Monsoon Yoga Tips
Monsoon Yoga Tips esakal
आरोग्य

Monsoon Yoga Tips : पावसाळ्यात 'या' योगासनांशी कराल गट्टी तर विविध आजारांची होईल सुट्टी.!

Monika Lonkar –Kumbhar

Monsoon Yoga Tips : देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार कमबॅक केले असून पुढील काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे.

पावसाळा आला की सोबत भरपूर पाऊस आणि थंडी घेऊन येतो. या पावसामुळे एका बाजूला कडाक्याच्या उष्णतेपासून आराम मिळतो तर दुसऱ्या बाजूला वातावरणात आर्द्रता आणि चढउतार पहायला मिळतात.

या दमट वातावरणामुळे संसर्ग आणि विषाणूंचा धोका असतो. त्यामुळे, आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. या दिवसांमध्ये आपल्याला घराबाहेर पडता येत नाही. सततच्या पावसामुळे बाहेर पाणी साचलेले असते. त्यामुळे, अनेक फिटनेसप्रेमी लोकांना चालायला जायला मिळत नाही, कधीकधी जिमला देखील दांडी मारावी लागते.

त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरच्या घरी योगा करू शकता. पावसाळ्यातील विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी योगा फायदेशीर आहे. आज आम्ही अशाच काही योगासनांबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही पावसाळ्यात ही हेल्दी राहू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या योगासनांबद्दल.

विविध संसर्गापासून दूर ठेवणारे सेतूबंधासन

सेतूबंधासन हे योगासन आपल्या मानसिक अन् शारिरीक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पावसाळ्यात सेतूबंधासन या योगासनाचा नियमित सराव केल्याने सर्दी आणि घशाच्या संसर्गासारख्या सामान्य आजारांपासून संरक्षण होते. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे योगासन लाभदायी आहे.

या योगासनाचा सराव केल्याने मेंदूतील रक्ताभिसरण चांगले होते. तसेच, घशातील स्नायूंना ही तंदूरूस्त ठेवले जाते. हे स्नायू ताणले जातात, त्यामुळे, थायरॉईड ग्रंथी सक्रिय होतात. पावसाळ्यात घरच्या घरी तुम्ही या योगासनाचा नक्की सराव करा.

धनुरासनाच्या सरावामुळे पचनक्षमता तंदूरूस्त राहते

पावसाळ्यात आपली पचनक्षमता मंद होते. खाल्लेले अन्न नीट पचत नाही, कारण पावसामुळे आपली शारिरीक हालचाल कमी होते. चालणे-फिरणे कमी होते. याचा परिणाम आपल्या पचनक्षमतेवर होतो. पचन नीट न झाल्यामुळे पोटाशी संबंधित विविध समस्या उद्भवतात.

अशा परिस्थितीमध्ये तुम्ही धनुरासनाचा नियमित सराव करू शकतो. धनुरासन दररोज केल्याने पोटाचे स्नायू मजबूत होतात. तसेच, पचनाच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे. त्यामुळे, या दिवसांमध्ये घरच्या घरी धनुरासनाचा नियमित सराव नक्की करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India’s Jersey: काय सांगता? टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठी चूक? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणीच दिले नाही लक्ष

Sharad Pawar : शरद पवार विधानसभेच्या कामाला! पुण्यात दोन माजी आमदारांनी घेतली पवारांची भेट

Mahayuti Sarkar: महाराष्ट्राला गतिशील करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प; आ. रणधीर सावरकरांचा दावा

Police Bharti : पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत धावताना तरुणाचा मृत्यू; पोलिस मुख्यालयातील घटना

Devendra Fadnavis : ''प्रवक्त्यांना फारच खुमखुमी असेल तर...'', महायुतीच्या मेळाव्यात फडणवीसांनी वाचाळवीरांना फटकारलं

SCROLL FOR NEXT