Mental Health esakal
आरोग्य

Mental Health : साफसफाई विषयी कॉनशीयश आहात? असू शकतो मानसिक आजार

आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक लोकं बघतो ज्यांना साफ सफाईची खूप जास्त सवय असते

सकाळ डिजिटल टीम

Obsessive Compulsive Disorder : आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक लोकं बघतो ज्यांना साफ सफाईची खूप जास्त सवय असते, किंबहुना असं म्हणू की वेड असत किंवा ही सवय तुम्हालाही असेलच. खरंतर ही गोष्ट एकाअर्थी चांगली आहे. आपण नेटक राहणं यात काही वाईट नाही.

पण जेव्हा या सवईचा अतिरेक होतो तेव्हा हा एक मानसिक आजार आहे हे समजून जा. याचा त्रास तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही होत असतो. सतत गोष्टी जागच्या जागी ठेवणं, कपड्यांची सळ न बिघडवता घडी घालणं, बेडशीट व्यवस्थित लागणं, जेवणाच ताट व्यवस्थित लागणं, सतत घर झाडण, फोनमध्ये खूप नोटिफिकेशन दिसले खूप अॅप्लिकेशन सुरू आहेत अस दिसल तर चिडचिड होणं ही सगळी या आजाराची लक्षणं आहेत.

नक्की काय आहे आजार?

ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर (ओ सी डी) असं या आजारच नाव आहे, हा आजार असलेले व्यक्ती थोडीशी अस्वच्छता दिसली तरी चिडचिड करू लागतात; त्यांना ते सहन होत नाही; त्यांना प्रत्येक गोष्ट ही फार नेटकी लागते; कोविड नंतर या रुग्णांच प्रमाण वाढल आहे. जर यांना काही गोष्टींची जागा पटत नसेल, कचरा दिसत असेल तर ते चिडचिड करून पटापट ते आवरण्याच्या मागे असतात.

ही आहेत ओसीडीची मुख्य लक्षण

- सतत खूप ओव्हरथिंक करणे.

- गोष्टींकडे वारंवार लक्ष देणे, उदा, गॅस बंद आहे की नाही हे बघणे किंवा दरवाजा लॉक केला की नाही हे चेक करणे.

- गोष्टी विशिष्ट ऑर्डर मध्ये ठेवणे, कुठेही जाण्याआधी त्याच प्रॉपर प्लॅनिंग करणे आणि ते दहा वेळेस घोकणे .

- अचानक, वारंवार अवयवांची हालचाल करणे जस की सतत एक पाय हलवत राहणं, किंवा कपाळावर आठ्या असणं, खांदा उडवण.

- सतत घसा खाकरणे, वारंवार शिंकणे.

- स्वतःसाठी आणि इतरांसाठी हिंसक विचार येणे.

- किटाणूची लागण किंवा हात खराब होतील या भीतीने वारंवार हात धुणे किंवा स्वच्छता करणे.

ओसीडीची कारणं नक्की काय?

- मेंदूमध्ये विकृती.

- आजूबाजूचं वातावरण

- मेंदूच्या विविध भागात संपर्क नसणे

- अनुवांशिकता

- सेरोटीनची पातळी कमी असणं

ओसीडीचे नक्की उपाय काय?

तुम्ही सायकोलॉजिस्ट कडे जाऊन याच निदान करू शकतात. तसा पूर्णपणे हा आजार बरा होऊ शकत नाही. तरी ओसीडीच्या उपचारासाठी खालील पर्याय वापरले जातात:

- औषध : मेंदूमधल्या केमिकल्सचा समतोल साधण्यासाठी डिप्रेशन कमी करणारी औषधे लिहून दिली जातात. सिलेक्टिव्ह सेरोटीन रेउपटेक इन्हिबिटर्स (एसएसआरआयस) मेंदूतील सेरोटीन ची पातळी वाढण्यासाठी लिहून दिले जातात त्यामुळे ओसीडी ची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

- मानसिक उपचार: ही थेरपी अति विचार आणि भिती कमी करायला मदत करते.

- डिप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) : ही उपचारपद्धती अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरतात ज्यांना कमीत कमी पाच वर्षांपासून ओसीडी आहे, अशात काही वेळेस इलेक्ट्रिक शॉकही दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT