Heart Attack 
आरोग्य

मानसिक तणावामुळे होऊ शकतो हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोक - संशोधन

सकाळ डिजिटल टीम

Health News : ह्रदयाच्या (Heart Health) आरोग्याबाबत चिंता वाटणे सहाजिक आहे. सामान्यत: ह्रदयासंबधीत आजारामागे(Heart Disease) उच्चरक्तदाब(Blood Pressure), धुम्रपान(Smoking), मधूमेह(Diabetic) किंवा लठ्ठपणा(Obesity) या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. शारिरीक हालचाल (Physical Work) कमी करणे देखील ह्रदयासंबधी आजारासाठी कारणीभूत ठरतात. पण तुम्हाला माहित आहे का मानसिक ताण(Mental Stress) देखील हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकसाठी कारणीभूत ठरू शकतो. नुकत्याच झालेल्या संशोधनामधून हे समोर आले आहे. संशोधनामध्ये समोर आले की, मानसिक ताण हृदयाच्या धमन्या अडचणी निर्माण करतात ज्यामुळे हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढवू शकतो. (Mental Stress May Result in Heart Attack, Stroke, Confirms New Study)

heart attack

जर एखादा व्यक्ती दिर्घकाळ मानसिक तणावाखाली असेल तर त्याला हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोक होऊ शकतो. जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन द्वारे केल्या गेलेल्या अभ्यासानुसार, ज्यांचे ह्रदय कमी निरोगी असलेल्यांना अ‍ॅटॅक, स्ट्रोकचा त्रास आणि कार्डियोवस्कुलर डिजीजसाठी शारिरीकपेक्षा मानसिक तणाव जबाबदार असतो. संशोधनातून समोर आले आहे की, ह्रदयासंबधी आजारांना ९०० पेक्षा जास्त लोकांवर शारिरीक आणि मानसिक तणावाचे परिणाम दिसून आला. या काळात समोर आले की, मानसिक ताण मायोकार्डिअल इस्किमियाची जोखीम वाढवत आहे. अशा वेळी या स्थितीमध्ये ह्रदयामध्ये रक्ताभिसरणचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे ह्रदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढू शकतो.

५२ देशांमध्ये २४ हजार पेक्षा जास्त लोकांवर केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे की, लोकांमध्ये उच्च पातळीचा मानसिक ताण (High levels of Mental stress) दिसून आला. त्यांना ह्रदय स्ट्रोक, अ‍ॅटॅकचा धोका दुपट्ट असतो. कार्डिआलॉजिस्ट मायतल ओसबोर्ननुसार, मानसिक तणावाचे कारण नोकरी जाणे, घरात झालेले मोठे नुकसान किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीला गमावणे असू सकतो . सतत आर्थिक अडचणींचा सामना करणे, चिंता करणे किंवा गंभीर नैराश्य ह्रदयासंबधी आजारासांठी कारणीभूत ठरू शकते. तणाव वाढल्यावर मेंदूतील फिअर सेंटर रिअॅक्ट करते आणि हार्मोन रिलीज करू लागते. त्यामुळे शरीरामध्ये फॅट, बीपी आणि इन्सुलिन, प्रतिरोध वाढू शकतो. जेव्हा वारंवार असे होते तेव्हा हृदयाच्या धमन्यामध्ये सूज येते. त्यामुळे रक्तामध्ये गाठी होऊ शकते. त्याचा परिणाम हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोकच्या रुपात समोर येऊ शकतोय.

mental stress

या गोष्टींकडे द्या लक्ष

संशोधकांच्या मतानुसार, तणाव कमी करण्यासाठी प्रोग्रॅम्सचा फायदा होऊ शकतो. यामध्ये योगा, मेडिटेशन आणि ताइ ची यांचा समावेश होऊ शकतो. नियमित वर्कआऊट करणे तणाव दूर करते . या शरीर का पैरासिम्पेथेटिक तंत्र सक्रिय होते. डॉ. ओसबोर्न सांगतात की, पुरेशी झोप देखील ह्रदयासंबधीत आजारांचा धोका कमी करू शकतो. असा वेळी झोपण्याचा आणि जागण्याचा पॅटर्न बनवणे आवश्यक आहे. झोपताना स्मार्टफोन किंवा कंप्युटर वापर टाळा कारण त्यातून बाहेर पडणारा निळा प्रकाश घातक असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT