Mental Health esakal
आरोग्य

Mental Health : कोणी कोणाचं नसतं हेच खरं; डिप्रेशनमधून बाहेर पडायला स्वत:ला अशी करा मदत!  

या गंभीर आजाराची कारणे काय असू शकतात

Pooja Karande-Kadam

Mental Health : सतत होत असलेल्या आत्महत्येमागे नैराश्य अर्थात Depression हे एकच कारण सांगण्यात येत आहे. नैराश्य आल्यामुळे या सेलिब्रिटींनी केलेल्या आत्महत्या सर्वांसमोर येत आहेत. पण असे अनेक लोक आहेत जे नैराश्याच्या गर्तेत येऊन आत्महत्या करतात. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे दिसून येत आहेत. पण नेमकं नैराश्य म्हणजे काय आणि याची लक्षणे काय आहेत? या आत्महत्या रोखता येऊ शकतात का? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात.

मानसिक आरोग्य खूप महत्वाचे आहे. जगभरातील मोठ्या संख्येने लोक नैराश्य आणि नैराश्याच्या समस्येशी झुंजत आहेत. अशा परिस्थितीत योग्य वेळी स्वतःच्या मानसिक आरोग्याबाबत जागरुक राहणे आवश्यक आहे. अनेक सेलिब्रिटींनीही मानसिक आरोग्य आणि नैराश्याबद्दल उघडपणे बोलले आहे. जर तुम्ही नैराश्याच्या काळातून जात असाल, तर या स्व-काळजी संबंधित गोष्टी मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतील.

नैराश्याचे प्रकार किती आहेत

मेजर डिप्रेशन डिसऑर्डर

नैराश्याच्या सर्वात गंभीर प्रकारांपैकी हा एक प्रकार आहे. सतत दुःखी राहणे, निराशा येणं आणि आपण निरूपयोगी आहोत ही भावना सतत मनात बाळगणं. मनातून कधीही वाईट विचार निघून जात नाहीत आणि आत्महत्येला प्रवृत्त करणारे विचार सतत मनात घोळत राहतात.

पर्सिस्टंट डिप्रेससी डिसऑर्डर

सतत नकारात्मक विचार आणि त्रास यामुळे साधारण २ वर्षे यातील लक्षणे दिसून येतात. सतत डिप्रेशन येणे आणि त्रास होणे याला डिस्टिमिया असेही म्हटले जाते.

मॅनिक डिप्रेशन अथवा बायपोलर डिसऑर्डर

हायपोमेनिया आणि अति मूड बदलणे या पद्धतीचे हे डिप्रेशन असते. हे नैराश्य असणाऱ्या व्यक्तींचे मूड हे सतत मिनिटामिनिटाला बदलत असतात. या व्यक्ती दिवसरात्र काही ना काही करत असतात पण त्यांना अजिबातच थकवा येत नाही. त्यांना नैराश्याने ग्रासले आहे हे स्वतःलाही माहीत नसते.

या गंभीर आजाराची कारणे काय असू शकतात

  • आत्मविश्वासाची कमतरता अथवा स्वतःला कमी लेखणे

  • मानसिक अस्वास्थतेची अनुवंशिकता अथवा इतिहास असणे

  • काही औषधांच्या सेवनामुळे त्रास

  • तणावपूर्ण घटना आयुष्यात घडल्यामुळे

  • आयुष्यातून महत्त्वाच्या व्यक्तीला गमावल्यामुळे

  • आर्थिक समस्यांमुळे

  • घटस्फोट झाल्यामुळे

  • बाळ गमावल्यामुळे

मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

तुमची मानसिक स्थिती हलक्यात घेऊ नका. तणाव, नैराश्य किंवा नैराश्याची स्थिती दर्शवणारी कोणतीही लक्षणे. त्यामुळे ताबडतोब सावध व्हा आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

योग्य वेळी मदत आवश्यक आहे

नैराश्य आल्यास योग्य वेळी मदत मिळणे गरजेचे आहे. मानसोपचार तज्ज्ञाकडून समुपदेशन आणि थेरपी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मनातील नकारात्मक गोष्टी काढून टाकून जीवनात पुढे जाऊ शकता आणि नैराश्यावर मात करू शकता.

नैराश्याबद्दल बोला

डिप्रेशनमध्ये रुग्णालाच नव्हे तर त्याच्या मित्राचा आणि कुटुंबातील सदस्याचा पाठिंबाही खूप महत्त्वाचा असतो. ज्यांच्याशी तो त्याच्या मानसिक स्थितीबद्दल आणि मनःस्थितीबद्दल बोलू शकला. नैराश्याच्या प्रसंगी, एखाद्या खास, जवळच्या व्यक्तीशी बोला आणि मानसिक आरोग्याबद्दल निश्चितपणे सांगा.

स्वतःची काळजी घ्या

नैराश्यावर मात करण्यासाठी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. नकारात्मक गोष्टींचा तुमच्या मनावर परिणाम होण्यापासून रोखा. योग, प्राणायाम, व्यायाम यासारख्या गोष्टी यात तुम्हाला मदत करतील. काही दिवसांसाठी दैनंदिन जबाबदाऱ्यांपासून मुक्त व्हा आणि तुमच्या मानसिक स्थितीकडे पूर्ण लक्ष द्या.

कुटुंब आणि मित्र महत्वाचे आहेत

नैराश्याच्या अवस्थेत सपोर्ट सिस्टीम खूप महत्वाची असते. जेणेकरुन आपण आपले मन मोकळेपणाने बोलू शकू आणि ते तुम्हाला न्याय न देता ऐकतात आणि समजून घेतात. अशी काही माणसं आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे.

काम आणि जबाबदाऱ्यांचा समतोल साधा

तुमची आवड, छंद आणि काम तसेच जबाबदाऱ्या यांच्यात समतोल राखा. जास्त काम आणि जबाबदाऱ्यांचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unsold Player IPL Mega Auction 2025: अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर यांना फ्रँचायझींनी दाखवला 'ठेंगा'; मुंबईच्या खेळाडूचं नेमकं काय चुकलं?

IPL 2025 Auction Live: फाफ डू प्लेसिससाठी CSK-RCB आले नाहीत पुढे, तर सॅम करनला थालाच्या टीमनं स्वस्तात केलं खरेदी

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंची सारवासारव! थेट गृहमंत्री पदाची केली मागणी, म्हणाले...

MLA Siddharth Shirole : शिवाजीनगर विधानसभा नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा विकासाचा अजेंडा

Earth Axis Tilt : धक्कादायक! पृथ्वी ३१.५ इंचांनी झुकली..भारत ठरतोय कारणीभूत, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT