चुकू शकते. यात खास करून एन्टीडिप्रेशन, अँटीसायकोटिक्स, थायरॉईडची औषधे आणि काही केमोथेरपीच्या औषधांमुळे पिरियड्ची तारीख मिस होऊ शकते. तसचं गर्भनिरोधक गोळ्याचा परिणामही मासिक पाळीच्या चक्रावर होतो.

या काही कारणांसोबतच मधुमेह, यकृताचे आजार किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये अनियमित पाळी येण्याची शक्यता जास्त असते. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार केल्यास पाळीचं चक्र व्यव्यस्थित होवून नियमित पाळी येण्यास सुरूवात होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT