Breast Cancer esakal
आरोग्य

Breast Cancer : नाशिकच्या HCG कॅन्सर सेंटरतर्फे सत्नाच्या कर्करोगासंबंधी रोबोटिकसाह्य शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

Breast Cancer : HCG मानवता कॅन्सर सेंटरतर्फे (HCGMCC) डॉ. राज नगरकर आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Breast Cancer : नाशिकच्या HCG मानवता कॅन्सर सेंटरतर्फे (HCGMCC) डॉ. राज नगरकर आणि त्यांच्या टीमने व्हर्सियस सीएमआर प्रणालीचा वापर करून पहिली रोबोटिक-साह्य लाभलेली स्तनांची शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे.

यासाठी त्यांनी निप्पल-स्पेअरिंग मास्टॅक्टॉमीचा (RNSM) वापर केला. त्यांनी स्तनाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेत अभूतपूर्व प्रगती केली आहे. मार्च 2024 मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी 35 वर्षीय महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

निप्पल-स्पेअरिंग मास्टॅक्टॉमी (NSM) मध्ये पारंपरिक पद्धतीने जास्तीत जास्त इनव्हासिव्ह ओपन सर्जिकल टेक्निकद्वारे संपूर्ण स्तनाची ऊती काढून, निप्पल, एरिओला आणि त्वचा जतन केली जाते. परंतु HCG मानवता कॅन्सर सेंटर टीमने रोबोटिक सहाय्याचा वापर करून, 3D व्हिज्युअलायझेशनसह अचूकता आणि निपुणता वाढवून, ‘3 सेमी इन्सिजन स्कार’ पद्धतीचा शोध लावला आहे. ही पद्धत ऑन्कोलॉजिकल सुरक्षिततेशी तडजोड न करता पूर्ण मास्टॅक्टॉमीची (स्तन काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया) खात्री देते आणि कॉस्मेटिक परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा करते.

रुग्णाने केमोथेरपीच्या आठ फेऱ्या पूर्ण केल्या आणि त्यानंतर जुलै 2024 मध्ये शस्त्रक्रिया केली. रूग्णाच्या पॉसिटीव्ह BRCA जेनेटिक म्युटेशन आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या कौटुंबिक इतिहासामुळे, अंडाशयांसह तिचे दोन्ही स्तन आणि नोडस् (गाठी ) काढून टाकणे आवश्यक होते. रुग्ण महिलेला शस्त्रक्रियेनंतर तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. असे HCG मानवता कॅन्सर सेंटर आणि हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. राज नगरकर यांनी सांगितले.

"या प्रक्रियेचे रुग्णाला होणारे फायदे आश्चर्यकारक आहेत. रोबोटिक-साह्य लाभलेली निप्पल-स्पेअरिंग मास्टॅक्टॉमी (RNSM) तंत्र निप्पल, एरिओलाचे जतन करून उत्कृष्ट कॉस्मेटिक रिझल्ट देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, निप्पल, एरिओला भागांच्या संवेदनांना हानी पोहोचत नाही. यामुळे बॉडी इमेज सुधारते.

रुग्ण जास्त समाधानी राहतो आणि त्याच्या मानसिक आरोग्याला धक्का लागत नाही. याव्यतिरिक्त, कमीतकमी इनव्हेसिव्ह तंत्रामुळे शस्त्रक्रियेनंतर वेदना कमी होतात, रुग्णाची रिकव्हरी लवकर होते, रुग्णालयात कमी काळ राहावे लागते आणि व्रण कमीतकमी राहतात," असेही त्यांनी पुढे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT