Mental Health esakal
आरोग्य

Mental Health :  तणाव कि आजारपण लोक कशामुळे करतात आत्महत्या, नक्की काय आहे कारण जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Experts Opinion On Suicide Due To Stress & Illness :जर तुम्ही स्वत: आत्महत्या करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या ओळखीतील व्यक्ती असा विचार करत असेल तर त्याच्या काही लक्षणे अन् धोक्याच्या इशाऱ्याबाबत तुम्हाला माहिती असायलाच हवी.

सकाळ डिजिटल टीम

 Mental Health :

बॉलिवूड अभिनेत्री मलायिका अरोरा हिच्या वडिलांनी आत्महत्या केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अनिल अरोडा यांनी आज सकाळी वांद्र्यातील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण बॉलिवूड हादरून गेले आहे. कारण, बॉलिवूड क्षेत्रातही आत्महत्येच्या घटना घडत आहेत.


एखादा व्यक्ती इतक्या टोकाचं पाऊल उचलण्यासाठी तणाव हे एकमेव कारण आहे. एखादा व्यक्ती आत्महत्येचा विचार करत असेल तर ते थांबवता येऊ शकतं. जर तुम्ही स्वत: आत्महत्या करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या ओळखीतील व्यक्ती असा विचार करत असेल तर त्याच्या काही लक्षणे अन् धोक्याच्या इशाऱ्याबाबत तुम्हाला माहिती असायलाच हवी. (Mental Health)

याबद्दल मनोविकार विशेषज्ञ परोमित्रा यांनी सविस्तर माहिती दिली आहे. जे लोक आत्महत्येचा विचारात असतात ते आपल्या जवळच्या लोकांशी असे काही प्रश्न विचारत असतात.

आत्महत्येचा विचार करणारे लोक सतत असे बोलत असतात

आत्महत्या ही कृतीत उतरण्याआधी त्यावर बऱ्याच गोष्टींचा विचार केलेला असतो. आत्महत्या करणारा व्यक्ती काही दिवस आधी, मी स्वत:ला संपवून टाकेन किंवा मी मेलो तर काय होईल. मी मेलो असतो तर बरं झालं असतं, असे ते लोक म्हणत असतात. तसेच, आत्महत्या सत्यात उतरण्यासाठी असे लोक त्याची साधनंही गोळा करत असतात. म्हणजे हत्यारं, झोपेच्या गोळ्या, विषारी औषधे, त्यांची माहितीही ते शोधत असतात.

असे लोक एकटे राहतात

आत्महत्या करण्याचा विचार करणारे लोक समाजापासून दूर राहणे पसंत करतात. ते चार-चौघात मिसळत नाहीत. नेहमी एकटे राहण्याचा विचार करतात.

मूड स्विंग्स

आत्महत्येचा विचार करत असलेले लोक सतत नकारात्मक असतात. ते एक दिवस खूश असतात तर दुसऱ्याच दिवशी नाराज असतात. कारण, ते त्या आत्महत्येच्या विचारात इतके दंग असतात की त्यांचे त्यांच्या मूड्सवर कंट्रोल राहत नाही.

नैराश्य

एखाद्या गोष्टीत आपण अडकलो आहोत. त्यातून आपण बाहेर नाही पडू शकत असे विचार ते लोक करतात. त्यामुळे, असे लोक नैराश्येत जातात. आणि व्यसनांच्या आहारी जातात. त्यामुळे त्यांचा दिनक्रम बिघडतो.

विचित्र वागणे

जे लोक सतत आत्महत्येचा, जीवन संपवण्याचा विचार करतात. ते लोक विचित्र वागतात. असे लोक स्वत:ला त्रास होईल असे वागतात. कधी गाडी बेसावधपणे पळवतात. तर, कधी हातावर चाकूने वार करतात.

आत्महत्येचा विचार करणारा व्यक्ती नकारात्मक बोलणारा असतो. असा व्यक्ती भेटेल त्या व्यक्तीला मरणाच्या गोष्टी बोलतो. त्याला सांगतो, आता भेटलोय, पुन्हा भेट होईल की नाही माहिती नाही, असेही सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Adani Group: अदानींना एकाच वेळी 3 मोठे झटके, 600 दशलक्ष डॉलरची योजना रद्द, केनिया करारही रद्द आणि...

Nashik Vidhan Sabha Election 2024 : वाढलेला टक्का, कोणाच्या छातीत कळ, कुणाला पाठबळ..? उमेदवारांमध्येच चर्चा

केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं... प्राजक्ता माळीची इन्स्टावर नवी पोस्ट, हसऱ्या चेहऱ्याने दिली आनंदाची बातमी

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव?

SCROLL FOR NEXT