Ayurveda sakal
आरोग्य

ऊन-पावसाचा खेळ

निसर्गात होणारे सगळेच बदल आपल्या शरीरावर तसेच आपल्या स्वास्थ्यावर परिणाम करत असतात.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. मालविका तांबे

निसर्गात होणारे सगळेच बदल आपल्या शरीरावर तसेच आपल्या स्वास्थ्यावर परिणाम करत असतात. निसर्गात होणाऱ्या स्वाभाविक बदलांनुसार वर्ष हिवाळा, उन्हाळा व पावसाळा अशा तीन महत्त्वाच्या ऋतूंमध्ये विभागले गेले आहे.

गेल्या काही दशकांमध्ये वातावरणामध्ये होणारा बदल या तिन्ही ऋतूंमध्ये प्रकर्षाने जाणवतो. यावर्षी ग्रीष्म ऋतूत गाठलेला तापमानाचा उच्चांक जागतिक हवामान खात्याच्या अपेक्षेपेक्षा फारच वेगळा होता. एवढेच नव्हे तर पाऊसही वेळेवर न येता उशिरा आला, पाऊस व ऊन यांच्यातील लपंडाव आजही चालू आहे.

आयुर्वेदाने ऋतूंना सहा भागांत विभाजित केले आहे. त्यात पावसाळा वर्षा व शरद ऋतूंनी बनलेला असतो. शरद म्हणजे कडक ऊन व वर्षा म्हणजे पावसाच्या सरी. एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत जात असताना वातावरणात जे बदल जाणवतात त्याला आयुर्वेदाने ऋतुसंधी म्हटले आहे. आधीच्या ऋतूतील सात दिवस व येणाऱ्या ऋतूतील सात दिवस असा १४ दिवस हा ऋतुसंधीचा काळ सांगितलेला आहे.

प्रत्येक ऋतूत कसे वागावे याबद्दल संपूर्ण माहिती ऋतुचर्येत सांगितलेली आहे. ऋतुसंधीचा काळ थोडा अवघड असतो, कारण या काळात कुठल्या ऋतूच्या योजनेप्रमाणे वागावे हे समजत नाही. त्यामुळे बऱ्याच व्यक्ती ऋतुसंधीच्या काळात आजारी पडतात. सध्या हे दोन्ही ऋतू एकमेकांत मिसळल्यासारखे झाले आहेत. परत ऊन व परत पाऊस असा ऊन-पावसाचा केळ सध्या चालू आहे. त्यामुळे आजारपणाचे प्रमाण फारच वाढते.

पावसाळ्यात शरीरात वाताची वृद्धी होते. त्यामुळे अंग दुखणे, पाठ व कंबर दुखणे, डोके दुखणे, अशक्तपणा वाटणे, उत्साह न वाटणे अशा प्रकारचे त्रास वरचेवर दिसायला लागतात. या काळातील दमटपणामुळे वातावरणात एकूणच जीवजंतूंचे प्रमाण वाढलेले असते. माशा, मच्छर, वेगवेगळ्या प्रकारचे किडे, जंतू, तसेच व्हायरस, बॅक्टेरिया या डोळ्यांना न दिसणाऱ्या जंतूंचा प्रादुर्भाव पण या काळात जास्त होताना दिसतो.

यामुळे या काळात सर्दी-खोखला, ताप, जुलाब, उलट्या, मळमळ वगैरे संक्रामक रोग वाढताना दिसतात. या ऋतूत अग्नी मंद झालेला असल्यामुळे अन्नात रुची न वाटणे, थोडे खाल्ले तरी पोटात जड वाटणे, गॅस धरणे वगैरे त्रास होताना दिसतात. शरद ऋतू हा पित्तप्रकोपाचा काळ.

यामुळेसुद्धा त्वचेवर खाज सुटणे, त्वचेवर रॅश येणे, पित्ताच्या गांधी उठणे, उलट्या, डोकेदुखी, जळजळ वगैरे त्रास पित्ताशी संबंधित वेगवेगळे त्रास होताना दिसतात. एकूणच या काळात मूत्रमार्गातील संक्रमण होण्याची शक्यता वाढताना दिसते. या सगळ्यांसाठी काही प्रतिबंधात्मक उपाय योजता येऊ शकतात, जेणेकरून ऋतुसंधीचा काळ आपल्याला सुसह्य होऊ शकेल.

1) वातवृद्धी होण्यास प्रतिबंध म्हणून संपूर्ण अंगाला तेल लावणे उत्तम. सकाळी स्नानापूर्वी संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेल आठवड्यातून २- ३ वेळा नक्की लावावे. तसेच सांधेदुखी, पाठ-कंबरदुखीचा त्रास होण्याची शक्यता असणाऱ्यांनी सांध्यांवर संतुलन शांती सिद्ध तेल व पाठ-कंबरेवर संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल नियमितपणे लावणे सुरू करावे. ही तेले लावण्यासाठी चार-पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे आपल्या दिनचर्येत याचा समावेश करणे अत्यंत आवश्यक असते.

2) संक्रमणापासून दूर राहण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे असते ते म्हणजे अन्नाची व पाण्याची काळजी घेणे. पिण्याचे पाणी नेहमी उकळलेले असावे, शक्यतो २४ कॅरट सोन्याचा तुकडा व जलसंतुलन घालून पाणी २० मिनिटे उकळावे. असे केल्याने पाणी निर्जंतुक व्हायला तसेच पचन व्यवस्थित राहायला मदत मिळते.

3) शक्यतो बाहेरचे अन्न टाळलेले बरे. बाहेर काही खायचे झालेच तर माहितीतील व योग्य ठिकाणी खावे जेथे स्वच्छतेची काळजी घेतलेली असेल. बाहेरचे खाल्ल्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संतुलन अन्नयोग या गोळ्या आणि अविपत्तिकर चूर्ण नियमितपणे घेणे इष्ट. यामुळे पचन सुधारते व शरीरात पित्तशमन व्हायलाही मदत मिळते.

4) भूक कमी झाली असल्यास भूक नसताना न खाणेच इष्ट. पावसाळ्यात गरम पेय पदार्थांना जास्त महत्त्व द्यावे. गरम हर्बल टी, गरम चहा, गरम पाण्यात लिंबू पिळून घेणे हे आरोग्यासाठी हितकर. पोटात जडपणा वाटत असल्यास गरम पाण्यात लिंबू पिळून दिवसभरात थोडे थोडे घेण्याचा किंवा चहाऐवजी दिवसातून २-३ वेळा घेण्याचा फायदा होतो.

5) आहारामध्ये मऊ भात, मऊ खिचडी, घरचे साजूक तूप, मुगाचे सूप, मुगाचे कढण, साळीच्या लाह्यांची खीर, ताजे गोड ताक, गरम आमटी-भात असा पचायला सोपा आहेर घेतलेला बरा. पाऊस असला की बऱ्याचदा भजी खायची इच्छा होते. अशा वेळी आवड म्हणून १-२ भजी खाणे ठीक असले तरी बशीभर भजी खाणे आरोग्यासाठी अहितकर असते.

6) जेवणापूर्वी सैंधव मीठ लावून छोटा आल्याचा तुकडा चघळण्याचा किंवा आल्या-लिंबाचा रस-मध यांचे मिश्रण घेतल्यास पचन सुधरायला मदत मिळते.

7) हवेतील दमटपणा कमी करण्यासाठी संतुलन प्युरिफायर धूप, संतुलन परिवार कवच धूप, संतुलन टेंडरनेस धूप सकाळ-संध्याकाळ घरात करणे चांगले.

8) लघवीला त्रास होत असल्यास संतुलन पुनर्नवासव, संतुलन गोक्षुरादी चूर्ण, संतुलन गोक्षुरादी गुग्गुळ वटी, चंद्रप्रभा वटी वगैरे घेण्याचा तसेच वरचेवर जिऱ्याचे पाणी, धण्याचे पाणी घेण्याचाही फायदा होऊ शकेल.

9) शक्य झाल्यास स्त्रियांनी या काळात संतुलन शक्ती धूप नियमित वापरावा.

एकूणच या ऋतुसंधीच्या काळात जेवढी स्वतःची काळजी घेता येईल तेवढे उत्तम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

Deolali Assembly Constituency : देवळालीच्या वाढीव टक्क्याचा लाभार्थीचा फैसला शनिवारी

SCROLL FOR NEXT