Medical nutrition therapy sakal
आरोग्य

वैद्यकीय पोषण चिकित्सा

वैद्यकीय पोषण चिकित्सा (उपचार पद्धती/मेडिकल न्युट्रिशन थेरपी-MNT) ही आरोग्याच्या निरनिराळ्या अवस्थांचा अन्न आणि पोषणाच्या मदतीने उपचार करण्याची विशेष पद्धती आहे.

सकाळ वृत्तसेवा

- गौरी शिंगोटे, आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग

वैद्यकीय पोषण चिकित्सा (उपचार पद्धती/मेडिकल न्युट्रिशन थेरपी-MNT) ही आरोग्याच्या निरनिराळ्या अवस्थांचा अन्न आणि पोषणाच्या मदतीने उपचार करण्याची विशेष पद्धती आहे. सर्वसामान्य आहारसल्ल्याऐवजी व्यक्तीच्या वेगळ्या वैद्यकीय गरजेनुसार एमएनटी वैयक्तिक आहारतक्ता बनवते. नोंदणीकृत आहारतज्ज्ञ असा तक्ता बनवतात. यामागे आरोग्य सुधारणे, रोगांवर नियंत्रण किंवा काही वेळेस योग्य पोषणाद्वारे परिस्थिती बदलणे असे ध्येय ठेवले जाते.

एमएनटीची उदाहरणे

  • मधुमेह : वैद्यकीय पोषण चिकित्सा, मधुमेही (दोन्ही, टाइप १ व टाइप २) रुग्णांना खाद्यसूची बनवून रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामुळे गुंतागुंतीची शक्यता कमी होऊन रुग्णांना सहजपणे परिस्थिती हाताळता येण्यास मदत होते.

  • हृदयविकार : हृदयविकार किंवा उच्च कोलेस्टेराॅल असणाऱ्या रुग्णांसाठी ही चिकित्सा हृदय-मित्र पदार्थांचा समावेश करून रक्तदाब किंवा कोलेस्टेराॅल वाढवणारे पदार्थ टाळते. यामुळे हृदयाचे संरक्षण होऊन जास्त नुकसान होणे टळते.

  • मूत्रपिंड विकार : बराच काळ मूत्रपिंड विकारापासून (CKD) पीडित रुग्णांना सोडियम, पोटॅशियम आणि फाॅस्फरससारख्या विशिष्ट पोषणतत्त्वांपासून काळजीपूर्वक दूर राहावे लागते. विशेष चिकित्सा आहारतक्त्यामुळे मूत्रपिंडांचे संरक्षण होण्यास मदत होते.

  • पचनाचे विकार : संग्रहिणी किंवा आयबीएस, सेलिआक आजार किंवा ॲसिडिटीसारख्या परिस्थितीत एमएनटी लक्षणे ओळखण्यास मदत करते व रुग्णास त्रास होणार नाही; पण तरीही आवश्यक पोषण मिळेल याची खात्री करते.

  • कॅन्सर : कॅन्सरच्या उपचारांमध्ये पुरेसे खाता येणे किंवा पुरेसे पोषण मिळणे अवघड असते. वैद्यकीय पोषण चिकित्सा या रुग्णांना उपचारांदरम्यान योग्य पोषण मिळण्याची खात्री करते.

  • वजन नियंत्रण : प्रमाणापेक्षा कमी वजन किंवा स्थूलतेच्या समस्येसोबत लढणाऱ्यांसाठी वैद्यकीय पोषण चिकित्सेत आहारतज्ज्ञ योग्य खाण्याच्या सवयी लागण्यासाठी मदत करतात, ज्या हळूहळू वजन वाढवतात किंवा कमी करतात आणि ज्यामुळे मधुमेह, हृदयविकार किंवा इतर आजारांचा धोका कमी होतो.

  • अन्नाची ॲलर्जी : अन्नाची ॲलर्जी किंवा ग्लुटेन किंवा लॅक्टोजची असहिष्णुता असलेल्या रुग्णांना एमएनटी त्यांना त्रास देणारे अन्न दूर ठेवून तरीही पोषक अन्न मिळण्यास मदत करते. वैद्यकीय पोषण चिकित्सेमध्ये आहारतज्ज्ञ वैयक्तिक सल्ला व पाठिंबा देऊन महत्त्वाची भूमिका बजावतात.

  • रुग्णाला जाणून घेणे : रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, सध्याच्या खाण्याच्या सवयी आणि एकंदर जीवनशैली जाणून घेणे ही पहिली पायरी आहे.

  • वैयक्तिक आराखडा : आहारतज्ज्ञ रुग्णाच्या विशेष गरजांची पूर्तता करणारा वैयक्तिक आहार आलेख किंवा आराखडा बनवतो.

  • सततचा पाठिंबा : आहारतज्ज्ञ रुग्णाला योग्य आहाराची निवड करणे, पोषण लेबल वाचणे, आहारसूची बनवणे याचे प्रशिक्षण देतो. रुग्णाला एखाद्या खाण्याची तल्लफ असणे किंवा भावनात्मक खाण्याची इच्छा होत असल्यास योग्य धोरण आखतात.

  • देखरेख, आवश्यक बदल : आहारतज्ज्ञ नियमितपणे रुग्णाच्या संपर्कात राहून परिस्थितीचे आकलन करतो. आवश्यकतेनुसार आलेखात/ आराखड्यात बदल करतो.

  • वैद्यकीय चमूसोबत संपर्क : आहारतज्ज्ञ नेहमी डाॅक्टर आणि इतर वैद्यकीय चमूसोबत काम करतात- जेणेकरून रुग्णाच्या एकूण उपचारांबरोबर आहारसूची आलेख चपखल बसतील.

वैद्यकीय पोषण चिकित्सा सामान्य पोषक खाद्यसल्ल्याच्या पलीकडे जाते. विशिष्ट रुग्णासाठी, अनुरूप अन्नसूची बनवली जाते, तेव्हा मधुमेह, हृदयविकार किंवा पचनविकारासारख्या परिस्थितींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. या चिकित्सेमुळे रुग्णाचा आहार, विशिष्ट वैद्यकीय गरजांना मदत करून रुग्णाचे आरोग्य सुधारण्याबरोबरच एकंदर जीवनाचा स्तरही सुधारतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT