dama asthma upay: पावसाळा हा एक सुंदर ऋतू असला या काळामध्ये वातावरणात गारवा आणि प्रसन्नता असली तरी पावसाळा आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येत असतो पावसाळ्यामध्ये वातावरणात Monsoon Environment ओलावा आणि दमटपणा वाढल्याने बुरशीजन्य Fungal जीवाणू आणि विषाणूंची वाढ जलद होते. Monsoon Health Care Tips in Marathi what care Asthma Patients should take
परिणामी संसर्गाचा धोका वाढतो. पावसाळ्याच्या काळामध्ये सर्दी, खोकला, टायफाइड, कॉलरा आणि हिपॅटायटीस ए व्यतिरिक्त आर्द्रता आणि पावसामुळे दम्याच्या रुग्णांच्या Asthma Patients समस्या वाढतात. वातावरणातील बदलांमुळे Environmental Changes दम्याच्या रुग्णांना अॅलर्जी किंवा दम्याचे झटके येऊ शकता. काही वेळेस हे झटके सौम्य असले तरी काही वेळेस ते गंभीरही असू शकतात.
पावसाळ्यात दम्याचा त्रास वाढण्याची कारणं
पावसाळ्यामध्ये Monsoon ओलावा आणि दमट वातावरणामुळे परागकण आणि बुरशीचं प्रमाण वाढतं. खास करून जिथं ओलावा जास्त आहे तिथं बुरशीचं प्रमाण वाढताना दिसतं. जेव्हा दम्याचा रुग्ण श्वास घेतो तेव्हा वातावरणातील परागकणांचा संपर्क येतो तसंच बुरशीचा वासामुळे दम्याचा त्रास वाढू शकतो.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये व्हायरल आणि बॅक्टेरियल इंफेक्शनमुळे देखील दम्याच्या रुग्णांना दम्याचा अधिक त्रास जाणवू शकतो. यामुळे दम्याच्या रुग्णांना शिंका येणं, श्वास घेण्यास अडचण निर्माण होणं, सतत सर्दी होणं, खोकला, डोळ्यांध्ये खाज येणं, तसंच खसा खवखवणे, अंगदुखी किंवा शरीरावर खाज येणं असे त्रास जाणवू शकता.
हे देखिल वाचा-
दम्याच्या रुग्णांनी पावसाळ्यात घ्यायची काळजी
गरम जेवण आणि पेय- पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दम्याच्या रुग्णांनी ताजं आणि गरम अन्न खावं. तसचं ब्लॅक टी किंवा सूप असं गरम पेय प्यावं. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दम्याचा त्रास कमी व्हावा यासाठी आहारामध्ये ब्राऊन राइस, हिरव्या पालेभाज्या, गाजर, फ्लावर, रताळं, मोड आलेली धान्यं आणि अंडी यांचा समावेश करावा.
त्याचसोबत इडली डोसा अशा पदार्थांचा नाश्त्यामध्ये सहभाग करून जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त आहार घ्यावा.
वाफ घ्यावी- दम्याच्या रुग्णांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये श्वसनास त्रास होत असल्याच जीरं, तुळसं पाण्यामध्ये उकळून या पाण्याची वाफ घ्यावी. यामुळे श्वास घेणं सोपं होईल.
स्वच्छता राखावी- अनेकदा घरातील धूळ तसंच भिंतीवर आलेल्या ओलाव्यामुळे दम्याचा त्रास वाढण्याची शक्यता जास्त असते. यासाठीच घरात स्वच्छता राखणं गरजेचं आहे. यासाठीच बिछान्यावरील चादर तसंच उश्यांची कव्हर नियमितपणे बदला.
तसंच घरातील पडदे किंवा गालीचे देखील कायम स्वच्छ ठेवावे.
दम्याच्या रुग्णांनी पावसाळ्यात घ्यायची इतर काळजी
दम्याच्या रुग्णांनी पावसात भिजणं टाळावं.
तसंच धूळ, कचरा, घाण, माती किंवा चिखल आणि धूर अशा ठिकाणी जाणं टाळावं.
नियमितपणे श्वसनाचे व्यायाम आणि इतर योगासनं किंवा व्यायाम करावा.
जास्त थंड, जास्त आंबट किंवा तिखट आणि तेलकट पदार्थ खाणं टाळावं.
याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दम्याचा त्रास अधिक झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हे देखिल वाचा-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.