Nagpur Migraine Pain women more than men doctors study sakal
आरोग्य

पुरुषांपेक्षा महिलांना अधिक छळतो मायग्रेन, अभ्यासात बाब समोर

नागपुरातील डॉक्टरच्या अभ्यासातील निष्‍कर्ष

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मेंदू हा सर्व अवयवांचा रिंग मास्टर आहे. स्त्री आणि पुरूष यांच्या शारिरीक आणि मानसिक कार्यपद्धतीचे मूळ म्हणजे मेंदू आहे. स्त्री आणि पुरूष यांच्या मेंदूतील फरक आणि साम्य यावरील ब्रिटनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातील संशोधनानुसार दोघांच्या मेंदूत फरक नसतो. तरीही पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये तिप्पटीने अर्धशिशीची (मायग्रेन) अर्थात अर्धे डोके दुखण्याची समस्या आढळते. असा निष्कर्ष नागपुरातील होमिओपॅथ डॉ. पंकज निमजे यांनी केलेल्या अभ्यासातून पुढे आला आहे.

मायग्रेन आजारावर अमेरिकेच्या लैंसेटमधील शोधप्रबंध आणि नागपुरातील ऑरेंजसिटी होमिओपॅथी संघटनेच्या निरीक्षणातही ही बाब पुढे आली आहे. दरम्यान या आजारावर होमिओपॅथी उपचार गुणकारी असल्याचे डॉ. निमजे यांनी ३० रुग्णांवर केलेल्या संशोधनात समोर आले. मायग्रेन प्रामुख्याने ३० ते ४५ वयोगटात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात आढळतो. स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील असतात.

जेव्हा एखाद्या व्यक्तीची काळजी घेण्यात स्त्रिया पुरुषांपेक्षा पुढेच असतात. तर संतापाच्या भावना व्यक्त करण्याची पद्धत स्त्री आणि पुरुषांमध्ये वेगळी असते. पुरुष शारीरिक हिंसेद्वारे संताप व्यक्त करतात तर स्त्रिया भावनिक संभाषणातून अहिंसेद्वारे वाद- भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतात.

नोकरदार महिला मायग्रेनग्रस्त

मायग्रेनच्या एकूण ३० रुग्णांवर झालेल्या अभ्यासात २४ महिलांपैकी १४ महिला विवाहित होत्या. १० महिला अविवाहित होत्या. त्यामुळे विवाहित महिलांमध्ये जास्त ताण-तणाव असल्याने हा आजार जास्त असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले. मात्र एकूण महिलांपैकी १५ नोकरी करणाऱ्या तर ७ विद्यार्थी होत्या. त्यामुळे घरकामासह नोकरी अशा दुप्पट तणावात वावरत असल्याने नोकरदार महिलांमध्ये हा आजार जास्त दिसत असल्याचेही संशोधनातून पुढे आले.

अशी आहेत लक्षणे

  • तीव्र प्रकाश सहन न होणे

  • ताण- तणाव की सहन होत नाही

  • गंध व ध्वनी सहन न होणे

  • खाज येणे आणि मूड बदलणे

  • कामात लक्ष न लागणे

  • हालचालीने परिस्थिती बिघडणे

  • आजारात रुग्णाला अंधार दिसणे

  • पायात झिणझिण्या येणे

  • मळमळ होणे, ओकारी येणे

आजारासाठी ठरणारे घटक

  • अत्तर किंवा डिओड्रंटचा तीव्र वास

  • खूप मोठा आवाज

  • कानावर पडणे

  • खूप जागरण होणे.

  • डोळ्यांवर अचानक खूप प्रकाश येणे

  • खूप गर्दीत जाणे

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर संप्रेरकांची (हार्मोन्स) उलथापालथ सुरू असते. स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा जास्त शारीरिक बदलांना सामोऱे जातात. मासिक पाळी किंवा मातृत्व याचा त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. सहा महिन्यांच्या निरीक्षणात सर्वाधिक रुग्ण हे १८ ते ४५ वयोगटात आढळले. यापैकी २२ रुग्ण होमिओपॅथीने पूर्णपणे बरे झाले. ६ रुग्णांना चांगला आराम मिळाला. दोन रुग्णांवर औषधांचा परिणाम झाला नाही.

-डॉ. पंकज निमजे, उपाध्यक्ष, ऑरेंजसिटी होमिओपॅथी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT