Neuro Ectodermal Tumor esakal
आरोग्य

Neuro Ectodermal Tumor : HCGMCC मध्ये सर्वात मोठ्या न्यूरोएक्टोडर्मल ट्युमरवर यशस्वी शस्त्रक्रिया, जगातील पहिले डॉक्युमेंटेड सर्जिकल रिमूव्हल

नाशिकच्या HCG Manavata Cancer Centre (HCGMCC) च्या वतीने मानेतील मोठा न्यूरोएक्टोडर्मल ट्यूमर शस्त्रक्रियेद्वारे यशस्वी रित्या काढून टाकण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Neuro Ectodermal Tumor : सध्याचे धावपळीचे जीवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जंकफूडचे वाढलेले सेवन आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. मागील काही वर्षांपासून भारतात कर्करोग आणि ट्युमरचे विकारांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

यामध्ये मानेतील न्यूरोएक्टोडर्मलचा ही समावेश होतो. या ट्युमरचे प्रमाण जरी कमी असले तरी नुकतीच अशी एक केस नाशिकच्या डॉक्टरांनी सोडवली आहे.

नाशिकच्या HCG Manavata Cancer Centre (HCGMCC) च्या वतीने मानेतील मोठा न्यूरोएक्टोडर्मल ट्यूमर शस्त्रक्रियेद्वारे यशस्वी रित्या काढून टाकण्यात आला आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांनी एक मोठा वैद्यकीय टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आलेले हे जगातील पहिले डॉक्युमेंटेड प्रोसिजर आहे.

डॉक्टरांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया जळगाव येथील ५६ वर्षीय महिला जयश्री परदेशी यांच्यावर केली. त्यांना न्यूरोएक्टोर्मल ट्युमर झाल्याचे निदान झाले. त्या मागील महिन्यात रूग्णालयात आल्यानांतर, HCGMCC चे व्यवस्त्थापकीय संचालक आणि सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्व्हिसेसचे प्रमुख प्रा. डॉ. राज नगरकर यांनी शस्त्रक्रिया हाच यावर एकमेव उपचार असल्याचा सल्ला दिला.

त्यानंतर, परदेशी यांच्या मानेतील हा ट्यूमर काढण्याचे आव्हान डॉक्टरांच्या टीमने स्विकारले आणि ही किचकट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. यासंदर्भात बोलताना डॉ. नगरकर म्हणाले की, परदेशी यांना दोन वर्षाांपूवी एका नवीन वैद्यकीय आव्हानांचा सामना करावा लागला होता, तेव्हा त्याांच्या मानेच्या डाव्या बाजूला सूज आली.

इमेजिंग आणि बायोप्सीने न्यूरोएक्टोडर्मल ट्यूमर असल्याचे निदान झाले. ही एक अपवादात्मक दुर्मिळ स्थिती असून जागतिक स्त्तरावर अशी केवळ पाच प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सुरूवातीला, रूग्णाने केमोथेरपीच्या दोन फेऱ्या घेतल्या. परंतु, पुढील उपचार थाांबवले. एका वर्षानंतर त्या परत आल्यावर, ट्युमरचा आकार लक्षणीयरीत्या वाढला होता. ज्यामुळे त्यांना तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आणि रूग्णाच्या डोक्याची हालचाल मर्यादित झाली.

या टप्प्यावर उपचाराांच सर्वोत्तम मार्ग म्हणजे शस्त्रक्रिया असल्याचे लगेच आमच्या लक्षात आले, आणि शस्त्रक्रियेनंतर फक्त दहा दिवसांनी रूग्णाला लक्षणीय आराम मिळाला आहे, आणि त्या बऱ्या होत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे, असे HCGMCC चे व्यवस्थापकीय संचालक आणि सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्व्हिसेसचे प्रमुख प्रा. डॉ. राज नगरकर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate List: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; सांगलीतून पृथ्वीराज पाटील, 'कोल्हापूर उत्तर'मधून 'यांना' संधी

Washim Assembly election: उमेदवारी नाकारल्याने आमदार मलिक यांना अश्रू अनावर; कार्यकर्त्यांना बोलून भूमिका घेणार असल्याचा इशारा

चांगल्या पगाराची नोकरी, उत्तम वर्क लाईफ बॅलन्स शिवाय क्रिकेटही.. सगळं काही जर्मनीमध्ये

Yeola Assembly Election 2024: येवल्यात भुजबळांविरोधात शरद पवारांचा जरांगे पॅटर्न; शिंदेंना मैदानात उतरवून मोठी खेळी

Ulhasnagar Assembly Elections 2024: पुन्हा 'कलानी' विरुद्ध 'आयलानी' आमनासामना

SCROLL FOR NEXT