Mental health esakal
आरोग्य

Mental health : सोशल मीडियावरील ‘ट्रोलिंग’ मुळे मनोविकाराचे वाढतेय प्रमाण

Mental health : तणावामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी, शाळकरी मुलांमध्येही येते नैराश्य

सकाळ वृत्तसेवा

Mental health : मी ॲण्ड माय फॅमिली एन्जॉय द हॉलिडे’... अशी कॅप्शन देत कुटुंबासोबत फिरायला गेलेला एखादा फोटो फेसबुक, व्हॉटस्ॲप, इन्स्टावर अपलोड होतो. त्यावर लाइक्स, कमेंटचा पाऊस पडत असताना ‘तुम्ही अजून या ठिकाणी गेले नव्हते का? आम्ही तर दर आठवड्याला जातो, एवढं काही विशेष नाही तेथे!,’ अशी प्रकारची एखादी नकारात्मक प्रतिक्रिया पोस्ट होते अन् आपला मूड ऑफ होतो. हे झालं एक प्रातिनिधीक उदाहरण.

आजकाल उठल्यापासून झोपेपर्यंतच्या घडामोडी, सेल्फीज् आणि एन्जॉयमेंटचे स्टेटस् तरुणाईच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर दिसू लागलेत. त्यावर ट्रोलिंग सुरू झाले की मूड खराब होऊन नैराश्यापर्यंत जाण्याच्या घटना घडत आहेत.

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते सोशल मीडियावर नेहमी व्यक्त होणे, हा एक मानसिक विकार असू शकतो. स्पर्धात्मक करिअर, घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे जीवन, नोकरीच्या ठिकाणच्या समस्या, कौटुंबिक समस्या यासह वैयक्तिक समस्यांमुळे तरुणाई मानसिक तणावात असल्याचे दिसून येते. त्यात आता सोशल मीडियाचा वापर, त्यावर होणारे ट्रोलिंग आणि ऑनलाइन गेम्सचे व्यसन या कारणांची भर पडली आहे.

सतत मोबाइलच्या स्क्रीनवर असणारे डोळे अन् त्याच्यावर चालणारी बोटे, एखादा ऑनलाइन गेम खेळताना चाललेली व्हर्च्युअल स्पर्धा, त्यातच मॉर्निंग, इव्हिनिंग सेल्फीज, फोटोज, लाइव्ह लोकेशनचे सोशल मीडियावर शेअरिंग आणि त्या फोटोजवरून येणाऱ्या लाइक्स, कमेंटस् आणि ट्रोलिंग अशा ‘ट्रॅप’मध्ये तरुणाई अडकली आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.

चिंतेची बाब म्हणजे, महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. आपले मानसिक आरोग्य बिघडले आहे, याची जाणीव तरुणाईला लवकर होत नाही. मात्र, सतत नैराश्य येणे, उदास वाटणे, आत्मविश्वास नाहीसा होणे, नव्या गोष्टी करण्यात रस नसणे, अशी लक्षणे ही मानसिक आजाराची असू शकतात. त्यामुळे तरुणांसह नोकरदार वर्गामध्ये मनोविकाराबाबत जागृती होणे गरजेचे आहे.

हे आहेत आजार

  • ऑनलाइन गेम ॲडिक्शन

  • सेल्फी काढण्याचे व्यसन

  • सोशल मीडिया डिप्रेशन

  • नैराश्य, मन एकाग्र न होणे

  • सायकोसिस

  • डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश)

ही आहेत कारणे

  • इंटरनेट व सोशल मीडियाचा अतिवापर

  • नकारात्मक प्रतिक्रिया व ट्रोलिंगचा ताण

  • ऑनलाइन गेमच्या आहारी जाण्याचे दुष्परिणाम

  • ऑनलाइन गेम खेळताना येणारा तणाव

  • सोशल मीडियावर मिळणारी वाईट वागणूक

  • फोटो, व्हिडिओला लाइक्स, कमेंटस् न येणे

स्मार्टफोनचा वाढता वापर, त्याचे लागलेले व्यसन, ऑनलाइन गेमचा वाढता ट्रेंड यामुळे तरुणाई नैराश्यात गेली आहे. सहज उपलब्ध होणारा डेटा आणि तो संपविण्यासाठी वेगवेगळे फंडे यामुळे त्यात अधिकच भर पडली. आपण मानसिक आजारग्रस्त आहोत, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आई-वडील, नातेवाइकांनी त्यांच्यातील बदल ओळखून मनोविकार किंवा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

— डॉ. माणिक भिसे, मनोविकारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: सकाळ माध्यमाच्या नावे व्हायरल होत असलेली 'सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा' ही पोस्ट खोटी

आई झालेल्या दीपिका पादुकोणची उडवली खिल्ली; मग लिहिली त्याहून वाईट कमेंट, नेटकऱ्यांचा संताप अनावर

WBBL, Video: कडक! स्मृती मानधानाने पळत येत घेतला अफलातून कॅच, Video होतोय व्हायरल

Pune Assembly Election 2024 : खा मटण, दाबा आमचे बटण; मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

Kelara Beach : हिवाळ्यात केरळ फिरायचं प्लॅन करत आहात का ? तर या ५ बीच ला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT