National Pollution Control Day 2023 : जगातील सर्वच देशांसमोर प्रदूषणाचे संकट उभे राहिले आहे. दुर्दैवाने प्रदूषण निर्माण होण्यामागे मानवाचा हात असल्यामुळे हे प्रदूषण कसे रोखता येईल? याचे प्रमाण कसे कमी करता येईल? याचे प्रयत्न जगभरात सुरू आहेत.
हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण असे प्रदूषणाचे प्रकार आहेत. यातील हवा आणि जल प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि ही चिंतेची बाब आहे. हे सर्व धोके लक्षात घेऊन राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो.
आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन आहे. भारतात दरवर्षी २ डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो. प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि प्रदूषणापासून सुटका करून देणाऱ्या उपायांवर चर्चा करणे, प्रदूषणाचा धोका कमी व्हावा, यासाठी लोकांना जागरूक करणे हा या दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचा इतिहास हा भारतातील भोपाळमध्ये घडलेल्या वायू दुर्घटनेशी संबंधित आहे. २ डिसेंबर १९८४ मध्ये भोपाळमधील एका कीटकनाशक प्लॉंटमधून सुमारे ४५ टन मिथाईल आयसोसायनेटची गळती झाली होती आणि हा वायू आजूबाजूच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात पसरला होता.
हा वायू पसरल्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. शिवाय, असंख्य लोकांना या वायूमुळे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे, या वायू दुर्घटनेच्या स्मरणार्थ हा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो.
या दिनाचे महत्व सांगायचे झाल्यास विषारी हवेमुळे किंवा वातावरणातील प्रदूषणामुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागू नयेत आणि प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या रोखण्यासाठी आपण सर्वांनी पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी, पर्यावरणाची मदत घेणे आणि पर्यावरणाचा समतोल साधणे हे फार महत्वाचे आहे.
हे प्रदूषण रोखण्यासाठी आणि या प्रदूषणापासून सुटका करणाऱ्या उपायांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस खास करून साजरा केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.