National Olive Day 2024 :
ऑलिव्ह या फळाचे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. ऑलिव्हला मराठीत जैतून असे म्हणतात. यामध्ये भरपूर मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. शरीराच्या अनेक मोठ्या आजारावर हे फळ गुणकारी आहे. या फळाच्या तेलाचा नियमित वापर केल्यास शरीराची अनेक आरोग्याच्या समस्यांमधून सुटका होते.
ऑलिव्हमध्ये अँटिऑक्सिडंट्सही भरपूर असतात. त्यात प्रामुख्याने पॉलीफेनॉल, व्हिटॅमिन ई, सिटोस्टेरॉल, टायरोसोल, ओलिओकॅन्थॉल इत्यादी अँटीऑक्सिडंट्स आढळतात. या तेलामध्ये असे काही घटक आढळतात. ऑलिव्ह ऑइल हे पचन आणि गॅससाठीही फायदेशीर मानले जाते.
आज राष्ट्रीय ऑलिव्ह दिवस आहे. त्यामुळेच आज आपण या फळाचे, त्याच्या तेलाचे काय फायदे आहेत याबद्दल जाणून घेऊयात.
रक्तदाब नियंत्रणात आणते
ऑलिव्ह ऑइलमध्ये पॉलिफेनॉल आणि मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. ऑलिव्ह ऑईलच्या सेवनाने उच्च रक्तदाबाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी केला जाऊ शकतो.
स्मरणशक्ती वाढवते
ऑलिव्ह ऑईल केवळ सौंदर्यच वाढवत नाही तर ते तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासही मदत करू शकते. कारण ऑलिव्ह ऑइलमध्ये पॉलीफेनॉल असतात, जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. ऑलिव्ह ऑईलच्या सेवनाने अल्झायमर आणि स्मरणशक्तीशी संबंधित समस्या टाळता येतात.
कर्करोगावर फायदेशीर
ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स तसेच व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि बी-कॅरोटीन असतात. जे कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.
रोगप्रतिकारक शक्ती
ऑलिव्ह ऑइल रोगप्रतिकारशक्तीसाठी खूप फायदेशीर मानले जाते. ऑलिव्ह ऑइलने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत केली जाऊ शकते. मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक हंगामी संक्रमणांपासून वाचवण्यास मदत करू शकते.
हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर
हाडांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. कॅल्शियम व्यतिरिक्त, ऑलिव्ह ऑइलमध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात, ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. (Olive oil health benefits)
त्वचा आणि केसांसाठी फायद्याचे
ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई गुणधर्म आढळतात. व्हिटॅमिन ई त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. ऑलिव्ह ऑइलने त्वचेला मसाज केल्याने सुरकुत्या, पुरळ आणि कोरडेपणा यापासून सुटका मिळते.
तसेच, ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई आढळते ज्यामुळे केस निरोगी राहण्यास मदत होते. ऑलिव्ह ऑइल केसांची स्थिती सुधारते, ते मजबूत ठेवते आणि चमक निर्माण करण्यास देखील मदत करू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.