Mental Health  Esakal
आरोग्य

Mental Health : तूमच्या मनातही येतो का आत्महत्येचा विचार?

भारतात स्त्रीयांपेक्षा पुरुषांमध्ये आत्महत्या करण्यामचे प्रमाण अधिक

सकाळ डिजिटल टीम

मला खूप टेन्शन आलेय. ती मला नाही म्हणाली, आज माझ लग्न मोडलं, माझी प्रकृती ठीक नसते, घरच्यांना माझे ओझे आहे, मी परिक्षेत नापास झालोय. मला आयुष्य नकोसे झालेय. पैशाचे प्रॉब्लेम तर संपतच नाहीत.या सर्व प्रश्नांवर काहीच उत्तर नसेल तर आत्महत्या हा एकच पर्याय उरतो, असा विचार सर्वच करतात. आजही समाजात किरकोळ करणातून आत्महत्या केलेल्या घटना आपण रोज वाचतो.

रोजच्या जीवनातील कारणे तर किरकोळ असतात. पण, त्यावर टोकाचे पाऊल उचलायलाही लोक मागे पुढे पाहत नाहीत. तूम्हालाही कोणते ना कोणते टेंशन असेल. तर, तूम्हीही आयुष्यात असा विचार केलाय का. गेल्या काही वर्षात नापिकी, कर्जाचा भार यामूळे देशभरात अनेक शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.   

जीवन संपविण्याचा नकारात्मक विचार मनात सतत घोळत राहिल्यानंतर थेट आत्महत्या केली जाते, हा एक प्रकार आहे. तर काही जण इतरांचे केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी जीविताला हानी होणार नाही, हे लक्षात घेऊन आत्महत्येचा फक्त प्रयत्न करतात. ९ सप्टेंबर रोजी गुजरात पालनपूरमधील एका तरुणाने लग्न मोडल्याच्या करणातून आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या काही विशिष्ट वयोगटासाठी मर्यादित नसून टेन्शनमधून जाणारा प्रत्येक व्यक्ती या अवस्थेला समोरा जातो.  

आत्महत्येची कारणे कोणती

मानसोपचारतज्ज्ञ यांच्या मते, नैराश्य आणि स्क्रिझोफ्रेनिया हे आजार मुख्य कारण ठरते आहे. स्क्रिझोफ्रेनियाने ग्रस्त ५० टक्के रुग्ण आत्महत्येचा हमखास प्रयत्न करतात. त्यातील १५ टक्के रुग्णांचा जीव जातो. यासोबत व्यसन हादेखील मानसिक आजार असून, नशेत आत्महत्येचा विचार करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

जागतिक अहवालानुसार जगात प्रति ४० सेंकदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. मानसिक तणाव, मानसिक विकृती या प्रमुख कारणांनी आत्महत्या केली जाते. आजकाल तर अगदी ७ वर्षांच्या लहान मुलांपासून अगदी ८०-९० वर्षाचे वृद्धही आत्महत्या करतात. जेव्हा वय लहान असते तेव्हा कोणी समजून सांगणारे नसते आणि जेव्हा वय ८० च्या वर होते तेव्हा समजून घेणारे कोणी नसते. तारुण्यात आपल्या मनाचे आपण राजे असलो तरीही काही किरकोळ कारणे आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त करू शकतात.

पुरुष करतात जास्त आत्महत्या

भारतात पुरुषांमध्ये आत्महत्या करण्यामचे प्रमाण अधिक आहे. नैराश्य आणि तणावामुळे पुरुष जास्त आत्महत्या करतात असे म्हटले जाते. NCRB (नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो) नुसार २०१५ मध्ये भारतात ९१ हजार ५२८ पुरुषांनी आत्महत्या केली होती. तर २००५ ते २०१० मध्ये ६६ हजार ०३२ आणि ८७ हजार १८० पुरुषांनी आत्महत्या केली होती.

सकारात्मक विचारात रहा

आत्महत्येचे विचार जेव्हा तुमच्या मनात येतील तेव्हा अगदी मनमोकळे जगायला सुरु करा. जे केले नाही ते करा. सकारात्मक विचारात रहा. सतत प्रेरणा मिळेल अशा व्यक्तीसोबत रहा. 

बोलत रहा

आवडत्या व्यक्तीसोबत बोला. कोणीही नसेल तर आई- वडील,बहीण, भाऊ, शिक्षक आणि मित्र यांच्याशी बोला. कोणतेही टोकाचे पाउल उचलण्या आधी एकदा या गोष्टी नक्की मनात आणून बघा.

मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला

मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आवडत्या व्यक्तीशी कायम मोकळेपणाचा संवाद ठेवा. सोशल मिडियाच्या नव्हे तर रिअल आयुष्यात जगा. मानसिक आजारांवर सकारात्मक चर्चा घडावा.

तूमचा एखादा मित्र सतत आत्महत्या करण्याबद्दल बोलत असेल तर काय कराल...

आर्थिक चणचण असल्यास किंवा बेरोजगारीच्या समस्येमध्ये इतर पर्यायांची चर्चा करा. एखाद्या आरोग्यदायी छंदामध्ये किंवा व्यायाम प्रकारामध्ये मन रमवण्याचा अधिक प्रयत्न करा. आयुष्यातील नकारात्मक प्रसंगापासून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. मोकळेपणाने बोला म्हणजे मन हलके होण्यास मदत होईल. मानसोपचार किंवा इतर मार्गाने मदत पोहचवण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT