Mental Health  esakal
आरोग्य

Mental Health : ताण-तणावापासून आराम मिळवण्यासाठी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स, तुमचे मानसिक आरोग्य राहील उत्तम

Mental Health : कामाच्या अधिकच्या तणावामुळे, नैराश्य आणि चिंता या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Mental Health : सध्याचे धावपळीचे जीवन, बिघडलेला आहार, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अन् व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे शारिरीक आणि मानसिक समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

कामाच्या अधिकच्या तणावामुळे, नैराश्य आणि चिंता या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे, सर्वांनी मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण, आपण अनेकदा शारिरीक समस्यांकडे नीट लक्ष देतो परंतु, मानसिक आरोग्याकडे म्हणावे तितके लक्ष देत नाही.

जर तुम्हाला मानसिक आरोग्याची व्यवस्थीत काळजी घ्यायची असेल तर, तुम्ही आहाराकडे नीट लक्ष द्यायला हवे. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अशी काही पेये आहेत, ज्यांचे रोज सेवन करणे हे मानसिक अन् शारिरीक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

त्यामुळे, या पेयांचे रोज सेवन करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला मानिसक आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्याया या उपयुक्त हेल्दी ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत.

ग्रीन टी

ग्रीन टी हे केवळ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर नसून ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी देखील उत्तम आहे. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे विपुल प्रमाण आढळते, जे एकूणच आरोग्यासाठी लाभदायी पेय आहे. ग्रीन टीमुळे ट्रायग्लिसराइड्स आणि शरीरातील खराब कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. त्यामुळे, ग्रीन टी चा तुमच्या आहारात जरूर समावेश करा.

पालेभाज्या आणि फळांचे ज्यूस

विविध प्रकारचे फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचे रस आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि शारिरीक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या पेयांव्यतिरिक्त डार्क चॉकलेट, ओटमील, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी स्मूदी, कॅमोमाईल फ्लॉवर टी, हळदीचे दूघ इत्यादी पेये देखील तणाव, चिंता, नैराश्य आणि चिंता दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे, या पेयांचा तुमच्या रोजच्या आहारात जरूर समावेश करा.

अश्वगंधा पेय

अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगण्यात आले आहे. अनेक आजारांवर आणि मानसिक आरोग्यासाठी ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे. या औषधी वनस्पतीमध्ये अनेक प्रकारच्या अँटिऑक्सिडंट्सचा समावेश आढळतो. या वनस्प्तीपासून बनवलेले पेय प्यायल्याने ताण-तणावाची पातळी कमी होते. तसेच, मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

लस्सी

दह्यापासून बनवलेली लस्सी अनेकांना प्यायला आवडते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आहारात या लस्सीचा समावेश असतो. दह्यापासून बनवलेली लस्सी आपले मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करते. दह्यामध्ये आढळणारे मायक्रोबॅक्टेरिया तणाव, चिंता आणि नैराश्यापासून आराम मिळवून देतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT