Moving Legs : या सोप्या क्रियांमुळे आपल्याला वजन नियंत्रित करण्यास, तणावापासून वाचवण्यास आणि दीर्घकाळ जगण्यास मदत होते. घरी असो वां ऑफिसमध्ये, नाहीतर अगदी कुठेही बसून आपण पाय हलवतो, वारंवार हालचाली करतो किंवा पेनशी खेळतो. आता याला एक प्रकारचा असभ्यपणा म्हणता येईल, पण ते आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
या क्रियेला फिझिंग म्हणतात, जो एक प्रकारचा व्यायाम आहे. माणसाच्या या सततच्या हालचालीमुळे त्याचे शरीर सक्रिय राहते आणि विविध रोगांपासून त्याचे संरक्षण करून वय वाढण्यास मदत होते.लीड्स विद्यापीठातील पोषणतज्ञ जेनेट केड म्हणतात, बसलेल्या स्थितीत हालचाल केल्याने 29% कॅलरीज बर्न होऊ शकतात. असे वर्तन सामान्यतः असभ्य, चिंताग्रस्त असल्याचं मानलं जातं.
पण या सोप्या क्रियांमुळे आपल्याला वजन नियंत्रित करण्यास, तणावापासून वाचवण्यास आणि दीर्घकाळ जगण्यास मदत होते. पाय हलवणे हो हलकी क्रिया देखील आपल्याला अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यात मदत करू शकते.या संदर्भात 24 लोकांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, बसलेल्या स्थितीत हालचाल केल्याने 29 टक्के अधिक कॅलरीज आणि उभे असताना 38 टक्के अधिक कॅलरीज बर्न होतात.
दुसर्या अभ्यासात तणावपूर्ण परिस्थितीत असलेल्या 42 लोकांची मुलाखत घेण्यात आली. त्या सर्वांना गणिताचा प्रश्न सोडवण्यासाठी देण्यात आला. यामध्ये त्यांनी केसांमध्ये हात घालणे, प्रश्न सोडवताना पेनाशी खेळणे अशा हालचाली सुरू ठेवल्या. त्यांना या मुलाखतीदरम्यान कमी ताण जाणवला.
काहीतरी करत राहा, त्याचा मेंदूशी संबंध असतो
कॅलिफोर्निया विद्यापीठातील न्यूरोसायंटिस्ट मॅक्स मेलिन म्हणतात, बैठे राहणे आरोग्यासाठी चांगले आहे असे म्हणता येणार नाही. याचा एखादी गोष्ट सतत चालू ठेवण्याचा मेंदूच्या कार्यक्षमतेशी घट्ट संबंध असतो. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा योग्य प्रमाणात ऊर्जा मिळवून एकाग्रता वाढण्यास मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.