Narendra Modi Birthday Sakal
आरोग्य

Narendra Modi Birthday: आज पंतप्रधान मोदींचा ७४ वा वाढदिवस, जाणून घ्या निरोगी राहण्याचा फिटनेस फंडे

पुजा बोनकिले

Narendra Modi Birthday: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ७४ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचे पुर्ण नाव नरेंद्र दामोदरदास मोदी असे आहे. गुजरातमध्ये नागरिक मोठ्या आनंदात वाढदिवसाची तयारी केली आहे. त्यांचा वाढदिवस सुरतमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

नरेंद्र मोदी प्रत्येक वेळी उत्साही आणि तंदुरूस्त दिसतात. अनेकांच्या मनात प्रश्न असेल तर मोदी एवढे फिट कसे राहतात. कामाच्या धावपळीत व्यस्त असून देखील ते फिट राहतात. यासाठी ते कोणत्या गोष्टी करतात हे जाणून घेऊया.

नियमितपणे योगा

नरेंद्र मोदी तंदुरस्त आणि निरोगी राहण्यासाठी नियमितपणे योगा करतात. मोदींचे योगा करतांना अनेक फोटो सोशल मिडियावर पाहायला मिळतात. योग केल्याने शरीर निरोगी राहते. तसेच अनेक आजार दूर राहतात. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

सायकलिंग आणि चालणे

मोदी यांना सायकलिंग आणि चालायला आवडते. यामुळे शरीर तंदुरूस्त राहते. हाताचे आणि पायाचे स्नायू निरोगी राहतात.

फोटोग्राफी

नरेंद्र मोदी अनेक वेळा फोटोग्राफी करताना दिसले आहेत. फोटोग्राफी केल्याने मानसिक आरोग्य निरोगी राहते.

हलका आणि पौष्टिक आहार

पंतप्रधान मोदी कायम उत्साही आणि आनंदी राहतात. कारण जेवणात नेहमी वाघारेली खिचडीचे सेवन करतात. हा एक गुजराती पदार्थ आहे. ही पदार्थ बनवण्यासाठी तांदूळ, मुग,हळद,डाळ आणि मीठ यासारख्या साहित्यांचा वापर करून बनवली जाते. या खिचडीचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

हळद

हळद आरोग्यासाठी फायदेशीर असते. हळदीमध्ये औषधीयुक्त गुणधर्म असतात. ज्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

ध्यान करणे

मोदी नेहमी ध्यान करताना दिसतात. ध्यान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच तणाव दूर राहतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT