Brain Health Care Tips Sakal
आरोग्य

Mental Health Care : वय वाढतंय, डोकंही चालत नाही, तल्लख बुद्धीसाठी ही गोष्ट कराच!; संशोधनातून रामबाण उपाय आला समोर

Mental health care उतारवयात येणारे नैराश्य टाळायचे असेल तर हे काम नक्की करा.

सकाळ डिजिटल टीम

सेलिया बार्बेरेना या वयोवृद्ध महिलेनं आपल्या अनेक दशकांच्या कारकीर्दीतून अखेर निवृत्त झाल्या. पण निवृत्तीनंतर आता आयुष्यात मिळणाऱ्या इतक्या वेळेचं नेमकं काय करायचं? असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला. काही जण निवृत्तीनंतर सकाळी उशीरापर्यंत झोपून राहतात तर काही जणांना ओझ्यातून तणावमुक्त झाल्यासारखे वाटते.

पण बार्बेरना यांचे प्रकरणच वेगळे होते. त्यांना उतारवयातही एखादे आव्हान स्वीकारायचे होते, ज्याकरिता त्या आपली शक्ती खर्च करू शकतील. म्हणूनच वयाच्या ६७व्या वर्षीही त्यांनी समाजासाठी स्वयंसेवक म्हणून कार्यरत राहण्याचे ठरवले. कॅलिफोर्नियातील पॅसिफिक ग्रोव्ह येथील रहिवासी असणाऱ्या बार्बेरेना म्हणतात की, ‘जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताण नसेल, तर कित्येक आपण आव्हानांना मुकता.

तुमच्याकडे असे एखादे व्यासपीठ असावे जेथे आपण विचारविनिमय करता, लोकांच्या संपर्कात येता आणि त्यातून एखाद्या चांगल्या गोष्टीची निर्मिती करता’. आपल्या समुदायाला मदत करण्यासाठी बार्बेरेना यांनी आपलं जीवन समर्पित केले आहे. सेवावृत्तीमुळे मेंदू तीक्ष्ण राहण्यास मदत मिळते, असे बार्बेरेना यांचं म्हणणं आहे.

तर दुसरीकडे चीफ मिशन आणि अल्झायमर असोसिएशनच्या फील्ड ऑपरेशन्स ऑफिसर डोना मॅककुलो यांनी सांगितले की,"स्वयंसेवक हे सर्व समुदायांचे आधारस्तंभ आहेत आणि अनेक संस्थांच्या यशासाठी अत्यावश्यक आहेत. आम्हाला आशा आहे की हा नवीन डेटा सर्व वयोगटातील व्यक्तींना स्थानिक स्वयंसेवा कार्यात गुंतण्यासाठी प्रोत्साहित करेल. केवळ समुदायांपुरतेच नव्हे तर स्वत: च्या संज्ञानात्मक आणि मेंदूच्या आरोग्यासाठी देखील ही माहिती महत्त्वपूर्ण अशी आहे."

स्वयंसेवेमुळे मेंदूला कशा प्रकारे मदत मिळते?

बार्बेरेना यांना असे वाटते की स्वयंसेवा करण्याचे कार्य स्वीकारल्याने स्मृती, शब्दसंपदा आणि कौशल्य या कामात गुंतवून राहत असल्याने त्यांची आकलनशक्ती टिकून राहण्यास मदत मिळते.

निवृत्त झाल्यानंतर काही जण एकाकी पडतात. पुढे एकटेपणा आणि लोकांच्या संपर्कात न राहिल्याने नैराश्य आणि चिंताग्रस्त होण्याची समस्या निर्माण होते. या सर्व गोष्टींचे दुष्परिणाम तुमच्या आकलनशक्तीवर होतात, असेही महत्त्व पुढे त्यांनी पटवून दिलं.

स्वयंसेवेचे कार्य स्वीकारल्यानं त्यांना जीवनाचे उद्देश, अर्थ आणि या कामाने अनेक मित्र दिले आहेत. जे माझ्या मानसिक आरोग्यासाठी व विकासासाठी बहुमुल्य आहेत, असेही बार्बेरेना म्हणाल्या आहेत.  

मागील काही अभ्यासांमध्येही असे आढळून आले आहे की सामाजिक कार्य आणि शारीरिक क्रिया या दोहोंमध्ये सहसा स्वतःच केलेल्या सेवेचा म्हणजे शरीराच्या क्रियेचा समावेश असतो, या क्रिया मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

तसंच उतारवयात स्वयंसेवा करत राहिल्यास आपण स्वतःमध्ये एक वेगळीच सकारात्मकता अनुभवाल. त्यामुळे मित्रांनो, उतारवयातमध्ये शारीरिकरित्या अक्टिव्ह राहणे मेंदूसाठी किती फायदेशीर असते, हे आपण या लेखाद्वारे जाणून घेतले. पण तरुणवयातही आरोग्य निरोगी राहण्याकरिता नियमित व्यायाम करणे आणि अशा स्वयंसेवी कार्यांमध्ये सहभाग नोंदवणे गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT