पिरिएडस् मध्ये शांत झोप Esakal
आरोग्य

Periods मध्ये निवांत झोपायचं असेल तर या गोष्टींची लावा सवय

एकीकडे वेदना सोसत दिवसभर काम करणं तर दुसरीकडे अपुरी झोप यामुळे महिलांना अधिक थकवा येतो किंवा आरोग्याच्या इतर समस्या Health Problems निर्माण होवू शकतात. मासिक पाळीमध्ये पुरेशी झोप घेणं अत्यंत गरजेचं असतं

Kirti Wadkar

महिलांसाठी मासिक पाळीचे ५-७ दिवस अत्यंत कठिण असतात. मासिक पाळीतील प्रत्येक महिलेच्या समस्या या वेगवेगळ्या असतात. मासिक पाळीचे Menstrual Cycle दिवस हे अत्यंत अवघडल्या सारखे असतात. अनेकदा अशक्तपणा आणि वेदना Pains सोबतच ब्लड फ्लोमुळे दिवसा कसा पार पडतोय असं वाटतं. Marathi Tips For Women Know this to get sound sleep during Menstrual Cycle

तर दुसरीकडे रात्री नीट झोप लागत नाही. मासिक पाळीमध्ये Menstrual Cycleअनेकदा पाठदुखी, कंबर दुखी किंवा लिकेजच्या चिंतेमुळे महिलांना झोप लागत नाही. तसंच मासिक पाळीमध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचा Hormones स्तर सतत बदलत असल्याने देखील महिलांना झोप लागत नाही.

एकीकडे वेदना सोसत दिवसभर काम करणं तर दुसरीकडे अपुरी झोप यामुळे महिलांना अधिक थकवा येतो किंवा आरोग्याच्या इतर समस्या Health Problems निर्माण होवू शकतात. मासिक पाळीमध्ये पुरेशी झोप घेणं अत्यंत गरजेचं असतं. यासाठीच काही टिप्स वापरून मासिक पाळीत शांत झोप घेणं शक्य आहे. 

झोपेचं वेळापत्रक बनवा- झोपेचं योग्य वेळापत्रक लावणं हे निरोगी राहण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. यासाठी एका ठराविक वेळेत झोपण्याची सवय लावा. झोप आली नसेल तरीह खोलीतील लाईट बंद करुन, मोबाईल दूर ठेवून झोपण्याचा प्रयत्न करा.

तसंच सकाळी देखील एका ठराविक वेळेत उठा. यामुळे तुम्हाला पिरियड्समध्ये तर चांगली झोप येईलच शिवाय यामुळे तुम्हाला नियमितपणे वेळेत झोपण्याची आणि उठण्याची सवय लागेल. 

हे देखिल वाचा--

झोपण्यासाठी अनुकूल वातावरण बनवा- जर तुम्हाला मासिक पाळीमध्ये शांत झोप हवी असेल तर त्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणं अधिक गरजेचं आहे. खोलीच्या खिडक्या दारं बंद करा जेणेकरून बाहेरील आवाज येणार नाही. 

तुमच्या आवडीचं एखादं शांत म्युझिक तुम्ही ऐकू शकता. यामुळे वेदना कमी जाणवतील आणि झोप येण्यास मदत होईल. खास करून झोपण्यापूर्वी सोशल मीडियाचा वापर करू नका. झोपताना एक ग्लास जायफळच्या दुधाचं सेवन केल्यासही झोप येण्यास मदत होईल. 

वेदना कमी होण्यासाठी गरम शेक- जर तुम्हाला प्रचंड वेदनांमुळे झोप येत नसेल. तसचं पाठदुखी किंवा कंबरदुखीमुळे झोप लागण्यास त्रास होत असेल तर झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करा किंवा गरम पाण्याच्या पिशवीने तुम्ही पाठ तसचं कंबरेला शेक देऊ शकता. यामुळे आराम मिळेल आणि शांत झोप लागेल. 

औषधं आणि घरगुती उपाय- जर गरम पाण्याच्या शेकाने देखील वेदना होत असतील तर तुम्ही मेडिकलमधून काही औषधं आणून ती घेऊ शकता. यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 

तसचं तुम्ही दालचिनी चहा किंवा तुळशीच्या चहाचं सेवन करू शकता. यामुळे मासिक पाळीतील वेदना कमी होण्यास मदत होते. 

या उपायांसोबतच लिकेज होणार नाही यासाठी चांगल्या दर्जाचे पॅड, टॅम्पॉन किंवा मेंस्ट्रुअल कपचा वापर करा. या सोबतच झोपताना खबरदारी म्हणून तुम्ही मासिक पाळीसाठी एखादी जुनी चादर अंथरु शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT