प्रश्न १ - माझ्या आईला गेली २-३ वर्षे वाताचा त्रास होतो आहे. खूप उपचार केले, आहारात काळजी घेतली, पण काहीही फरक पडत नाही. तिचे वय ६५ वर्षे आहे. उपाय सुचवावा, तसेच आहारात काय बदल करता येईल ते सांगावे..... - सुरेंद्र पाडाळे, भोसरी
उत्तर - स्त्रियांमध्ये वाताचा त्रास जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे स्त्रियांनी अभ्यंग घेणे, योनीपिचू वापरणे, वेळेत झोपणे व रक्तधातूची काळजी घेणे वगैरे गोष्टी नियमित कराव्यात, असे आयुर्वेदात सुचविलेले आहे. संपूर्ण शरीराला संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारख्या तेलाने अभ्यंग करावा, सांध्यांमध्ये दुखत असले तर संतुलन शांती सिद्ध तेलासारखे तेल नक्की वापरावे. वातसंतुलन करणाऱ्या बस्ती वैद्यांच्या सल्ल्याने घेण्याचासुद्धा उपयोग होऊ शकेल. तसेच संतुलन पंचकर्मासारखे एखादे शास्त्रोक्त पंचकर्म करून विरेचन व बस्ती केल्याचा उपयोग होताना दिसेल. सध्या आपल्या आहारात अनेक चुका होताना दिसतात.
अस्थिधातुपोषक, तूप, दूध, लोणी वगैरे गोष्टी वर्ज्य सांगितल्या जातात. यामुळेही अशा प्रकारचे वाताचे त्रास वाढत आहेत. सध्या तरी वातशमनाच्या दृष्टीने घरचे साजूक तूप किमान ३-४ चमचे असू द्यावे. रोज एक कप गरम दूध स्त्री संतुलन कल्प टाकून घेण्याचा उपयोग होईल. डिंकाचे लाडू किंवा मॅरोसॅन यांचा आहारात नक्की समावेश असावा. फ्लॉवर, कोबी, चवळी, ढोबळी मिरची, वांगी, आंबवलेले पदार्थ, दही, खूप आंबट गोष्टी, तळलेले पदार्थ आहारातून वर्ज्य करावे.
प्रश्न २ - ‘गर्भसंस्कार’ पुस्तकात डिंकाच्या लाडूची कृती पाहिली. फारच आवडली. घरच्या सगळ्यांनाच हा लाडू खायची इच्छा असते. फक्त गर्भवतींनीच हे लाडू खावेत की इतरांनीही खाल्ले तर चालतात. तसेच हे लाडू कुठल्या ऋतूत खावेत?
- श्रीमती तळपदे, अहमदनगर
उत्तर - डिंकाचे लाडू संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. थोडी मेहनत घेतल्यास दर १५-२० दिवसांनी एकदा ताजे डिंकाचे लाडू करून ठेवता येतात. साधारणपणे सुपारीच्या आकाराचे छोटे गोल लाडू करून ठेवावेत. वर्षभराच्या वयापासून म्हणजे मुले चालायला लागतात तेव्हापासून ते उतारवयापर्यंत सगळ्यांसाठी हे डिंकाचे लाडू खाणे उत्तम असते.
विकास होणाऱ्या बालकांमध्ये तसेच प्रसव झाल्यावर डिंकाचे लाडू खाणे अत्यंत उत्तम असते. यांच्यामुळे अस्थिधातू, मज्जाधातू, मांसधातू या सगळ्यांचे पोषण व्हायला मदत होते. यात चांगल्या प्रतीचे केशर व खारीक असल्यामुळे हे लाडू रक्तधातू वाढवण्यासही मदत करू शकतात. डिंकाचे लाडू वर्षभर खायला हरकत नसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.