National Cancer Awareness Day  esakal
आरोग्य

National Cancer Awareness Day : बिघडलेला आहार आणि 'या' वाईट सवयींमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका

भारतात ७ नोव्हेंबरला दरवर्षी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन’ साजरा केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

National Cancer Awareness Day :

भारतात दरवर्षी ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन’ हा ७ नोव्हेंबरला साजरा केला जातो. लोकांना कॅन्सरबद्दल, त्याच्या लक्षणांबद्दल,आणि प्रकारांबदद्ल जागरूक करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. स्तनाचा कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोग हे सामान्य कर्करोगांपैकी एक असलेले प्रकार आहेत. ज्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे कर्करोगाच्या २ तृतीयांश प्रकरणांमध्ये तंबाखू, दारू, आणि बिघडलेली जीवनशैली या कारणांचा प्रामुख्याने समावेश होतो. आपल्या रोजच्या आयुष्यातील अनेक सवयी या कळत नकळतपणे कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात.

आज आपण अशा सवयींबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊयात या सवयी.

दारूची वाईट सवय

दारू पिणे हे आरोग्यासाठी घातक आहे. दारूमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. दारूच्या सवयीमुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. दारू पिण्याच्या सवयीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमजोर होते.

तसेच, यकृताच्या कर्करोगाला दारू पिण्याची सवय ही कारणीभूत ठरू शकते. या व्यतिरिक्त महिलांमध्ये आढळून येणाऱ्या स्तनांच्या कर्करोगामागे दारू पिण्याची सवय हे प्रमुख कारण असू शकते. त्यामुळे, डॉक्टर नेहमीच दारूच्या सेवनापासून दूर राहण्याचा सल्ला देतात.

बिघडलेला आहार

आहाराचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. आपण ज्या प्रकारचा आहार घेतो, त्या प्रकारचा थेट प्रभाव आपल्या आरोग्यावर दिसून येतो. रेड मीट किंवा प्रोसेस्ड मीट यांसारख्या अन्नपदार्थांच्या अतिसेवनामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे, यांसारख्या खाद्यपदार्थांचे सेवन टाळण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर देतात.

यासोबतच, चरबीयुक्त घटक, प्रथिने, मीठ आणि शुगर ड्रिंक्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, या गोष्टींचे अतिप्रमाणात सेवन करणे लवकरात लवकर टाळा.

तंबाखूजन्य घटक

काही संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, तंबाखूमुळे कर्करोग होण्याचा धोका हा जास्त असतो. तंबाखूचे सेवन केल्याने तोंड, घसा, नाक, अन्ननलिका, पोट, स्वादुपिंड, मूत्रपिंड आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका असतो.

तंबाखूच्या सेवनामुळे, फुफ्फुसाचा कर्करोग हा वेगाने वाढत आहे. ही अतिशय, चिंतेची बाब आहे. धक्कादायक बाब म्हणजे अशा प्रकारच्या 80-90 टक्के प्रकरणांमध्ये तंबाखू हा प्रमुख धोकादायक घटक मानला जातो. जर तुम्ही तंबाखूचे, सिगारेट आणि दारूचे सेवन करत असाल तर, वेळीच सेवन करणे थांबवा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT