Nita Ambani Reliance Foundation Hospital Announcement : रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा नीता अंबानी यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त ,वंचित समाज घटकांतील 1 लाखांहून अधिक महिलांना व मुलांना मोफत स्क्रीनिंग आणि उपचारांची सेवा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. हे नवीन आरोग्य सेवा योजनेच्या माध्यमातून मुलांमध्ये जन्मजात हृदयरोग, महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाचे कर्करोग तसेच किशोरवयीन मुलींना गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस मोफत उपलब्ध करून दिली जाईल.
या योजनेत महत्वाच्या ३ गोष्टींचा समावेश आहे ज्यामध्ये,
50,000 मुलांसाठी जन्मजात हृदयरोगाची मोफत स्क्रीनिंग आणि उपचार
50,000 महिलांसाठी स्तन व गर्भाशयाचे कर्करोगाची मोफत स्क्रीनिंग आणि उपचार
10,000 किशोरवयीन मुलींना गर्भाशयाच्या कर्करोगावरील मोफत लस या सर्व योजनांचा समावेश आहे.
नीता अंबानी यांनी ही नवीन आरोग्य सेवा योजना जाहीर केली. त्यावेळेस त्या म्हणाल्या, "गेल्या 10 वर्षांपासून, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने अत्याधुनिक आरोग्य सेवा भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा आमचा उद्देश साध्य करण्यासाठी कार्यरत आहे. आम्ही लाखो लोकांचे जीवन बदलले आहे आणि अनेक कुटुंबांना आशा दिली आहे. वर्धापन दिनानिमित्त आम्ही नवीन आरोग्य सेवा योजना सुरू केली आहे जी वंचित समाजातील महिलांसाठी आणि मुलांसाठी मोफत असेल. आम्हाला विश्वास आहे की उत्तम आरोग्य हे राष्ट्राची उन्नती करण्याचे मूलभूत घटक आहे."
मुंबईच्या दक्षिण भागात स्थित सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल हे 360 खाटांचे क्वार्टनरी केअर हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलचे उद्दिष्ट म्हणजे समाजाच्या सर्व घटकांना सुरक्षित, परवडणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवणे. हे हॉस्पिटल JCI आणि NABH मान्यता प्राप्त आहे, जी उच्च दर्जाच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र मानली जाते. तसेच हे हॉस्पिटल मुंबईतील सर्वात मोठे गोल्ड प्रमाणपत्र धारक ग्रीन हॉस्पिटल आहे.
भारतात आरोग्याविषयक अनेक आव्हाने आहेत. ज्यात भारतामध्ये जन्मजात हृदयरोग हा गंभीर सार्वजनिक आरोग्यविषयक समस्या आहे, ज्यामुळे 100 पैकी 1 नवजात मुलामध्ये हा आजार आढळतो. याचबरोबर, भारतातील स्त्रियांमध्ये सर्वाधिक प्रमाणात स्तनाचा कर्करोग आढळतो. एका अहवालानुसार, स्थानिक स्तरावर कर्करोगाची निदान झालेल्या रुग्णांना इतरांपेक्षा पाच वर्षांचा जगण्याचा दर 4.4 पट अधिक आहे.त्यामुळे नीता अंबानी यांनी घोषणा केलेल्या या योजनेमुळे सर्वसामान्य लोकांना त्यांच्या आजारातून बाहेर पडण्यास मदत मिळणार आहे. चौकशीसाठी, तुम्ही हॉस्पिटलच्या 1800 890 1111 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.