Side Effects Of Mosquito Coil : डास घालवण्यासाठी मॉस्कीटो कॉइल हा सगळ्यात स्वस्त पर्याय आहे. पण फार कमी लोकांना हे माहित आहे की, याच्या धुराने डासांसोबत तुमचाही जीव घेऊ शकतो. या दुर्घटनेशिवाय फुफ्फूसांचे विकारही होऊ शकतात.
दिल्लीत डास घालवण्यासाठी लावलेल्या कॉइलमुळे ६ लोकांचा जीव गेला. एकाच कुटुंबातले ६ लोक गुदमरून मृत्यू पावले. सांगण्यात येतंय की, कॉइलमुळे उशीला आगल लागली. यामुळे खोलीत धुर दाटून गुदमरले. या कॉइलमुळे फक्त आग लागण्याचाच धोका नाही तर हा धूर सिगरेटच्या धुरापेक्षा धोकादायक असतो असं डॉक्टर्स सांगतात. विशेषतः जर तुम्ही खोली बंद करून त्या कॉइलच्या धूरात जास्तवेळ राहत असाल.
श्वासाशी निगडीत आजार
उन्हाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला असतो. यातून सुटका मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. यात मॉस्किटो कॉइल हा सर्रास वापरला जाणारा प्रकार आहे.
पण याच्या धुरात घातक केमिकल असतात.
यामुळे फुफ्फूस खराब होतीत.
अस्थमा, सीओपीडीसारखे आजार होतीत.
यामुळे लंग्ज कँसर होण्याचाही धोका असतो.
फक्त कॉइल्सच नाही तर इलेक्ट्रिक रिपलेंटमधूनही घातक केमिकल्स शरीरात पोहचतात.
याशिवाय आग लागणे, मुलांना भाजणे असे धोकेही असतात.
बरेच अभ्यास झाले आहेत
मॉस्कीटो कॉइलबरोबर अगदी अगरबत्तीच्या धुरावरही जगभरात संशोधन झाले आहेत. याला आरोग्यासाठी घातक समजलं जातं. लोकं कॉइल लावून खोली बंद करून झोपून जातात. पण हे विषारी केमिकल्स तुमच्या शरीरात घुसतात.
असा करा डासंपासून बचाव
तज्ज्ञ म्हणतात डासांपासून वाचण्यासाठी नैसर्गिक पर्यायांचा अवलंब करा.
दारं खिडक्यांवर जाळी लावा.
कुंड्या किंवा इतरत्र घाण पाणी जमू देऊ नका.
पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.
मॉस्कीटो रिपेलेंट क्रीम आणि जेल तुलनेने सुरक्षित असते.
मच्छरदानी सर्वोत्तम पर्याय आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.