Family Sakal
आरोग्य

मानसिक ताण आणि आरोग्य

एकविसाव्या शतकातील मानवाची वाढत जाणारी प्रगती, सुबत्ता आणि शैक्षणिक पातळी भारावून टाकणारी आहे; पण त्याच सोबत एक चिंताजनक गोष्ट वाढत जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

एकविसाव्या शतकातील मानवाची वाढत जाणारी प्रगती, सुबत्ता आणि शैक्षणिक पातळी भारावून टाकणारी आहे; पण त्याच सोबत एक चिंताजनक गोष्ट वाढत जात आहे ती म्हणजे मानसिक आणि शारीरिक ताणतणावाचे प्रमाण. ताण-तणाव जणू आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनून गेला आहे आणि आपल्याला समाज म्हणून त्यामध्ये काही गैर वाटत नाही, हे अधिक चिंताजनक आहे. आपल्यापैकी बहुतांश लोकांना स्ट्रेस किंवा ताण याचा स्वानुभव आहे; तसेच स्ट्रेस मॅनेजमेंट यांच्यावर मोठ्या प्रमाणात भाष्य केले जात आहे.

दररोज जिम करणारे, कोणताही आजार नसलेले, संतुलित आहार घेणारे अमुक एक चाळीशीतील व्यक्ती.. अचानक हृदयविकाराला बळी पडले वगैरे बातम्या आपण अनेकदा ऐकतो! मग आपण चर्चा ऐकतो, की ‘त्यांचे सगळे चांगले होते; पण त्यांना भरपूर मानसिक ताण होता आणि कदाचित म्हणूनच असे घडले असेल का?’ आजकाल लहान मुलांमध्येही स्ट्रेस आढळून येऊ लागलं आहे.

जुनाट आजारांच्या अनुषंगाने जेव्हा मी दीर्घकाळ असणाऱ्या ताणाचा (chronic stress) अभ्यास केला तेव्हा लक्षात आले, की आपल्यातील ताण कमी करता आला, तर आपले आयुष्य फक्त सुंदर नाही तर आरोग्यपूर्ण आणि मोठे होते. हे वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध होत आहे हे समजले.

तुम्हाला जेव्हा मी ताण कसा एका हळू हळू मारणाऱ्या विषापेक्षाही वाईट पद्धतीने आपल्या यंत्रणेला बाधित करतो, हे सांगीन तेव्हा तुम्हीही तुमचा ताण नियंत्रित करून मुक्त प्रकारे जगू लागाल. आपण ताणतणावाचा अर्थ, स्वरूप, आरोग्यावर त्याचे होणारे परिणाम आणि विशेष करून जुनाट आजारांमध्ये त्याची भूमिका हे सर्व बघूया.

नैसर्गिकरित्या ताण वाईट आहे का? मुळात मानवी आयुष्य हे जंगलामध्ये इतर प्राण्यांसामवेत, स्वतःच्या उदरनिरर्वाहासाठी झटत, स्वतःचे संरक्षण करत जगण्यासाठी बनले आहे. त्यामुळे आपल्यातील नैसर्गिक biological cycles याच दृष्टीने सतत कार्यरत असतात.

निसर्गतः आपण जेव्हा निवांत आणि शांत असतो, आपल्यासमोर कोणतेही संकट नसते, तेव्हा जेवण करणे, झोपणे, काम करणे, आपल्याला आवडेल त्या गोष्टी करणे ही आपली अवस्था असते, याच अवस्थेत सर्वांत गाढ झोप लागते, जेवण नीट पचते आणि आपण निरोगी व आनंदी असतो.

मात्र, आपल्यासमोर कोणतेही संकट येते (निसर्गाच्या भाषेत - एक वाघ आपल्यासमोर येणे), तेव्हा आपली निवांत अवस्था जाते आणि आपल्यातील flight or fright response म्हणजे ‘लढा किंवा पळा’ ही अवस्था जागी होते. या अवस्थेमध्ये आपण लढण्यासाठी सुसज्ज होतो, हृदयाची धडधड वाढते, शासोच्छ्वास जलद गतीने होतो, म्हणजे पळून जाण्यासाठी किंवा लढण्यासाठी शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळतो!

सोबतच आपण अधिक सतर्क होतो, जलद विचार करू लागतो. थोडक्यात आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्यावर आपण पंचप्राण एकवटून स्वतःचे रक्षण करावे यासाठी ही अवस्था निसर्गाने तयार केली आहे. ही अवस्था वाईट नसून, आपल्या जिवाच्या बचावासाठी चांगलीच आहे. या ‘लढा किंवा पळा’ या अवस्थेला सिंपॅथेटिक नर्व्हस (sympathetic nervous) सिस्टिम म्हणतात.

आपल्याला अशा संकटपूर्ण अवस्थेत सतर्क वाटले नसते आणि चुकून झोप लागली असती तर?.. हा किंवा अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ पुढील लेखात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT