Medicine Buying Tips esakal
आरोग्य

Medicine Buying Tips : हलगर्जीपणा करू नका, ही काळजी घेऊनच ऑनलाईन औषधं मागवा

सकाळ डिजिटल टीम

Medicine Buying Tips :

बदललेल्या वातावरणामुळे म्हणा किंवा आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आपण सतत आजारी असतो. पावसाळी ऋतुमध्ये तर अनेक साथीचे आजार पसरतात. उन्हाळ्यात उष्माघाताचे तर हिवाळ्यात थंडीचे रुग्ण वाढतात. म्हणजेच आपण वर्षातील सर्वच ऋतूंमध्ये आजारी पडू शकतो. त्यामुळे काळजी म्हणून आपण डॉक्टरांच्या संपर्कामध्ये असलं पाहिजे.

डॉक्टरांनी दिलेली औषध वेळेवर घेतली पाहिजेत आणि ते सांगतात तसे रुटीन फॉलो केले पाहिजे. आतापर्यंत तरी आपण मेडिकलमधून औषध घेऊन त्यांचे सेवन करत होतो. पण आता डॉक्टरांनी दिलेली औषधे ऑनलाईन मागवण्याचे सुद्धा प्रमाण वाढले आहे.

लोकांचे म्हणणे असे आहे की, औषध ऑनलाईन मागवल्याने त्यांचा वेळ वाचतो. एखादे औषध अधिक मेडिकलमध्ये जाऊन शोधावे लागत नाही. औषध मागवले की थेट आपल्या घरी येते. त्यामुळे लोकांचा ऑनलाईन औषधे मागवण्याकडे कल वाढला आहे.

जर तुम्हीही असाच विचार करत असाल आणि औषधे ऑनलाईन मागवत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

औषधं तपासून घ्या

तुम्ही ऑनलाईन औषधे मागत असाल तर सर्वात आधी ती योग्यच असल्याची खात्री करून घ्या. ऑर्डर केलेल्या औषधांचे सेवन करण्याआधी डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीवरील औषध तीच आहेत याची खात्री करा.

अनेक वेळा आपण ऑनलाइन शॉपिंग करताना चार-पाच वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती एखादी वस्तू सर्च करतो. काही ठिकाणी त्या वस्तूंचे दर कमी-जास्त असतात तर काही ठिकाणी कमी असतात. औषधांच्या बाबतीतही असेच सुरू आहे.

ऑनलाईन अधिक पैसे घेतले जातात

एखाद्या कंपनीचे औषध अधिक किमतीत मिळत असेल तर त्या किमतीची शहानिशा करा आणि मगच ते खरेदी करा. नाहीतर ऑनलाईन पद्धतीने अधिक पैसे वाया जाऊ शकतात.

ऑनलाईन फसवणूक होऊ शकते 

ऑनलाइन फसवणूक हा सध्याचा ट्रेंडिंग गुन्हा आहे. अनेक फेक वेबसाईट निर्माण करून त्यावरून वस्तू विक्री जाते. लोक अशा पद्धतीने पैसे खरेदी करून ऑनलाईन पेमेंट करतात. पण औषधे घरी येतच नाहीत. किंवा औषधांच्या जाती दुसरेच कुठली तरी वस्तू पाठवली जाते. ऑनलाइन खरेदी करताना अशा पद्धतीची फसवणूक होऊ शकते हे डोक्यात ठेवूनच मग औषधे मागवा.

ऑफलाईन पेमेंटचा पर्याय निवडा

तुम्ही ऑनलाइन औषधांची ऑर्डर देत असाल तर कॅश ऑन डिलिव्हरी पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय औषधांची एक्सपायरी डेट नक्की तपासा. त्याच वेळी, चुकीचे औषध आल्यास, कंपनी ते परत घेईल की नाही याची आगाऊ खात्री करा. त्यामुळे याबाबत आधी कस्टमर केअरशी चर्चा करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: दोन वर्षांपासून गुजरात महाराष्ट्राला चालवत होता, आता जनताच न्याय करणार; मशाल धगधगणार! आदित्य ठाकरेंनी दंड थोपटले

Rajeev Kumar on Media Trends: एक्झिट पोल्सचा फेक डेटा दाखवण्याचा अट्टाहास? मुख्य निवडणूक आयुक्त मीडिया ट्रेन्ड्सवर भडकले

"मामापासून लपून केलेलं वोटिंग ते बिग बॉसचा रनर अप" ; पृथ्वीक प्रतापचं अभिजीत सावंतसाठी खास पत्र ; "सुरजशी तो मायेने..."

Aditya Thackeray on Election: “दोन वर्षांपासून आम्ही वाट पाहत होतो....”; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंमध्ये दिसला उत्साह

Latest Maharashtra News Updates : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी EAM डॉ. एस. जयशंकर आणि इतर SCO कौन्सिल प्रमुखांचे त्यांच्याद्वारे आयोजित डिनरमध्ये स्वागत केले

SCROLL FOR NEXT