Healthy Diet esakal
आरोग्य

Healthy Diet : या डाएटने दिवसाला 4000 Steps चालण्याएवढे सक्षम व्हाल तुम्ही, लगेच वाचा अन् फॉलो करा

संशोधकांच्या अभ्यासातून हा डाएट ४००० हजार पाऊल चालण्याएवढी एनर्जी देत असल्याचे सिद्ध झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Healthy Diet : निरोगी आहार हा आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र संशोधकांच्या अभ्यासातून हा डाएट ४००० हजार पाऊल चालण्याएवढी एनर्जी देत असल्याचे सिद्ध झाले आहे.

हा मॅजिकल डाएट कोणता आणि याचे फायदे कोणते ते जाणून घेऊया. यूएसमधील 2,000 पेक्षा जास्त मध्यमवयीन लोकांचा समावेश असलेल्या नवीन अभ्यासात असे आढळले आहे की उच्च-गुणवत्तेचा, Mediterranean-style diet फिटनेस चाचणीमध्ये सर्वोत्तम आहे.

इतर अभ्यासात असेही आढळून आले आहे की Mediterranean-style dietचे पालन केल्याने नैराश्य कमी होते, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो आणि टाइप-2 मधुमेहाचा धोकासुद्धा 52 टक्क्यांनी कमी होतो. त्यामुळे या आहारातून असे सिद्ध झाले की, आहाराचासुद्धा व्यायामासारखाच शरीरावर परिणाम होतो. (Lifestyle)

Healthy Diet

या अभ्यासाचे लेखक मायकेल मी यांच्या मते, या अभ्यासात ज्या लोकांचा समावेश होता त्यांच्या फिटनेसमध्ये दररोज ४००० पाऊल चालण्याऐवढा प्रभावी परिणाम दिसत होता. (Diet Plan)

संशोधकांना असेही आढळून आले की, अभ्यासात ज्या लोकांचा समावेश होता आणि ज्यांनी समान प्रमाणात व्यायाम केला ते देखील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या कार्याला चालना देण्याच्या क्षमतेमुळे Mediterranean-style diet ने अगदी तंदुरुस्त असल्याचे कळाले.

Mediterranean-style diet म्हणजे काय?

खाण्याच्या या पद्धतीचा चांगला अभ्यास केला गेला आहे. हा डाएट तुमचे आरोग्य जपते. तुमच्यात स्फुर्ती निर्माण करते आणि तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवते.

इकारियाचे ग्रीक बेट, या डाएटचे सातत्याने पालन करतात, ते जगातील पाच ‘ब्लू झोन’ पैकी एक आहे. जिथे सर्वाधिक लोक १०० वर्षांपेक्षा जास्त काळ अगदी निरोगी जगतात. (Health)

Mediterranean लोक फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, चांगल्या दर्जाच्या ब्रेड, शेंगा, बटाटे, नट आणि बियाणे आणि अतिरिक्त व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल सारख्या चांगल्या फॅट्सचा समावेश असलेल्या वनस्पती-आधारित पदार्थांनी समृद्ध आहाराचे पालन करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

सुखविंदर सिंग आणि पुण्याचं आहे खास कनेक्शन, म्हणतात- इथे आलो की कधीच गाडीने फिरत नाही कारण...

Latur Assembly Election 2024 : देशमुख विरुद्ध चाकूरकरांमध्ये सरळ लढत, लातूर शहर मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT